Classical Music Festivals : कुडणेत उद्या पंडित श्रीपादबुवा माडये शास्त्रीय संगीत महोत्सव

Classical Music Festivals : उद्‌घाटन सोहळ्यात ज्येष्ठ महिला भजनी कलाकार जयंती मळीक, प्रतिभा मळीक आणि सुशीला नाईक यांचा सत्कार करण्यात येणार आहे.
Classical Music Festivals
Classical Music FestivalsDainik Gomantak
Published on
Updated on

Classical Music Festivals : डिचोली, कुडणे येथे शनिवारी (ता. ३०) संध्याकाळी ७ वाजता श्री रामपुरुष देवस्थानात स्व. पंडित श्रीपादबुवा माडये शास्त्रीय संगीत महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.

माडये यांनी गोव्यामध्ये अनेक वर्षे शास्त्रीय संगीताचे ज्ञानदान करून अनेक कलाकार घडविण्याचे महान कार्य केले. अशा या महान कलाकाराच्या स्मृतींना उजाळा देण्यासाठी त्यांचे ज्येष्ठ शिष्य रामचंद्र नाईक आणि शिष्यपरिवाराने या महोत्सवाचे आयोजन केले आहे.

महोत्सवाचे उद्‌घाटन राधाकृष्ण संगीत अकादमीचे अध्यक्ष प्रा. संतोष मळीक यांच्या हस्ते होईल. यावेळी कुडणेच्या उपसरपंच पूर्वा मळीक, संगीत कलाकार जयेश मळीक, रामपुरुष देवस्थानचे उपाध्यक्ष नरेश जल्मी,

कुडणेचे माजी सरपंच ॲड. महेंद्र एकावडे, रामचंद्र नाईक, अनिल जल्मी, दत्ताराम माडकर आणि मान्यवर उपस्थित राहणार आहेत. उद्‌घाटन सोहळ्यात ज्येष्ठ महिला भजनी कलाकार जयंती मळीक, प्रतिभा मळीक आणि सुशीला नाईक यांचा सत्कार करण्यात येणार आहे.

Classical Music Festivals
Vasco News: बेंच प्रेस चॅम्पियन मनीषा गिरपचा वास्कोत गौरव

शास्त्रीय सांगितिक कार्यक्रमामध्ये विजय शिरोडकर, अनुजा नाईक, अनुष्का नाईक, सागर गावस, अवी परवार आणि रामचंद्र नाईक यांचे शास्त्रीय गायन होणार आहे. या कलाकारांना कार्तिक च्यारी, दिगंबर गावस,

सुजन सावंत, भास्कर गावस हे हार्मोनियमवर तर कुंदन नाईक, वासुदेव च्यारी, दिगंबर वेळगेकर तबला साथ करणार आहेत. सूत्रसंचालन संजय सालेलकर आाणि प्रेमनाथ गावडे करणार आहेत. राज मडगावकर ध्वनी संकलनाची बाजू सांभाळणार आहेत. रसिकांनी या महोत्सवाला मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन श्री रामपुरुष देवस्थानने केले आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com