Varun Dhawan Comedy Movie: वरुणने गोव्यात पूर्ण केले रोमँटिक कॉमेडी चित्रपटाचे शूटिंग, सोबत दिसणार 'या' अभिनेत्री

Varun Dhawan Goa Movie Shoot: अभिनेता वरुण धवन सध्या चित्रपट शूटिंगमध्ये व्यस्त आहे. तो लवकरच 'सनी संस्कार की तुलसी कुमारी' मध्ये दिसणार आहे.
Varun Dhawan Comedy Movie
Varun Dhawan Dainik Gomantak
Published on
Updated on

अभिनेता वरुण धवन सध्या चित्रपट शूटिंगमध्ये व्यस्त आहे. तो लवकरच 'सनी संस्कार की तुलसी कुमारी' मध्ये दिसणार आहे. वरुण सनी देओलच्या मल्टीस्टारर चित्रपट 'बॉर्डर 2' मध्येही आहे. याशिवाय, तो 'है जवानी तो इश्क होना है' हा एक रोमँटिक कॉमेडी चित्रपटही करत आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन त्याचे वडील आणि दिग्दर्शक डेव्हिड धवन यांनी केले आहे. रिपोर्ट्सनुसार, नुकतेच वरुणने गोव्यात (Goa) या चित्रपटाचे शूटिंग पूर्ण केले असून तो आता डेहराडूनला रवाना झाला आहे.

लंडनला रवाना होणार

मीडिया रिपोर्ट्सनुसार, वरुण धवन (Varun Dhawan) आणि डेव्हिड धवन डेहराडूनचे शेड्यूल पूर्ण केल्यानंतर शूटिंगसाठी लंडनला रवाना होतील. वरुणने नुकतेच जान्हवी कपूरसोबत 'सनी संस्कार की तुलसी कुमारी'चे शूटिंग पूर्ण केले. आता, 'बॉर्डर 2' वर लक्ष केंद्रित करण्यापूर्वी, त्याने 'है जवानी तो इश्क होना है' चे शूटिंग सुरु केले आहे. असे म्हटले जात आहे की, वरुण आठवड्याच्या शेवटी डेहराडूनमध्ये त्याचे शूटिंग शेड्यूल पूर्ण करेल.

Varun Dhawan Comedy Movie
HBD Varun Dhawan: जेव्हा वरुणच्या पॉश शाळेत जाण्याच्या इच्छेला वडिल डेव्हिड धवन यांनी विरोध केला होता...

मृणाल ठाकूर आणि पूजा हेगडे वरुणबरोबर दिसणार

'बॉर्डर 2' आणि 'है जवानी तो इश्क होना है' या दोन्ही चित्रपटांमध्ये वरुण धवन दोन वेगवेगळ्या लूकमध्ये दिसणार असल्याची चर्चा आहे. तो एका चित्रपटात मिशीमध्ये दिसणार आहे. तर दुसऱ्या चित्रपटात तो क्लीन शेव्ह लूकमध्ये दिसणार आहे. अशा परिस्थितीत, 'बॉर्डर 2' च्या शूटिंगपूर्वी, त्याला या रोमँटिक कॉमेडी चित्रपटाचे शूटिंग पूर्ण करायचे आहे. या चित्रपटात त्याच्यासोबत मृणाल ठाकूर आणि पूजा हेगडे देखील दिसणार आहेत.

Varun Dhawan Comedy Movie
Varun Dhawan: वरूण धवनला आहे 'हा' आजार; कामातून बऱ्याचदा घ्यावा लागतो ब्रेक

90च्या दशकातील क्लासिक आकर्षण

'है जवानी तो इश्क होना है' या चित्रपटात 90च्या दशकातील क्लासिक रोमँटिक कॉमेडीजचे आकर्षण असल्याचे म्हटले जाते. वरुण धवन शेवटचा 'बेबी जॉन' चित्रपटात दिसला होता. हा चित्रपट डिसेंबर 2024 मध्ये प्रदर्शित झाला होता. तथापि, तो बॉक्स ऑफिसवर आपली जादू दाखवू शकला नाही.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com