Goa Crime: मुंगूल-मडगावातील गँगवॉरचा गोव्यातील अंडरवल्डशी संबंध; वॉल्टर गँगने 2 वर्षापूर्वीच्या मारहाणीचा घेतला बदला

Margao Goa Crime News: या हल्ला प्रकरणात एकूण आठ जणांना अटक केल्याचे जरी सांगण्यात येत असले तरी पोलिस रेकॉर्डप्रमाणे अद्याप तिघांजणांनाच अटक केल्याचे दाखविले आहे.
Crime News
Goa CrimeDainik Gomantak
Published on
Updated on

मडगाव: मुंगूल-मडगाव येथे काल पहाटे गँगवॉरमधून दोन युवकांवर जो जीवघेणा हल्ला झाला त्यामागे दोन वर्षांपूर्वी कोलवा सर्कल परिसरात झालेल्या मारहाणीचा संबंध असल्याचे सांगितले जात असून या मारहाणीचा बदला घेण्यासाठीच काल पहाटे हा फिल्मीस्टाईल हल्ला करण्यात आला.

यापूर्वी या परिसरात वॉल्टर गँगकडून गोव्यातील अंडरवल्डमध्ये असलेल्या कुख्यात गुंड विजय कुलाल आणि इम्रान बेपारी या दोघांना वॉल्टर गँगकडून मारहाण झाली होती. त्याचा बदला घेण्यासाठी कालचा हा हल्ला करण्यात आल्याचे सांगितले जाते.

काल ज्या दोघांना मारहाण झाली ते युवकेश सिंग आणि रफीक तशान हे दोघेही वॉल्टर गँगशी संबंधित असून वास्तविक या मारेकऱ्यांना त्या गाडीत वॉल्टरही असावा, अशी शंका आल्यामुळेच त्यांनी त्या गाडीचा पाठलाग केला.

Crime News
Har Ghar Tiranga: हर घर तिरंगा! गोव्यात मंत्री, राजकीय नेत्यांनी घरी फडकवला भारतीय ध्वज

कोलवा-मुंगूल रोडवर युवकेशच्या गाडीला चार गाड्यांनी गराडा घालून हा हल्ला चढविला होता. यापूर्वी जी मारहाण झाली होती त्या मारहाणीशी वॉल्टर गँगचा हात असल्याने तसेच काल ज्याला अटक करण्यात आली त्या विल्सन कारव्हालो याच्यावरही कोलवाळ तुरुंगात स्थानबद्ध असताना वॉल्टर गँगच्या लोकांकडून हल्ला झाला होता. त्याचा बदला घेण्यासाठी हा सर्व प्लॅन रचण्यात आला होता, अशी माहिती खास सूत्रांकडून प्राप्त झाली आहे.

या हल्ला प्रकरणात एकूण आठ जणांना अटक केल्याचे जरी सांगण्यात येत असले तरी पोलिस रेकॉर्डप्रमाणे अद्याप तिघांजणांनाच अटक केल्याचे दाखविले आहे. या तिघांमध्ये विल्सन याच्यासह शाहरुख व रसूल यांचा समावेश आहे.

कोलव्यातील हॉटेलचा संबंध

१) बाणावलीचे आमदार वेंझी व्हिएगस यांनी या प्रकरणी आज दक्षिण गोव्याचे पोलिस अधीक्षक टिकम सिंग वर्मा यांची भेट घेऊन दक्षिण गोव्यातील गुन्हेगारी विश्वातील गँग्सच्या कारवायांवर नियंत्रण आणण्यासाठी पोलिस बंदोबस्त वाढवा आणि रात्रीच्या गस्ती सुरू करा, अशी मागणी केली.

Crime News
सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचे गोवा सरकारकडून अनुकरण; भटक्या कुत्र्यांच्या समस्येवर तोडगा काढण्यासाठी टास्क फोर्सची स्थापना

२) मागच्या तीन वर्षांत कोलवा आणि मुंगूल परिसरात अशातर्हेचे तीन जीवघेणे हल्ले झाले आहेत आणि या तिन्ही हल्ल्यांशी कोलव्यातील एका हॉटेलचा संबंध आहे. हे हॉटेल पहाटेपर्यंत सुरू असते आणि हे हॉटेल गुंडांचा अड्डा बनलेला आहे. या हॉटेलवरही कारवाई झाली पाहिजे, अशी मागणी त्यांनी केली. यावेळी त्यांच्याबरोबर आपचे जर्सन गोम्स आणि रॉक मास्कारेन्हस

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com