Viral Mother Son Video
Viral VideoDainik Gomantak

Viral Video: दूध सांडले, पाणी सांडले, मार मात्र एकालाच! आई-मुलाच्या वादाचा मजेदार VIDEO व्हायरल, नेटकऱ्यांनीही घेतली मजा; म्हणाले...

Viral Mother Son Video: सोशल मीडियावर अनेकदा आई आणि मुलाचे भावनिक नाते दर्शवणारे व्हिडिओ व्हायरल होतात, जे लोकांना खूप आवडतात.
Published on

Viral Mother Son Video: सोशल मीडियावर अनेकदा आई आणि मुलाचे भावनिक नाते दर्शवणारे व्हिडिओ व्हायरल होतात, जे लोकांना खूप आवडतात. पण सध्या व्हायरल होत असलेला एक व्हिडिओ मात्र याला अपवाद आहे. हा व्हिडिओ आई-मुलाच्या नात्यातील प्रेमाऐवजी, एका मुलाने छोट्याशा चुकीमुळे थप्पडांची सरबत्ती कशी खाल्ली, हे मजेदार पद्धतीने दाखवतो. विशेष म्हणजे, आईकडून चूक झाली तरीही त्याचा मार मुलालाच मिळाला, यामुळे हा व्हिडिओ खूप चर्चेत आहे.

व्हिडिओमध्ये घडलेला थरार

दरम्यान, हा मजेदार व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'एक्स' वर @missintrover नावाच्या हँडलवरुन शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओला, "ती आई आहे, तिची कधी चूक होऊ शकत नाही," असे मजेशीर कॅप्शन देण्यात आले.

Viral Mother Son Video
Viral Video: फूड कॉम्बिनेशनचा डोक्याला शॉट लावणारा अजब प्रकार व्हायरल, नेटकरीही चक्रावले; व्हिडिओ पाहून तुम्हीही म्हणाल, 'हे ट्राय करु नका...'

व्हिडिओमध्ये दिसते की, एक मुलगा स्वयंपाकघरात बसून जेवण करत आहे. त्याची आई त्याला चपाती देण्यासाठी येते. मुलगा जसा चपाती तोडण्यासाठी घेतो, तसा समोर ठेवलेला दूध किंवा ताकाचा ग्लास त्याला लागून खाली जमिनीवर पडतो आणि दूध सांडते. हे पाहून आई लगेच रागाच्या भरात मुलाला पहिली थप्पड मारते. मुलगा मार खात असतानाच आईचा पायही समोर ठेवलेल्या दुसऱ्या एका ग्लाससोबत अडकतो आणि पाणी असलेला ग्लासही जमिनीवर सांडतो. आईने केलेल्या या चुकीकडे मुलगा मोठ्या आश्चर्याने पाहतो. पण गंमत म्हणजे, आपली चूक मान्य करण्याऐवजी, आई स्वतःच्या चुकीबद्दलही मुलालाच दुसरी थप्पड लगावते.

Viral Mother Son Video
'आम्ही पुढच्या वेळी फुकेटला जाऊ',पर्यटकांचा गोव्याला रामराम, टॅक्सी माफियांची दादागिरी; Video Viral

या अन्यायामुळे मुलगा जेव्हा आईशी वाद घालण्याचा प्रयत्न करतो, तेव्हा आईचा राग अधिक वाढतो आणि ती त्याला पाठोपाठ तीन-चार-पाच थप्पड मारुन गप्प करते. या सगळ्या प्रकारानंतर व्हिडिओच्या अगदी शेवटी, जेव्हा आई स्वयंपाक करताना चुकून चपाती जाळून टाकते, तेव्हाही ती आपला राग मुलावरच काढते आणि त्याला पुन्हा एकदा थप्पड मारते. चूक कोणाचीही असो, प्रत्येक वेळी शिक्षा मात्र मुलालाच मिळाली, ज्यामुळे हा व्हिडिओ सोशल मीडियावर तूफान व्हायरल झाला.

Viral Mother Son Video
Viral Video: देसी 'सीटी स्कॅन' मशीनचा भन्नाट जुगाड व्हायरल, डॉक्टर आणि रुग्ण बनून तरुणाईची कमाल; नेटकरी म्हणाले...

यूजर्सच्या प्रतिक्रिया

या व्हिडिओवर नेटकऱ्यांनी अनेक मजेदार प्रतिक्रिया दिल्या आहेत.

  • एका युजरने आपल्या बालपणीची आठवण सांगत लिहिले की, "हा तर काहीच मार नाही, आम्हाला तर चिमट्याने मार मिळायचा."

  • दुसऱ्या युजरने भावूक होत विचारले, "आई, मी इतका वाईट आहे का?"

  • तिसऱ्या युजरने 'अगदी बरोबर' म्हणत, "आई-वडिलांच्या बाजूने कधीच चूक होत नाही, चूक नेहमी आमच्या बाजूनेच असते," अशी कमेंट केली.

  • एका युजरने सल्ला दिला की, "म्हणूनच वादात न पडता चूपचाप जेवण करुन घ्यावे."

या व्हिडिओमुळे सोशल मीडियावर सध्या हशा पिकला असून अनेक पालक आणि मुलांनी हा अनुभव स्वतःच्या आयुष्यातही घेतला असल्याची कबुली दिली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com