Drishyam 3 controversy  Dainik Gomantak
मनरिजवण

"घरी बसला तेव्हा मी काम दिलं", 'Drishyam 3 ' मधून अक्षय खन्ना आउट; निर्माते कुमार मंगत संतापले; कायदेशीर कारवाईची दिली धमकी

Drishyam 3 Akshaye Khanna: 'दृश्यम २' मध्ये आयजी थॉमस ब्रुगांझा ही महत्त्वाची भूमिका साकारणारा अभिनेता अक्षय खन्ना आता या चित्रपटाचा भाग नसेल

Akshata Chhatre

Akshaye Khanna dropped from Drishyam 3: बॉलिवूडमधील सर्वात यशस्वी सस्पेन्स थ्रिलर फ्रँचायझी 'दृश्यम'च्या तिसऱ्या भागाची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत. मात्र, चित्रपटाचे शूटिंग सुरू होण्यापूर्वीच एका मोठ्या वादाने डोके वर काढले. 'दृश्यम २' मध्ये आयजी थॉमस ब्रुगांझा ही महत्त्वाची भूमिका साकारणारा अभिनेता अक्षय खन्ना आता या चित्रपटाचा भाग नसेल, यावर निर्माते कुमार मंगत यांनी शिक्कामोर्तब केले आहे. इतकेच नव्हे, तर त्यांनी अक्षय खन्नाच्या वागणुकीवर कडक शब्दांत ताशेरे ओढलेत.

विगचा हट्ट आणि दिग्दर्शकाचा नकार

या वादाचे मुख्य कारण म्हणजे अक्षय खन्नाने चित्रपटात 'विग' घालण्याचा धरलेला अट्टाहास. कुमार मंगत यांनी दिलेल्या बॉलीवूड हंगामाला दिलेल्या माहितीनुसार, अक्षयला या चित्रपटात विग घालून काम करायचे होते जेणेकरून तो अधिक 'स्मार्ट' दिसेल.

मात्र, दिग्दर्शक अभिषेक पाठक यांनी याला स्पष्ट नकार दिला. त्यांच्या मते 'दृश्यम ३' हा सिक्वेल असल्याने पात्राच्या लूकमध्ये सातत्य असणे गरजेचे आहे.

दुसऱ्या भागात अक्षय ज्या लूकमध्ये होता, तसाच तो तिसऱ्या भागात दिसणे तांत्रिकदृष्ट्या आवश्यक होते. सुरुवातीला अक्षय तयार झाला, पण नंतर काही लोकांच्या सल्ल्यामुळे त्याने पुन्हा विगची मागणी केली आणि शेवटी चित्रपट सोडण्याचा निर्णय घेतला.

निर्मात्यांचा जहरी वार: "तो सुपरस्टार नाही"

अक्षय खन्नाच्या या निर्णयामुळे निर्माते कुमार मंगत प्रचंड संतापले आहेत. त्यांनी अभिनेत्याच्या व्यावसायिकतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. मंगत म्हणाले, "एक काळ होता जेव्हा अक्षयकडे काहीच काम नव्हते. मी त्याला 'सेक्शन ३७५' आणि 'दृश्यम २' मध्ये संधी दिली.

'दृश्यम २' नंतरच त्याला मोठे ऑफर्स मिळाले, त्यापूर्वी तो ३-४ वर्षे घरी बसून होता." तसेच, अक्षयचे अलीकडचे 'धुरंधर' किंवा 'छावा' सारखे चित्रपट हे रणवीर सिंग आणि विक्की कौशल यांसारख्या मोठ्या स्टार्समुळे चालले आहेत, अक्षयमुळे नाही, असा टोलाही त्यांनी लगावला.

कायदेशीर कारवाई आणि सेटवरील 'टॉक्सिक' वातावरण

निर्मात्यांनी अक्षय खन्नावर कायदेशीर कारवाई करण्याची तयारी दर्शवली आहे. करार झालेला असताना आणि फी ठरलेली असताना शेवटच्या क्षणी अशा प्रकारे चित्रपट सोडणे चुकीचे असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. यासोबतच अक्षयची सेटवरील वागणूक 'टॉक्सिक' असते, असा खळबळजनक दावाही मंगत यांनी केला आहे. 'सेक्शन ३७५' च्या वेळीही अनेकांनी त्याच्यासोबत काम न करण्याचा सल्ला दिला होता, असेही त्यांनी नमूद केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Pakistan Cricket Team: पाकिस्तान संघात पुन्हा एकदा मोठा फेरबदल! सलमान आगाची कॅप्टन्सी जाणार; 'या' खेळाडूकडे सोपवली जाणार संघाची कमान

Shani Gochar 2026: मोठ्या व्यावसायिक डील अन् पदोन्नतीचा योग! 9 ऑक्टोबरपासून उजळणार 5 राशींचं नशीब; शनीचं नक्षत्र परिवर्तन ठरणार वरदान

Viral Post: सकाळी ऑफिसमध्ये वेलकम, तर दुपारी थेट नोकरीवरून काढलं; जॉइनिंगच्या अवघ्या 4 तासांत महिलेसोबत नेमकं काय घडलं? पोस्ट व्हायरल

सनरूफ, 360-डिग्री कॅमेरा, 10.25 इंच स्क्रीन... Maruti Dzireला टक्कर देण्यासाठी येतेय Tataची नवी Aeris; शुक्रवारी होणार लॉन्च

Asian Games 2026: Chak De India! वादळी खेळाच्या जोरावर भारतानं दक्षिण कोरियाला 8-2 ने लोळवलं; सेमीफायनलचं तिकीट जवळपास पक्कं

SCROLL FOR NEXT