Bollywood Actress Aahana Kumra Dainik Gomantak
मनरिजवण

Aahana Kumra: 'पोलिस अधिकाऱ्यांशी हुज्जत घातली, गोव्यात मला अटक झाली असती'; प्रसिद्ध अभिनेत्रीने सांगितला अनुभव

Goa News: गोव्यात एका मित्राचा वाढदिवस साजरा करण्यासाठी आले असता पोलिस अधिकाऱ्यांशी वाद झाला, यातून त्याच्याशी हुज्जत घातल्याचे आहाना सांगते.

Pramod Yadav

पणजी: पोलिस अधिकाऱ्यांशी हुज्जत घातल्यामुळे गोव्यात मला अटक झाली असती,  असा अनुभव प्रसिद्ध अभिनेत्री आहाना कुमराने सांगितला आहे. आहाना अलिकडेच मोठी सुट्टी घेऊन गोव्यात फिरण्यासाठी आली होती, त्यावेळी तिने हा अनुभव सांगितला. एका मित्राचा वाढदिवस साजरा करण्यासाठी गोव्यात आल्यानंतर हा प्रकार घडल्याचे तिने सांगितले.

आहानाने नुकतेच गोव्यात मोठी सुट्टी घालवली, आसगाव येथील एका व्हिलात तिने मित्रांसोबत सुट्टीचा आनंद घेतला. यावेळी तिने गोव्यातील जुन्या आठवणींना उजाळा दिला. गोव्यात एका मित्राचा वाढदिवस साजरा करण्यासाठी आले असता पोलिस अधिकाऱ्यांशी वाद झाला, यातून त्याच्याशी हुज्जत घातल्याचे आहाना सांगते. यामुळे रागवलेल्या पोलिस अधिकाऱ्यांने मला जवळपास अटक केली होती, असे तिने सांगितले.

दरम्यान, यावेळी मित्रांनी आहानाला पोलिस अधिकाऱ्याची माफी मागण्यास सांगितले. आहानाने माफी मागितल्यानंतर अधिकाऱ्याने देखील माफ केले आणि वाद मिटला, असा अनुभव आहानाने सांगितला. पण, कोणत्या कारणासाठी हा वाद झाला होता? याबाबत स्पष्टपणे आठवत नसल्याचे आहाना म्हणाली. गोव्याचा विषय येतो त्यावेळी माझे मित्र माझ्याकडे बघून हासायला लागतात, असेही आहाना सांगते.

“गोव्यात मला फिरायला नेहमीच आवडते, पावसाळ्यात फिरण्याचा ऋतू सर्वात उत्तम असतो. पावसाळ्यात येथील निसर्गरम्य वातावरण, मोकळे रस्ते, कॅफे आणि समुद्रकिनारे फार आवडतात. येथील खाद्यपदार्थांच्या मी प्रेमात आहे,” असे आहाना म्हणाली.

आहाना अलिकेडच गोव्यात मोठी सुट्टी घालवली, गोव्यातील सुट्टीचे फोटो तिने सोशल मिडियावरुन शेअर केले आहेत. या फोटोंना तिच्या चाहत्यांनी मोठ्या संख्येने लाईक केले आहे.

गोव्यात फिरण्यासाठी नेहमीच आवडते असे आहाना सांगते. पावसाळ्यात येथील हिरवागार निसर्ग भूरळ घालतो. सकाळी येथील रस्त्यावरुन धावण्याचा आनंद वेगळाचा आहे असेही ती सांगते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Kalidasa Pride Story: महाकवी कालिदासाचा गर्व उतरला, आजच्या साहित्यिकांचा कधी? पुरस्कार, सत्कार अन् अहंकारावर परखड भाष्य

PM Kisan 24th Installment: दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना मोठं गिफ्ट? पीएम किसानचा 24वा हप्ता 'या' दिवशी जमा होणार; पाहा काय आहे अपडेट

VIDEO: समुद्रात तरंगू लागले आयफोन अन् लक्झरी परफ्यूमचे बॉक्सेस! होर्मुझ सामुद्रधुनीत भीषण अपघात; जहाजावरील 21 जणांचा जीव थोडक्यात वाचला

DA Hike: कॅबिनेट बैठकीत DA बाबत मौन! केंद्रीय कर्मचाऱ्यांना आता दिवाळीची प्रतीक्षा; महागाई भत्त्यावर अजूनही सस्पेन्स कायम

Pakistan School Tragedy: निष्पाप चिमुकल्यांचा टाहो! पाकिस्तानात शाळेचे छत कोसळून 20 हून अधिक मुलांचा मृत्यू; हॉस्पिटलबाहेर पालकांचा हंबरडा

SCROLL FOR NEXT