Ironman 70.3 Goa India: गोव्यात रविवारी रंगणार आयर्नमॅन स्पर्धेचा थरार; 31 देशातील 1,300 स्पर्धक घेणार सहभाग

Ironman 70.3 Goa India 2025: आयर्नमॅन स्पर्धेत १.९ किमी पोहणे, ९० किमी चायकल चालवणे आणि २१.१ किमी धावणे यांचा समावेश असतो.
Ironman 70.3 Goa 2025 Schedule/ Time Table
Ironman 70.3 Goa 2025Dainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: शारीरिक क्षमतांचा कस पाहणारी जगातील एक आव्हानात्मक आयर्नमॅन स्पर्धा रविवारी (०९ नोव्हेंबर) गोव्यात रंगणार आहे. दरवर्षी प्रमाणे मिरामार येथून स्पर्धेचा शुभारंभ होईल. या स्पर्धेत ३१ देशातील १,३०० स्पर्धेक सहभागी होणार आहेत.

आयर्नमॅन ७०.३ स्पर्धेचा हा पाचवा अंक असून, ०९ नोव्हेंबर रोजी याचा मिरामार येथून शुभारंभ होईल. स्पर्धेसाठीची जर्सी आणि मेडलचे आज अनावरण करण्यात आले. यावेळी बॉलीवूड अभिनेत्री सयामी खैर उपस्थित होती. स्पर्धा जागतिक स्तरावर पोहोचली असून, जगभरातून याला उदंड प्रतिसाद मिळत असल्याचे मत यावेळी स्पर्धेच्या आयोजकांनी व्यक्त केले.

Ironman 70.3 Goa 2025 Schedule/ Time Table
BJP X INC Goa: काँग्रेस विद्यार्थी संघटनेने दामू नाईकांसाठी बुक केली मानसोपचारतज्ज्ञांची अपॉइंटमेंट

योस्का, गोवा सरकार आणि आयर्नमॅन यांच्या संयुक्त विद्यमाने ही स्पर्धा आयोजित केली जाणार आहे. मिरामार येथील समुद्रात पोहणे या स्पर्धेच्या पहिल्या टप्प्यापासून याची सुरुवात होईल.

“आयर्नमॅनसारखी स्पर्धा गोव्यात आयोजित केली जातेय हा राज्य जागतिक पातळीवर पर्यटन हब म्हणून नावारुपास येत असल्याचं उदाहरण आहे”, असे गोवा पर्यटन संचालक केदार नाईक म्हणाले.

Ironman 70.3 Goa 2025 Schedule/ Time Table
मटका म्हणजे काय? पुराव्यांअभावी मडगाव कोर्टाकडून संशयिताची निर्दोष सुटका

2024 मध्ये झालेल्या या आव्हानात्मक स्पर्धेत भारतीय सैन्यदलातील बिश्वरजीत सिंग सायकोम यांनी पुरुष गटात बाजी मारली होती. बिश्वरजीत यांनी 4:47:47 या वेळेत ही स्पर्धा पूर्ण करुन अव्वल स्थान पटकावले होते. तर, स्पनेच्या जेकीन बेरल याने 4:48:09 या वेळेसह दुसरा क्रमांक पटकावला तर इजिप्तच्या अहमद इराकीने 4:49:10 वेळेस तिसरा क्रमांक पटकावला होता.

अशी असते आयर्नमॅन स्पर्धा

आयर्नमॅन स्पर्धा ही जगातील एक आव्हानात्मक स्पर्धा म्हणून प्रसिद्ध आहे. या स्पर्धेत स्पर्धकांच्या शरीरिक क्षमेचा कस लागतो. यात १.९ किमी पोहणे, ९० किमी चायकल चालवणे आणि २१.१ किमी धावणे यांचा समावेश असतो. यावर्षी या स्पर्धेला ३१ देशातील १,३०० स्पर्धेक सहभागी होणार आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com