Chhava Movie: 'छावा'ची गोव्यात क्रेझ! कुडचडेत गोमंतकीय सिनेरसिकांची चित्रपटगृहात तूफान गर्दी; समाजकल्याण मंत्र्यांनी लावली हजेरी

Chhava Movie Screening in Curchorem: कुडचडेत मराठा समाजाकडून छावा चित्रपट पाहण्यासाठी जीएमडी थिएटर बुक करण्यात आले. राज्याचे समाजकल्याणमंत्री सुभाष फळदेसाई यांनीही पत्नीसह हजेरी लावली.
Chhaava Movie Review
Chhaava Movie ReviewDainik Gomantak
Published on
Updated on

Chhava Movie Screening in Curchorem: छत्रपती संभाजी महाराज यांच्यावर आधारित छावा चित्रपट (Chhaava Movie) 14 फेब्रुवारी देशभरातील सिनेमागृहात प्रदर्शित झाला. छावा चित्रपटात अभिनेता विकी कौशल (Vicky Kaushal) याने छत्रपती संभाजी महाराज यांची भूमिका बजावली आहे. छावा चित्रपट पाहण्यासाठी प्रेक्षकांनी चित्रपटगृहात तोबा गर्दी केली आहे. गोव्यातही छावा चित्रपटाची क्रेझ पाहायला मिळत आहे. गोमंतकीय सिनेरसिकही चांगलीच दाद देत आहेत. कुडचडेत मराठा समाजाकडून छावा चित्रपट पाहण्यासाठी जीएमडी थिएटर बुक करण्यात आले. राज्याचे समाजकल्याणमंत्री सुभाष फळदेसाई यांनीही पत्नीसह हजेरी लावली.

मराठ्यांचा इतिहास गोमंतकीयांना कळावा!

संभाजी राजांच्या पराक्रमाची यशोगाथा सांगणारा हा चित्रपट गोमंतकीय तरुणांनी नक्की पाहावा, असे समाजकल्याणमंत्री सुभाष फळदेसाई म्हणाले. छत्रपती शिवाजी महाराजांनी खऱ्या अर्थाने रयतेचे राज्य स्थापन करुन एक आदर्श घालून दिला होता. हेच रयतेचे राज्य पुढे महाराजांचे पुत्र संभाजी महाराजांनी अबाधित ठेवले, असेही पुढे बोलताना फळदेसाई म्हणाले.

Chhaava Movie Review
Pramod Sawant: '2047 पर्यंत दिल्ली आणि गोव्यात भाजपच सत्तेत राहणार'; मुख्यमंत्री सावंतांना विश्वास

आयोजक काय म्हणाले?

कुडचडेत मराठा समाजाकडून छावा चित्रपट पाहण्यासाठी आयोजन करण्यात आले. जास्तीत-जास्त गोमंतकीयांना हा चित्रपट पाहावा. एवढचं नाहीतर गोमंतकीयांना एकाच छताखाली हा चित्रपट दाखवण्यात यावा. बॉलिवूडमध्ये आतापर्यंत कोणीच संभाजी महाराजांवर चित्रपट बनवण्याचे धाडस केले नव्हते, परंतु छावाच्या निर्मांत्यांनी मात्र हे धाडस केले. त्यांना आमच्याकडून खूप-खूप शुभेच्छा, असे आयोजक म्हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com