Keerthy Suresh Goa Wedding Dainik Gomantak
मनरिजवण

Keerthy Suresh Wedding: कीर्ती सुरेशच्या लग्नाचा मुहूर्त ठरलाय; 'या' दिवशी प्रियकरासोबत गोव्यात बांधणार लग्नगाठ

South Indian Actress Goa Wedding: कीर्ती सुरेश आणि अँटोनी थाटील गोव्यातील एका आलिशान रिसॉर्टमध्ये लग्न करणार आहेत

Akshata Chhatre

पणजी: दक्षिण चित्रपट सृष्टीतील एक नावाजलेला नाव म्हणजे कीर्ती सुरेश. डुलकर सलमान सोबतचा तिचा महानटी हा सिनेमा प्रचंड गाजला होता आणि यानंतर कीर्ती प्रसिद्दीच्या झोतात आली. गेल्या काही दिवसांपासून कीर्ती सुरेशच्या लग्नाच्या चर्चा बऱ्याच रंगल्या आहेत आणि आता 11 डिसेंबरला कीर्ती तिचा बॉयफ्रेंड अँटोनी थाटील याच्यासोबत गोव्यात लग्नगाठ बांधणार असल्याच्या बातम्या समोर येत आहेत.

माध्यमांना मिळालेल्या माहितीनुसार कीर्ती सुरेश आणि अँटोनी थाटील गोव्यातील एका आलिशान रिसॉर्टमध्ये लग्न करणार आहेत आणि हा सोहळा केवळ त्यांच्या घरच्यांसाठी तसेच जवळच्या मंडळींसाठी मर्यादित असेल. डेक्कन हेराल्ड या इंग्रजी वृत्तपत्राने दिलेल्या माहितीनुसार 9 डिसेंबर पासून कीर्तीच्या लग्न सोहळयाला सुरुवात होईल आणि पुढचे तीन दिवस हा विवाह सोहळा सुरु असेल.

दरम्यान दक्षिण चित्रपट सृष्टीतील काही दिग्गज कलाकार गोव्याला भेट देतील. रजनीकांत, धनुष, थलपती विजय, शिवकार्तिकेयन, नानी पवन कल्याण आणि इतर मंडळी कीर्तीच्या लग्नाला हजेरी लावणार आहेत.

यापूर्वी देखील कीर्ती सुरेश आणि संगीतकार अनिरुद्ध यांच्या प्रेमप्रकरणाच्या चर्चा केल्या जात होत्या आणि लवकरच दोघे लग्नगाठ बांधणार आहे अशा बातम्या उठत होत्या, मात्र कीर्ती आणि तिच्या वडिलांनी माध्यमांसमोर येत यात काहीही तथ्य नसल्याची माहिती दिली होती.

तसेच कीर्ती अनिरुद्ध केवळ तिचा चांगला मित्र असल्याचं म्हणाली होती. 25 डिसेंबर रोजी कीर्ती आणि वरुण धवन यांचा बेबी जॉन नावाचा एक चित्रपट प्रदर्शित होणार आहे आणि यामधून कीर्ती पहिल्यांदा बॉलीवूडच्या क्षेत्रात पदार्पण करेल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Live News: मॅन्ग्रोव्ह डे निमित्त, सरकारी हायस्कूल मर्सेसने 'मातृशक्ती क्लब'चे केले उद्घाटन

Thailand Cambodia Conflict: 32 ठार, 58 हजार स्थलांतरीत; थायलंड-कंबोडिया सीमेवरील तणाव, न्यूयॉर्कमध्ये बंद दाराआड बैठक

Quepem: भले मोठे झाड कोसळले, घराच्या 6 खोल्या जमीनदोस्त; केपेतील दुर्घटनेत मोठ्या प्रमाणात नुकसान

Goa Monsoon Flowers: 'सोनेरी हरणा, गुलाबी तेरडे, शुभ्र तुतारी'! श्रावणातील फुलांचा अवर्णनीय सोहळा

Khazan Farming: गोव्यातील शेकडो वर्षांपूर्वीची परंपरा धोक्यात! खारफुटींचे अतिक्रमण वाढले; खाजन शेती मरणासन्न

SCROLL FOR NEXT