Awarapan 2 Teaser  Dainik Gomantak
मनरिजवण

Awarapan 2: 'व्हिंटेज इम्रान' परतला! वाढदिवशी चाहत्यांना धमाकेदार भेट; 18 वर्षांनंतर येणार अवारापन-2

Emraan Hashmi: इम्रानने त्याच्या 46 व्या वाढदिवसाच्या निमित्ताने ही घोषणा केली, ज्यामुळे चित्रपटसृष्टीत आणि चाहत्यांमध्ये आनंदाची लाट पसरली आहे

Akshata Chhatre

Emraan Hashmi announces Awarapan 2

इम्रान हाश्मीच्या चाहत्यांसाठी मोठी बातमी समोर आलीये. 2007 साली प्रदर्शित झालेल्या आणि आजही प्रेक्षकांच्या मनात घर करून असलेल्या 'अवारापन' या चित्रपटाचा सिक्वेल 'अवारापन 2' लवकरच चिनेप्रेमींच्या भेटीला येणार आहे. 3 एप्रिल 2026 रोजी प्रदर्शित होणाऱ्या या चित्रपटाचा सगळीकडेच बोलबाला सुरु झालाय. इम्रानने त्याच्या 46 व्या वाढदिवसाच्या निमित्ताने ही घोषणा केली, ज्यामुळे चित्रपटसृष्टीत आणि चाहत्यांमध्ये आनंदाची लाट पसरली आहे.

'अवारापन' चित्रपटाने सुरुवातीला बॉक्स ऑफिसवर अपेक्षित यश मिळवले नसले, तरी कालांतराने या चित्रपटाने एक 'कल्ट क्लासिक' म्हणून ओळख निर्माण केली. चित्रपटाची दमदार कथा, इम्रान हाश्मीचा प्रभावी अभिनय, चित्रपटातील संगीत आणि जबरदस्त ऍक्शन सीक्वेन्स यामुळे हा चित्रपट प्रेक्षकांच्या मनावर राज्य करतोय. 18 वर्षांपासून चाहते या चित्रपटाच्या सिक्वेलची मागणी करत होते आणि अखेर इम्रानने त्यांची इच्छा पूर्ण केली.

आपल्या वाढदिवसाच्या निमित्ताने इम्रानने सोशल मीडियावर एक खास पोस्ट शेअर केली. "तुम्ही लोकं गेल्या 18 वर्षांपासून ज्याची मागणी करत होतात, ती भेट तुमच्यासाठी. थोडा उशीर झाला, पण मी तुमच्या सर्व पोस्ट वाचतो," असे म्हणत त्याने चाहत्यांना धन्यवाद दिला. इम्रानने 'अवारापन' चित्रपटाचा एक प्रोमो शेअर करत, "बस मुझे कुछ और देर जिंदा रख 3 एप्रिल 2026 रोजी चित्रपटगृहात," अशी घोषणा त्याने केलीये.

चाहत्यांनी या घोषणेवर जोरदार प्रतिक्रिया दिल्या. "इम्रानने वाढदिवशी धमाका केला," "कृपया या चित्रपटाची लेगसी खराब करू नका," "व्हिंटेज इम्रान हाश्मी परतला," अशा प्रकारच्या प्रतिक्रिया चाहत्यांकडून व्यक्त केल्या जातायत.

'अवारापन 2' चे दिग्दर्शन नितीन कक्कर करणार आहेत आणि विशेष भट्ट या चित्रपटाचे निर्माते आहेत. मूळ चित्रपटाचे दिग्दर्शन मोहित सुरी यांनी केले होते आणि मुकेश भट्ट यांनी विशेष फिल्म्सच्या बॅनरखाली त्याची निर्मिती केली होती. 'अवारापन'मध्ये इम्रानने शिवम नावाच्या एका गुंडाची भूमिका साकारली होती.

या भूमिकेसाठी त्याला खूप प्रशंसा मिळाली. चित्रपटात आशुतोष राणा, मृणालिनी शर्मा आणि श्रिया शर्मा यांच्याही महत्त्वपूर्ण भूमिका होत्या. 'अवारापन 2' च्या कलाकारांबद्दल आणि इतर माहिती अद्याप गुलदस्त्यात आहे, पण या चित्रपटाच्या घोषणेनेच चाहत्यांमध्ये प्रचंड उत्सुकता निर्माण केली आहे. 3 एप्रिल 2026 रोजी 'अवारापन 2' प्रदर्शित होणार आहे, त्यामुळे इम्रानचे चाहते आतापासूनच या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Opposition Alliance: जनतेचे ऐका, महाआघाडी करा! दसऱ्यापर्यंत निर्णय घेण्याची सरदेसाईंची काँग्रेसकडे मागणी

खरी कुजबुज: बाबू पुन्हा आक्रमक...

8th Pay Commission: सरकारी कर्मचाऱ्यांचा पगार थेट 69,000 रूपये होणार? 8व्या वेतन आयोगासमोर 3.833 फिटमेंट फॅक्टरची मागणी

CJP Protest Delhi: आंदोलकांवरील निर्बंधांवर सर्वोच्च न्यायालयाची पोलिसांना चपराक! रस्ते, मेट्रो आणि इंटरनेट सेवा पूर्ववत करण्याचे आदेश; प्रशासनाचे दणाणले धाबे

Stray Dogs Beach: समुद्रकिनाऱ्यांवरील भटक्या कुत्र्यांची दहशत मोडून काढणार! पर्यटन खात्याचा 15 ऑक्टोबरचा अल्टीमेटम!

SCROLL FOR NEXT