Akshaye Khanna Video Dainik Gomantak
मनरिजवण

Video: वय 50, एका स्टाईलवर लाखो मुली फिदा, तरीही अक्षय खन्ना एकटा; म्हणाला, 'बायकोची जबाबदारी घेण्यापेक्षा...'

Akshaye Khanna Viral Video: 'धुरंधर' या त्याच्या ताज्या चित्रपटालाही हेच घडले आहे आणि चाहते त्याच्या या तीव्र अभिनयावर फिदा झाले आहेत

Akshata Chhatre

Akshaye Khanna Marriage Statement viral: बॉलिवूडमधील दमदार आणि सहजसुंदर अभिनयासाठी ओळखला जाणारा अभिनेता अक्षय खन्ना पुन्हा एकदा चर्चेत आहे. यंदाच्या ब्लॉकबस्टर चित्रपट 'छावा' मध्ये मुघल सम्राट औरंगजेबच्या भूमिकेत त्याने प्रेक्षकांची मने जिंकली होती. आता आदित्य धर दिग्दर्शित 'धुरंधर' या नव्या चित्रपटात रहमान डकैतच्या तीव्र आणि रांगड्या भूमिकेत त्याने पुन्हा एकदा 'लक्ष्यभेद' केला आहे. अक्षय खन्ना पडद्यावर दिसला की तो प्रेक्षकांना खेचून आणतोच, हे पुन्हा एकदा सिद्ध झाले.

अभिनयाचा 'धुरंधर' आणि कमी प्रसिद्धी

अक्षय खन्ना हा नेहमीच लो प्रोफाइल ठेवणारा अभिनेता म्हणून ओळखला जातो. तो फार कमी वेळा मीडियासमोर येतो किंवा मुलाखती देतो. त्याच्यामागे बॉलिवूडच्या इतर कलाकारांसारखी मोठी पीआर यंत्रणा नसली तरी, तो एखाद्या प्रोजेक्टशी जोडला गेला की, त्या चित्रपटाबद्दलची उत्सुकता वाढतेच.

'धुरंधर' या त्याच्या ताज्या चित्रपटालाही हेच घडले आहे आणि चाहते त्याच्या या तीव्र अभिनयावर फिदा झाले आहेत. अक्षय खन्नाची चित्रपट कारकीर्द मोठी असली तरी, त्याचे वैयक्तिक आयुष्य नेहमीच पडद्याआड राहिले आहे.

'मला जबाबदारी नको' – अक्षय खन्नाची स्पष्ट भूमिका

अभिनयाच्या बाबतीत 'धुरंधर' असलेल्या अक्षय खन्नाने नुकतेच आपले वैयक्तिक मत अत्यंत मनमोकळेपणाने मांडले आहे, ज्यामुळे त्याची ही भूमिका व्हायरल झाली आहे. लग्न आणि मुलांबद्दल त्याने केलेले विधान अनेकांसाठी धक्कादायक आहे.

अक्षय खन्ना म्हणाला, "मला माझ्या आयुष्यात जबाबदारी आवडत नाही. मला खूप चिंतामुक्त आयुष्य जगायला आवडते. मुले असण्यापेक्षा दुसरी कोणतीही मोठी जबाबदारी नाही. पत्नीची जबाबदारी घेण्यापेक्षा दुसरी कोणतीही मोठी जबाबदारी नाही. मला ती जबाबदारी नको आहे."

'मी एकटाच आनंदी आहे'

तो पुढे स्पष्ट करतो, "मी एकटाच आनंदी आहे. कोणतीही जबाबदारी नाही. माझ्यावर कोणाचीही काळजी घेण्याची गरज नाही. मला फक्त माझीच काळजी करण्याची गरज आहे. मला एक विलक्षण आयुष्य मिळाले आहे. ते उत्कृष्ट आहे. मग मी ते का खराब करू?"

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Railway Diwali Bonus 2026: मोदी सरकारची रेल्वे कर्मचाऱ्यांना दिवाळी भेट, 10 लाखांहून अधिक कर्मचाऱ्यांना मिळणार बंपर बोनस; अखेर कॅबिनेटचा शिक्कामोर्तब

नाशिकच्या पाण्यत आढळले कर्करोगास कारणीभूत ठरणारे जीवघेणे रसायन; पर्यावरण संस्थेच्या अहवालात मोठा खुलासा

Farmers Drought Financial Relief: पावसाने हुलकावणी दिली पण सरकार धावून आले! दिवाळीपूर्वीच शेतकऱ्यांना 'इतक्या' हजारांची मदत जाहीर; वाचा ताजी अपडेट

Unlucky Zodiac Signs: पैशांची घ्या काळजी! शुक्र अस्तामुळे 'या' 4 राशींना बसू शकतो मोठा आर्थिक फटका; पुढील 14 दिवस अत्यंत कसोटीचे

Goa Under 23 Cricket: गोव्याच्या युवा क्रिकेटपटूंचा बडोद्यावर दबदबा! 158 धावांची आघाडी, मोठ्या आघाडीची संधी

SCROLL FOR NEXT