Ranbir Kapoor at IFFI Viral video Dainik Gomantak
मनरिजवण

Ranbir Kapoor at IFFI 2024: आलियाने विचारलं" किशोर कुमार कोण आहे?" रणबीरने सांगितला पहिल्या भेटीचा किस्सा; Video Viral, चाहते नाराज

IFFI Goa 2024: रणबीरने जरी हसत खेळात हा किस्सा सांगितला असला तरीही प्रेषक आणि चाहते यावर बरेच नाराज आहेत

Akshata Chhatre

Panaji News: ग्रेट शोमन राज कपूर यांच्या आठवणींना आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात उजाळा देण्यात आला आणि याचवेळी त्यांचा नातू आणि चॉकलेट बॉय म्हणून प्रसिद्ध असलेला अभिनेता रणबीर कपूर याने त्यांच्या जुन्या आठवणींना उजाळा दिला. यावेळीच रणबीर कपूरने पत्नी आलिया भट हीच्यासोबतची पहिली भेट उलघडून सांगितली.

रणबीर म्हणाला की आलीयाने त्याला ‘किशोर कुमार कोण आहे?’ असा प्रश्न विचारला होता. रणबीरने जरी हसत खेळात हा किस्सा सांगितला असला तरीही प्रेषक आणि चाहते यावर बरेच नाराज आहेत. ते रणबीर आणि आलियाने अशाप्रकारे एकमेंकांबद्दल बोलू नये असे मत मांडतायत.

रणबीर कपूरच्या म्हणण्याचा अर्थ होता की हिंदी सिनेमातील किशोर कुमार यांसारखे दिग्गज कलाकार आजच्या तरुणपिढीला माहिती नाही, मात्र त्यांना याची माहिती असली पाहिजे, कारण आपली मुळं अशाप्रकारे विसरली जाऊ शकत नाही.

रणबीरच्या एक वाक्यामुळे मात्र रणबीर-आलियाचा चाहतावर्ग नाराज झाला आहे आणि ते रणबीरच्या अशा बोलण्याबद्दल रोष व्यक्त करतायत.

मला चित्रपट दिग्दर्शक व्हायचंय..

रणबीर कपूर हा उत्तम सिने अभिनेता आहे आणि त्याने आपल्या विरळा अभिनयाने प्रेक्षकांना भुरळ पाडली आहे. चित्रपट दिग्दर्शन करण्याची इच्छा आहे का असे विचारले असता, दिग्दर्शक व्हायची माझी इच्छा असल्याचे रणबीरने सांगितले. एखादी प्रभावी कथा मिळाली तर मी निश्‍चित दिग्दर्शन करेन, असे तो म्हणाला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Weather Update: राज्यात पावसाचा जोर ओसरणार? कमी दाबाच्या पट्ट्यामुळे झालेल्या पावसानंतर पुढील 4 दिवस तुरळक सरींचा अंदाज, शेतकऱ्यांची चिंता कायम

VIDEO: भाजपवर सरदेसाईंचा जोरदार हल्लाबोल; 'वोट चोरी'चा आरोप करत म्हणाले, विधानसभा निवडणूक हलक्यात घेता येणार नाही

8th Pay Commission: 45,000 किमान पेन्शन मिळणार? 8व्या वेतन आयोगासमोर पेन्शनर्सनी मांडल्या ‘या’ मागण्या

West Zone Athletics: पश्चिम विभागीय ॲथलेटिक्ससाठी गोवा सज्ज, यजमानांचा 124 सदस्यीय संघ; स्पर्धा रविवारपासून अटल स्टेडियमवर

Vasco: एकाच मार्गावर वेगवेगळी वेगमर्यादा, वास्कोतील वाहनचालक चक्रावले; दोन सरकारी खात्यांत समन्वयाचा अभाव

SCROLL FOR NEXT