actress shalini divorce  Dainik Gomantak
मनरिजवण

"99 प्रॉब्लेम्स आहेत, पण नवऱ्याची कटकट नाही", दक्षिणी अभिनेत्रीचे डिवोर्स फोटोशूट; नेटकरी थक्क

Actress Shalini divorce photoshoot: दाक्षिणात्य अभिनेत्री शालिनीने नुकताच तिचा घटस्फोट अनोख्या पद्धतीने साजरा करून इंटरनेटवर धुमाकूळ घातला

Akshata Chhatre

South actress Shalini viral photoshoot: दाक्षिणात्य अभिनेत्री शालिनीने नुकताच तिचा घटस्फोट अनोख्या पद्धतीने साजरा करून इंटरनेटवर धुमाकूळ घातला आहे. घटस्फोटाचा आनंद व्यक्त करण्यासाठी तिने खास फोटोशूट केले असून, त्याचे फोटो इंस्टाग्रामवर पोस्ट करताच ते वेगाने व्हायरल झाले आहेत. या फोटोशूटमध्ये ‘घटस्फोट' हा आयुष्याचा शेवट नसून ती एक नवी सुरुवात आहे, असा सकारात्मक संदेश तिने दिला आहे.

या फोटोशूटमधील एका फोटोत शालिनीने '99 problems but husband ain't one' (99 समस्या आहेत, पण नवरा हा नाही) असा मजकूर लिहिलेला फलक हातात धरला आहे, ज्यामुळे चाहत्यांमध्ये तिच्याबद्दलची उत्सुकता आणखी वाढली आहे. या फोटोसोबत तिने घटस्फोटित महिलांना उद्देशून एक खास संदेश लिहिला आहे. 'ज्यांना आपले म्हणणे व्यक्त करता येत नाही, अशा घटस्फोटित महिलांसाठी हा एक संदेश आहे,' असे तिने कॅप्शनमध्ये म्हटले आहे.

‘घटस्फोट म्हणजे अपयश नाही, ती एक नवीन सुरुवात’

आपल्या भावना व्यक्त करताना शालिनीने लिहिले आहे की, 'एखादे वाईट लग्न सोडणे चुकीचे नाही, कारण तुम्हाला आनंदी राहण्याचा अधिकार आहे. कधीही कमीत कमी गोष्टींवर समाधान मानू नका. आपल्या आयुष्याची सूत्रे हातात घ्या आणि स्वतःसाठी व तुमच्या मुलांसाठी चांगले भविष्य घडवण्यासाठी आवश्यक बदल करा.'

घटस्फोट म्हणजे अपयश नाही, तर तुमच्या आयुष्यातील एक महत्त्वाचे वळण आहे, असेही तिने म्हटले आहे. 'लग्नसोडून एकटी उभी राहण्यासाठी खूप हिंमत लागते. त्यामुळे माझ्या सर्व धाडसी महिलांना मी हे समर्पित करते,' असे सांगून तिने घटस्फोटाला सामोरे जाणाऱ्या महिलांना पाठिंबा दर्शवला आहे.

एका दुसऱ्या फोटोत शालिनीने घटस्फोटित लिहिलेली सॅश घातली असून, हातात फुगे पकडले आहेत. तिच्या या सकारात्मक भूमिकेचे सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर कौतुक होत आहे. अनेक युजर्सनी कमेंट सेक्शनमध्ये तिच्या या निर्णयाचे अभिनंदन केले आहे. आपल्या वैवाहिक जीवनाचा अंत झाल्याबद्दल शोक व्यक्त करण्याऐवजी तो साजरा करण्याचा तिचा निर्णय अनेकांना प्रेरणादायी वाटत आहे.

२०२० मध्ये विवाह, २०२३ मध्ये घटस्फोट

शालिनीने रियाजसोबत जुलै २०२० मध्ये लग्न केले होते. मात्र, २०२३ मध्ये त्यांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला आणि घटस्फोट घेतला. घटस्फोटानंतर शालिनी स्वतःच्या आनंदाच्या शोधात असून, तिच्या प्रवासाचे अनुभव सोशल मीडियावर शेअर करत असते. तिचे हे विचार इतरांनाही त्यांच्या आयुष्यात सकारात्मक बदल घडवण्यासाठी प्रेरित करत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

बसमधील प्रवाशाकडे सापडले एक कोटी रुपयांची रोकड, गोव्यातून बंगळुरुला करत होता प्रवास, हवालाचा पैसा असल्याचा संशय

VIDEO: 'वो स्त्री है... कुछ भी कर सकती है', 7 महिन्यांची प्रेग्नंट असूनही तिनं 145 किलो वजन उचललं, व्हिडिओ पाहून तुम्हीही मोटिव्हेट व्हाल

महाराष्ट्र – कर्नाटक सीमाप्रश्नी मोठी बातमी; महाराष्ट्राची मागणी सर्वोच्च न्यायालयाने केली मान्य, 8 वर्षांनी होणार सुनावणी

Taskin Ahmed Wicket: षटकार मारला, तरी पंचांनी दिलं आऊट; शेवटच्या ओव्हरमध्ये हाय-व्होल्टेज ड्रामा, मैदानात नेमकं काय घडलं? Watch Video

'राज्यभाषेचा दर्जा मिळाल्याशिवाय गप्प बसणार नाही', वाळपईत मराठी भाषाप्रेमींचे धरणे आंदोलन

SCROLL FOR NEXT