Goa Road Closure: गोव्यातील 'हा' रस्ता राहणार बंद! प्रवाशांना बसणार मोठा फटका; पर्यायी मार्ग जाणून घ्या..

Goa NH66 road closure: पर्वरी आराडी चौक (खांब क्रमांक ८, सुकूर) पासून सांगोल्डा बायपास (खांब क्रमांक १६) पर्यंतचा राष्ट्रीय महामार्ग पूर्णपणे बंद राहणार आहे.
Goa Road Closure
Soccoro Road ClosureDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: राष्ट्रीय महामार्ग-६६ वरील सुकूर ते सांगोल्डा या उजव्या बाजूचा (दक्षिणेकडील) मार्ग १७ रोजी मध्यरात्रीपासून ते १५ नोव्हेंबरपर्यंत संपूर्ण बंद राहिल, असे सार्वजनिक बांधकाम खात्याने जाहीर केले आहे.

यामुळे पणजी म्हापसा मार्गावरील प्रवाशांना मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. हा बंदोबस्त सहा-लेन उड्डाणपुलाच्या बांधकामासाठी ‘प्रीकास्ट सेगमेंट्स’ लाँचिंगचे महत्त्वपूर्ण काम सुरळीत करण्यासाठी करण्यात आला आहे.

Goa Road Closure
Goa Road: गोव्यात 5 वर्षांसाठी केलेले रस्ते, एका पावसात वाहून जातात! कंत्राटदाराच्या नावाने रडून उपयोग काय?

या काळात वाहनांची संपूर्ण वाहतूक थांबवून काम अडथळाविरहित व सुरक्षितपणे पूर्ण करण्याचा उद्देश असल्याचेही खात्याने स्पष्ट केले आहे. पर्वरी आराडी चौक (खांब क्रमांक ८, सुकूर) पासून सांगोल्डा बायपास (खांब क्रमांक १६) पर्यंतचा राष्ट्रीय महामार्ग पूर्णपणे बंद राहणार आहे.

Goa Road Closure
Calangute Bad Road: कळंगुटमधील खड्डेमय रस्ते प्रवाशांसाठी ठरतायेत जीवघेणे; प्रशासनाच्या दुर्लक्षाने वाढला धोका VIDEO

या संपूर्ण भागात कोणत्याही प्रकारची वाहने चालविण्यास परवानगी दिली जाणार नाही. पर्यायी मार्ग म्हणून पणजीहून म्हापसाकडे जाणारी वाहतूक ओ’कोकेरो चौकात वळवून चोगम रोडमार्गे वळविली जाणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com