Cricket Controversy: क्रीडा विश्वात खळबळ! ब्रॉडच्या वडिलांनी ICC आणि BCCI वर केला गंभीर आरोप, 'टीम इंडिया'बद्दल केला मोठा खुलासा

Chris Broad on ICC and BCCI: इंग्लंडचे माजी क्रिकेटपटू आणि आयसीसीचे माजी मॅच रेफरी ख्रिस ब्रॉड यांनी दिलेल्या खळबळजनक मुलाखतीने आंतरराष्ट्रीय क्रिकेट विश्वात नवी चर्चा सुरू झाली आहे.
Cricket Controversy
Cricket ControversyDainik Gomantak
Published on
Updated on

इंग्लंडचे माजी क्रिकेटपटू आणि आयसीसीचे माजी मॅच रेफरी ख्रिस ब्रॉड यांनी दिलेल्या खळबळजनक मुलाखतीने आंतरराष्ट्रीय क्रिकेट विश्वात नवी चर्चा सुरू झाली आहे. टेलिग्राफला दिलेल्या या मुलाखतीत त्यांनी आयसीसी (ICC) आणि बीसीसीआयवर (BCCI) गंभीर आरोप केले आहेत.

ख्रिस ब्रॉड हे इंग्लंडच्या वेगवान गोलंदाज स्टुअर्ट ब्रॉडचे वडील असून, क्रिकेटमध्ये त्यांचे मोठे योगदान मानले जाते. मात्र या वेळी त्यांनी केलेल्या विधानांमुळे पुन्हा एकदा आयसीसीच्या कामकाजातील पारदर्शकतेचा मुद्दा चर्चेत आला आहे.

या मुलाखतीत ब्रॉड यांनी सौरव गांगुलीच्या काळातील एका घटनेचा उल्लेख करत बीसीसीआयला विशेष वागणूक मिळत असल्याचा दावा केला.

त्यांनी सांगितले की, एका सामन्यात भारताचा संघ ओव्हर-रेटमध्ये मागे होता, त्यामुळे दंड आकारला जाणे अपेक्षित होते. पण सामना संपल्यानंतर त्यांना फोनवरून सूचित करण्यात आले की, “थोडा वेळ घ्या, कारण हा भारताचा संघ आहे.” ब्रॉड यांच्या मते, या सूचनेचा थेट अर्थ असा होता की नियमानुसार दंड टाळण्यासाठी वेळ काढण्यात यावा. ते म्हणाले की पुढच्याच सामन्यात अशीच परिस्थिती पुन्हा उद्भवली होती.

Cricket Controversy
Goa Tourism: सुट्टीसाठी गोव्यात जाताय? बसेल हजारोंचा दंड, गाडी चालवताना 'हे' नियम हवे तोंडपाठ

सौरव गांगुलीच्या संदर्भात त्यांनी सांगितले की, “गांगुली माझा कोणताही सल्ला ऐकायला तयार नव्हता, तेव्हा मी वरिष्ठांना विचारले की आता काय करावे?” त्यावर त्यांना उत्तर मिळाले, “जसे ठरवले आहे तसेच करा.” या वक्तव्यावरून ब्रॉड यांचा दावा असा की त्या काळातही आयसीसीच्या निर्णय प्रकियेवर राजकीय प्रभाव जाणवत होता. हे प्रकरण सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात चर्चेत आले असून चाहत्यांमध्येही मतभेद निर्माण झाले आहेत.

ब्रॉड यांनी हीदेखील टिप्पणी केली की, विन्स वॉन डेर बिजल यांच्या आयसीसीतील पदावरून जाण्यानंतर परिस्थितीत मोठा बदल झाला. त्यांच्या नेतृत्वाखाली पंच आणि मॅच रेफरी यांना पाठिंबा मिळत असे, परंतु त्यांच्या गेल्यानंतर व्यवस्थापन कमकुवत झाले आणि बीसीसीआयचे प्रभाव वाढले. त्यांच्या मते, भारत सध्या आर्थिकदृष्ट्या सर्वात मजबूत क्रिकेट बोर्ड आहे आणि त्यामुळे आयसीसीमध्येही त्यांचे वर्चस्व वाढले आहे.

Cricket Controversy
Goa Coal Protest: 'कोळशाला विरोध करण्यासाठी गोव्यातील जनतेने सहभागी व्हावे'! सरदेसाईंचे आवाहन; जागृती सभेचे आयोजन

मुलाखतीच्या शेवटी ख्रिस ब्रॉड यांनी सांगितले की, “मला आनंद आहे की आता मी या पदावर नाही. क्रिकेट प्रशासन आता पूर्वीपेक्षा अधिक राजकीय झाले आहे.” त्यांच्या या वक्तव्यांवर भारत किंवा आयसीसीकडून अद्याप अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही. परंतु या खुलाशामुळे जागतिक क्रिकेटच्या प्रशासनातील पारदर्शकता, प्रभाव आणि राजकारण याविषयी पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com