Goa Politics: 'गोवा फॉरवर्ड'च्या विलिनीकरणाचा प्रस्ताव आल्यास काँग्रेस तयार; माणिकराव ठाकरे यांचे संकेत

Goa Congress Election Strategy: पक्षाशी गद्दारी करून काँग्रेसमधून बाहेर पडलेल्या आमदारांसाठी पक्षाची दारे कायमची बंद आहेत
Goa Congress Election Strategy
Goa PoliticsDainik Gomantak
Published on: 
Updated on: 

पणजी: पक्षाशी गद्दारी करून काँग्रेसमधून बाहेर पडलेल्या आमदारांसाठी पक्षाची दारे कायमची बंद आहेत; मात्र अन्य पक्षांतील नाराज आणि फुटीर नेत्यांना काँग्रेसमध्ये प्रवेशासाठी स्वागत असेल. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसने ही भूमिका स्पष्ट केली असून, गोवा फॉरवर्ड पक्षाच्या विलिनीकरणासही तयारी दर्शवली आहे. गोव्याचे काँग्रेस प्रभारी माणिकराव ठाकरे यांनी आज ही भूमिका मांडली.

‘गोमन्तक टीव्ही’च्या ‘ब्लॅक ॲण्ड व्हाईट’ या कार्यक्रमात संपादक-संचालक राजू नायक यांनी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाकरे यांच्याशी संवाद साधला. यावेळी दिल्ली येथे नुकत्याच झालेल्या महासचिव (संघटन) के. सी. वेणुगोपाल यांच्यासोबतच्या बैठकीची माहिती देताना ठाकरे म्हणाले की, आगामी निवडणुका होणाऱ्या पाच राज्यांतील प्रमुख नेत्यांची बैठक वेणुगोपाल यांनी बोलावली होती. या बैठकीला सहप्रभारी अंजली निंबाळकर, प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर, विरोधी पक्षनेते आलेमाव आणि चारही कार्याध्यक्ष उपस्थित होते.

Goa Congress Election Strategy
Goa Screenwriters Lab: महिलांच्या कथांना मिळणार चित्रपटाचे रूप; गोव्यात ‘स्क्रिनरायटर्स लॅब’ सुरू होणार

निवडणूक समितीचे अध्यक्ष आलेमाव यांनी निवडणुकीला सामोरे जाण्यासाठी पक्षाची तयारी, राज्यात नुकतीच झालेली ‘गोवा राखण यात्रा’ तसेच यात्रेच्या समारोपावेळी राहुल गांधी यांनी गोवा संरक्षण अभियान सुरू करण्याचा दिलेला संदेश पुढे कसा नेणार, याची माहिती बैठकीत दिली. गोवा फॉरवर्डला सहा जागा दिल्या जाणार असल्याच्या बातम्या चुकीच्या असल्याचे ठाकरे यांनी स्पष्ट केले.

सरदेसाई यांच्यासोबत बैठक घेऊन चर्चा केली असून, एकत्रितपणे निवडणूक लढविण्याचा निर्णय झाला आहे. यासंदर्भातील शंका-कुशंका चुकीच्या आहेत. कोणीही नाराज नसल्याचे त्यांनी सांगितले. आरजीने १५ जागांचा आग्रह धरल्याच्या चर्चेवर बोलताना ठाकरे म्हणाले की, प्रत्यक्षातील परिस्थिती वेगळी आहे आणि प्रसारमाध्यमांना सांगितले जाते ते वेगळे आहे.

ठाकरे म्हणतात, तो सर्व्हे ‘पेरलेला’

१ नुकत्याच एका खासगी वृत्तवाहिनीकडून केलेला सर्व्हे हा पेरला गेलेला आहे. सत्तेत असलेले लोक त्याचा कसा फायदा घेतात हे मला वेगळे सांगण्याची गरज नाही. काँग्रेस उमेदवारांनी घरोघर प्रचाराला सुरूवात केली नाही, असे म्हणता येणार नाही. इच्छुकांनी ती सुरुवात केली आहे.

२ मतचोरीप्रकरणात देशात १३ कोटी मतदारांची नावे यादीतून वगळण्यात आले आहेत. पश्चिम बंगाल, बिहारमध्ये निवडणुका झाल्या त्याठिकाणी मतचोरी झाल्याचे पुढे आले आहे. या सर्वांविषयी पक्षाने पुरावे दिले आहेत. गोव्यात सावियो कुतिन्हो यांनी मतचोरीविषयी चांगल्यापद्धतीने मांडणी केली आहे.

३ गोव्यातील मुख्यमंत्र्यांना भाजप पुन्हा सत्तेवर येऊ शकत नाही, याची जाणीव झाली आहे, त्यामुळे ते दररोज असे काही आश्वासन देत आहेत की ते कधी पूर्ण करू शकत नाहीत.

Goa Congress Election Strategy
Goa Politics: प्रत्येक कुटुंबाला दरमहा 15 हजारांचा लाभ! सत्तेत येताच मोफत वीज देण्याचे 'आप'चे आश्वासन

दिल्लीतील बैठकीत तीन मुद्द्यांवर चर्चा

दिल्लीतील बैठकीत प्रामुख्याने तीन मुद्द्यांवर लक्ष केंद्रित करण्यात आले. जाहीरनामा तयार करण्याची जबाबदारी कॅप्टन विरियातो फर्नांडिस यांच्याकडे सोपविण्यात आली आहे. जाहीरनामा लोकांना आपला वाटला पाहिजे, या दृष्टीने त्यात कोणते मुद्दे समाविष्ट करावेत, याची जबाबदारी त्यांच्याकडे देण्यात आली आहे.

निवडणुकीला सामोरे जाण्याच्या रणनीतीचा होता. त्यासंदर्भात चर्चा करून नियोजन करण्याचे ठरले.

उमेदवार निश्चिती आणि आघाडीतील जागावाटपाचा होता. गोवा फॉरवर्ड आणि रिव्होल्युशनरी गोवन्स पक्षाबरोबर आघाडी व जागावाटपाबाबत चर्चा सुरू असल्याचे बैठकीत सांगण्यात आले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.