Goa Classical Music Dainik Gomantak
मनरिजवण

Goa Classical Music: ‘स्मरण पूर्वसूरींचे’! शास्त्रीय संगीताच्या मैफिलीत फातर्फेकर रममाण झाले

Indian Classical Tribute: देवी शांतादुर्गा कुंकळकरीण मंदिराच्या मागील बाजूस, सन 1920मध्ये बांधलेल्या वास्तूत जवळजवळ 60-65 वर्षानंतर शास्त्रीय संगीताची मैफिल सजली आणि फातर्फेकर कुटुंबीय गत स्मृतीत रममाण झाले.

गोमन्तक डिजिटल टीम

Smaran Purvasuriche Tribute To Classical Maestros Of Goa

गोवा यांच्यातर्फे शास्त्रीय संगीतात आपल्या अभूतपूर्व कामगिरीमुळे संपूर्ण भारतात व जगभर लोकप्रिय ठरलेल्या गोमंतकीय कलाकारांचे स्मरण एका आगळ्या वेगळ्या तऱ्हेने करण्यासाठी  कला अकादमीच्या भारतीय संगीत व नृत्य विभागाने ‘स्मरण पूर्वसूरींचे’ हा एक विशेष उपक्रम हाती घेतला आहे. या उपक्रमाची सुरुवात 19 फेब्रुवारी  2025 रोजी दक्षिण गोव्यातील फातर्फे गावातील विदुषी सरस्वतीबाई फातर्फेकर यांच्या वास्तूत  झाली. देवी शांतादुर्गा कुंकळकरीण मंदिराच्या मागील बाजूस,  सन 1920मध्ये  बांधलेल्या वास्तूत जवळजवळ 60-65 वर्षानंतर  शास्त्रीय संगीताची मैफिल सजली आणि फातर्फेकर कुटुंबीय गत स्मृतीत रममाण झाले.

आग्रा घराण्याच्या ख्यातनाम गायिका उस्ताद विलायत हुसेन खान यांच्या शिष्या विदुषी सरस्वतीबाई फातर्फेकर यांना आदरांजली व्यक्त करण्यासाठी व त्यांच्या सांगीतिक कारकिर्दीची माहिती विद्यार्थ्यांना व्हावी हा या  कार्यक्रमाचा हेतू होता. सुरेल संगीत आणि सखोल चर्चेचा सुंदर संगम या सांगीतिक सोहळ्यात अनुभवायला मिळाला. भारतीय शास्त्रीय संगीताच्या समृद्ध परंपरेला उजाळा देणार्‍या आणि संगीतप्रेमींना एकत्र आणणार्‍या या विशेष संगीत मैफलीचे यजमानपद फातर्फेकर कुटुंबीयांनी भूषवले.

कार्यक्रमाचा आरंभ दीपप्रज्वलन आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून झाली. यावेळी, विस्मृतीत गेलेल्या सुप्रसिद्ध गोमंतकीय शास्त्रीय गायिका  विदुषी . सरस्वतीबाई फातर्फेकर यांच्या योगदानाचा गौरव करण्यासाठी त्यांची प्रतिमा पूजनीय सन्मानाने अलंकृत करण्यात आली होती. या विशेष  कार्यक्रमात भारतीय शास्त्रीय संगीताच्या संवर्धन  व नव्या पिढीला या संगीतातील बारकावे समजावून देण्याच्या आवश्यकतेवर चर्चा करण्यात आली. या चर्चेत संगीत क्षेत्रातील मान्यवर, अभ्यासक, विद्यार्थी आणि रसिकांनी सहभाग घेतला.

यश आपटे यांच्या बासरीवादनाने सभेची सुरेल सुरुवात झाली. राग वृंदावनी सारंग त्यांनी  पेश केला. त्यांना तबला संगत भार्गवराम गर्दे यांनी केली. त्यानंतर कौस्तुभ चारी यांनी स्वतंत्र तबलावादनात, ताल तिनताल उत्कृष्टरित्या सादर केला. त्यांना नागमसाथ चारुदत गावस यांनी केली. याप्रसंगी कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे जनार्दन वेर्लेकर यांनी विदुषी सरस्वतीबाई फातर्फेकर यांच्या विषयी दुर्मिळ माहिती सांगितली. गुरुनाथ फातर्फेकर यांनीही आपल्या आत्याविषयी व समकालीन  गायिकांविषयी अनेक किस्से यावेळी सांगितले. उस्ताद विलायत हुसेन खान यांची तालिम तसेच सरस्वती बाईच्या अनेक कार्यक्रमातील आठवणी त्यांनी उलगडून दाखविल्या. आपल्या संग्रहातील बाईंच्या ग्रामोफोन रेकॉर्ड व इतर संगीतविषयक पुस्तकांची माहिती देत विद्यार्थी व आमंत्रित रसिकांशी त्यांनी मनसोक्त संवाद साधला.

सम्राज्ञी आईर यांच्या शास्त्रीय गायनाने या मैफिलीची सांगता झाली. त्यांनी  पुरीया कल्याण रागात सुरुवातीला पारंपरिक विलंबित ख्याल तदनंतर द्रुत बंदिश सादर केली व शेवटी अभंग गाऊन सांगता केली. त्यांना तबला संगत सूरज मोरजकर व हार्मोनियम साथ चारुदत गावस यांनी केली. सचिन तेली यांनी या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन  केले. सुनील फातर्फेकर यांनी कुटुंबियांच्या वतीने  आभार व्यक्त करताना या कार्यक्रमामुळे आपण व कुटुंबीय  अतिशय भारावून गेल्याचे नमूद केले. अंती सरस्वती बाईंनी गायलेली राग बसंतची ग्रामोफोन रेकॉर्ड वाजवून कार्यक्रमाची सांगता झाली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Islamic State Rebels Attack: कांगोमध्ये रक्तपात! चर्चवरील हल्ल्यात 21 जणांचा मृत्यू, IS समर्थित दहशतवाद्यांचा हात

IND vs ENG 4th Test: गिल-राहुलचा मोठा पराक्रम! इंग्लंडच्या भूमीवर रचला नवा इतिहास, मोडला 23 वर्ष जुना रेकॉर्ड

Viral: मास्तर बनला प्रभु देवा...मुकाबला गाण्यावर केला जबरदस्त डान्स; पोरं झाली थक्क, WATCH VIDEO

Shravan Somvar 2025: मन:शांती आणि समस्यामुक्तीसाठी श्रावण सोमवार; जाणून घ्या रुद्राभिषेकाचे महत्त्व आणि सोपी पद्धत

Goa Village Tourism: "आम्हाला प्रकल्प हवाच!" सुर्ला ग्रामस्थांकडून इको-टुरिझमचे स्वागत; शासनाच्या प्रकल्पाला ग्रामसभेचा पाठिंबा

SCROLL FOR NEXT