Goa Politics

 
Dainik Gomantak
गोवा निवडणूक

सावंत हे कमकुवत मुख्यमंत्री; त्यांचे स्वतःचे अधिकारीच त्यांचे ऐकत नाहीत: केजरीवाल

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejariwal) यांनी गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत (CM Pramod Sawant) यांना असाच एक टोला लगावला आहे. केजरीवाल यांनी सावंत यांना 'कमकुवत मुख्यमंत्री (Weak CM) म्हणून संबोधले आहे.

दैनिक गोमन्तक

Goa Politics: राजकरणामध्ये नेहमीच वेगवेगळ्या विषयांवर चर्चा सुरू असते. एकमेकांवर शेरेबाजी किंवा टोला लगावणे ही एक स्वाभाविक गोष्ट असते. गोव्यात येत्या विधानसभा निवडणुकीच्या (Goa Assembly Elections 2022) पार्श्वभूमीवर सर्वच पक्षांची जोरदार तयारी सुरू आहे. या तयारीत दुसऱ्या पक्षाला निकामी ठरवणे सुद्धा आलेच. आपचे (AAP) राष्ट्रीय संयोजक आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejariwal) यांनी गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत (CM Pramod Sawant) यांना असाच एक टोला लगावला आहे. केजरीवाल यांनी सावंत यांना 'कमकुवत मुख्यमंत्री (Weak CM) म्हणून संबोधले आहे.

ते म्हणाले की, 'सावंत यांचे स्वतःचे मंत्री, अधिकारी आणि पक्षाचे उच्च अधिकारी देखील त्यांचे ऐकत नाहीत. गोव्यात मोफत वीज देण्याची घोषणा केल्यानंतर राज्य सरकारने मोफत पाणी योजना आणली. मात्र बिले दिल्यानंतर नागरिकांना वाढीव बिले येऊ लागली. याबाबत त्यांना प्रश्न विचारला असता गोव्याचे मुख्यमंत्री म्हणाले की, अधिकारी ऐकत नाहीत आणि या सर्व गोंधळासाठी त्यांच्यावर कारवाई केली जाईल. अधिकारी मुख्यमंत्र्यांचे कसे ऐकत नाहीत?, असा प्रश्न उपस्थित करून ते म्हणाले की, अधिकारी आपले आदेश ऐकत नाहीत हे मुख्यमंत्रीच मान्य करतात, असे म्हणत, 'तुमचं ऐकतं तरी कोण? अधिकारी तुमचे ऐकत नाहीत आणि तुमचे मंत्री तुमचे ऐकत नाहीत', अशी खरमरीत टीका त्यांनी केली आहे.

केजरीवाल पुढे म्हणाले, 'ते नेमके कोणत्या प्रकारचे मुख्यमंत्री आहेत? मी गोव्यातील जनतेला विचारू इच्छितो की, अशा कमकुवत मुख्यमंत्र्याने गोव्यावर राज्य करावे का? वाढलेल्या पाण्याच्या बिलांमुळे जनता त्रस्त आहे, आणि मुख्यमंत्री सावंत हे याबाबतीत अनभिज्ञ आहेत. आपच्या कल्याणकारी योजनांची कॉपी करणे सोपे आहे, परंतु त्यांची अंमलबजावणी करणे कठीण आहे. सावंत यांनी मोफत पाणी योजनेची योग्य अंमलबजावणी न केल्याने गोमंतकीयांचे हाल होत आहेत', असे ते म्हणाले. आता यावर मुख्यमंत्री प्रमोद सावंत काय प्रतिक्रिया देतात याची उत्सुकता संगळ्याना लागली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT