Parineeti Chopra In Goa
पणजी: 'इशकजादे' फेम परिणीती चोप्रा आगामी चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. खास बाब म्हणजे परिणीती तिच्या नव्या प्रोजेक्टसाठी गोव्यात आली आहे. अभिनेत्री या प्रोजेक्टसाठी नाईट शिफ्ट करत आहे, अशी माहिती परिणीतीने सोशल मीडियावरुन दिली. शूटिंगची माहिती तिने इंस्टाग्रामच्या स्टोरी सेक्शनवरुन दिलीय.
'चला नाईट शिफ्ट करूया', असे परिणीतीने स्टोरीला ठेवलेल्या फोटोला कॅप्शन दिले आहे. त्या परिणीतीने तिचा एक फोटो पोस्ट केला आणि 'मी 8 तास झोपले, पण असे वाटले की मी फक्त 4 तास झोपले,' असे म्हटले आहे.
परिणीती चोप्राच्या नुकतेच इम्तियाज अली दिग्दर्शित 'अमर सिंग चमकीला' या बायोपिकमध्ये दिसली होती. परिणीतीकडे अजून बरेच चित्रपट आहेत. अनुराग सिंगच्या दिग्दर्शनाखाली बनत असलेल्या मोस्ट अवेटेड थ्रिलर 'सनकी'चाही या यादीत समावेश आहे. या चित्रपटात चोप्रासोबत वरुण धवन दिसणार आहे.
याशिवाय परिणीती करण शर्मा दिग्दर्शित 'शिद्दत 2' चित्रपटात देखील दिसणार आहे. या चित्रपटात त्याच्यासोबत सनी कौशल आणि अमायरा दस्तूर मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. शिद्दत 2 पुढील वर्षाच्या सुरुवातीला रिलीज होऊ शकतो. चित्रपट निर्मात्यांनी अद्याप रिलीजची तारीख जाहीर केलेली नाही. चित्रपटाच्या पहिल्या भागात कौशल, मोहित रैना, डायना पेंटी, अर्जुन सिंग आणि राधिका मदन यांच्या भूमिका आहेत.
दरम्यान, परिणीती चोप्राने अलिकडेच स्वतःचा ब्लॉग देखील सुरू केला आहे, ज्याची एक झलक तिने Instagram Account वरुन दिली आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.