Sayami Kher Ironman 70.3 Dainik Gomantak
मनरिजवण

Saiyami Kher: 'आरोग्य चांगले नसेल, तर पैसा असून काहीच फायदा नसतो'! Ironman 70.3 स्पर्धेची सदिच्छादूत अभिनेत्री 'सैयामी'चे प्रतिपादन

Saiyami Kher Ironman 70.3: सुरवातीला सैयामी पूर्ण मॅरेथॉनमध्ये धावली. तेथूनच तिचा साहस क्रीडा प्रकारांतील सहभाग सुरू झाला. त्यामुळे ती आपले मन स्थिर करू शकली.

Kishor Petkar

किशोर पेटकर

खचलेल्या, निराशाग्रस्त मानसिकतेतून बाहेर येण्यासाठी खेळाची मदत होऊ शकते काय? सैयामी खेर हिचे उत्तर ‘हो’ असेचा आहे. ३३ वर्षीय सैयामी खेर अभिनेत्री आहे, तिने हिंदी आणि तेलगु चित्रपटांत काम केले आहे, तिच्या कामाचे कौतुकही झाले आहे, ती साहस खेळातही सक्रिय असते, युरोपात तिने आयर्नमॅन ७०.३ या खडतर स्पर्धेतही भाग घेतला आहे. एका अभिनेत्रीच्या जीवनात साहस खेळाचे काम काय?

साहस खेळ सैयामीच्या जीवनात अनपेक्षितपणे आले. त्या विषयी सैयामी सांगते, ``२०१६ मध्ये माझा  हिंदी पदार्पणातील चित्रपट आला. राकेश मेहरा दिग्दर्शित तो चित्रपट खूप मोठा होता, भरपूर अपेक्षा होत्या, पण बॉक्स ऑफिसवर चित्रपट चालू शकला नाही. माझ्यासाठी तो धक्का होता आणि चित्रपट अपयशी ठरल्यानंतर डोकं शांत ठेवणे आवश्यक होते. खचलेल्या, निराशाग्रस्त मानसिकतेतून बाहेर येण्यासाठी मी साहस खेळांवर लक्ष केंद्रित केले.’

सुरवातीला सैयामी पूर्ण मॅरेथॉनमध्ये धावली. तेथूनच तिचा साहस क्रीडा प्रकारांतील सहभाग सुरू झाला. त्यामुळे ती आपले मन स्थिर करू शकली. ती म्हणते, ‘शर्यतीत मी कधीच अव्वल येण्याचे ध्येय बाळगले नाही. माझ्यासाठी शर्यत पूर्ण करणे हीच मोठी उपलब्धी होती. बहुतेक हौशी खेळाडू क्रमांकाचा ध्यास धरत नाहीत, तर शर्यत पूर्ण करण्यास प्राधान्यक्रम देतात. अगोदरच्या तुलनेत चांगली कामगिरी करण्याचे उद्दिष्ट बाळगतात.

पूर्ण मॅरेथॉननंतर मी आयर्नमॅन ७०.३मध्ये भाग घेऊ लागले. या जगात, चित्रपट दुनियेभोवताली असलेल्या साऱ्या नकारात्मकतेवर मात करण्यासाठी माझ्यासाठी हे खेळ चांगले थेरपी ठरले.’ नकारांना सामोरे जात असताना अशातऱ्हेने आयर्नमॅनमधील सहभागाने तिच्यात विजेती भावना तयार होऊ लागली.

येत्या रविवारी (ता. ९) रोजी मिरामार येथे होणाऱ्या आयर्नमॅन ७०.३ स्पर्धेची ती सदिच्छादूत आहे. आगामी चित्रपटाच्या चित्रिकरणामुळे गोव्यातील १.९ किलोमीटर जलतरण, ९० किलोमीटर सायकलिंग व २१.१ किलोमीटर धावणे या तीन  क्रीडाप्रकारांचा एकत्रित समावेश असलेल्या या स्पर्धेत ती भाग घेऊ शकणार नाही, पण स्पर्धकांचे मनोबल उंचावण्यासाठी ती सक्रिय असेल. 

आरोग्य अतिशय मौल्यवान

सैयामी उत्तम आरोग्याबाबत अतिशय जागरूक आहे. कामात व्यस्त असली, तरी तंदुरुस्तीसाठी ती आवर्जून वेळ काढते. याविषयी ती म्हणते, ``मध्यरात्री दोन वाजता चित्रिकरण करूनही मी वेळेचे व्यवस्थापन करायला शिकले आहे. तुम्हीही नक्कीच ते करू शकता. सरावासाठी दिवसाला एक किंवा दोन तास नक्कीच देऊ शकता. काही लोक वेळ नाही ही फक्त सबब पुढे करतात. तुम्ही कोणत्याही व्यवसायात असू द्या, वेळेचे नियोजन करायलाच हवे, कारण आरोग्य अतिशय मौल्यवान आहे. तुम्ही भरपूर पैसा कमवू शकता, पण आरोग्य चांगले नसेल, तर पैसा असून काहीच फायदा नसतो.``

सैयामी खेर

२९ जून १९९२ रोजी महाराष्ट्रातील नाशिकमध्ये जन्मलेली सैयामी खेर ही मराठी मुलगी आहे. गोव्यातील आयर्नमॅन ७०.३ स्पर्धेची माहिती देणाऱ्या पत्रकार परिषदेत, मराठी भाषेचा अभिमान प्रदर्शित करताना ती काहीवेळ आपल्या मायभाषेत बोलली. तिचे वडील अद्वैत खेर हे मॉडेल होते, तर आई उत्तरा या १९८२ मध्ये फेमिना मिस इंडिया होत्या.

सैयामीची आजी उषा किरण या त्यांच्या काळातील नावाजलेल्या अभिनेत्री होत्या, तर आत्या तन्वी आझमी यांनीही अभिनयात ठसा उमटविला आहे. चित्रपटसृष्टीत येण्यापूर्वी सैयामी हिने मॉडेलिंगही केलेले आहे, किंगफिशर कॅलेंडरवरही ती झळकली आहे. २०१५ मध्ये रे (Rey) हे तिचा पहिला तेलुगू चित्रपट होता, तर हिंदी चित्रपटसृष्टीत २०१६ मध्ये मिर्झया (Mirzya) या चित्रपटाद्वारे पदार्पण केले. २०१८ मध्ये माऊली हा तिचा पहिला मराठी चित्रपट ठरला. २०२३ मध्ये ती घूमर या चित्रपटात झळकली होती. चित्रपट, आयर्नमॅन ७०.३ सारख्या साहस खेळांबरोबरच ती रंगभूमीवर तसेच फिटनेसविषयक बाबींत व्यस्त असते. 

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

समुद्री मार्ग झाला खुला! 7 वर्षांनंतर मुरगाव पोर्टवर सुरू होणार कंटेनर सेवा, निर्यातदारांना मोठा दिलासा

World Record! 11 चेंडूत 8 षटकार... युवा फलंदाजानं ठोकलं सर्वात जलद अर्धशतक, स्फोटक फलंदाजीचा VIDEO पाहाच

Viral Video: 'ओंकार' हत्तीची शेतात अचानक एन्ट्री... म्हशींनी जीव वाचवण्यासाठी ठोकली धूम, सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल

Gujarat ATS Foils Terror Plot: मोठा दहशतवादी कट उधळला! गुजरात एटीएसने अहमदाबादमध्ये शस्त्रसाठ्यासह तिघांना ठोकल्या बेड्या; दहशतवादी नेटवर्क हादरले VIDEO

मासेविक्री बाजाराची दुरवस्था कायम, माशांच्या तुटवड्याने दर गगनाला भिडले; विक्रेत्यांचा SGPDA वर संताप

SCROLL FOR NEXT