BJP and Congress  Dainik Gomantak
गोवा निवडणूक

Goa Election 2022: मतविभाजनाचा भाजपाला फायदा, काँग्रेसला तोटा?

अरविंद केजरीवाल यांचा आम आदमी पक्ष तर ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेस रणांगणात उतरल्याने निवडणूक रिंगणात आता चुरशीची लढत होणार आहे.

दैनिक गोमन्तक

पणजी: गोव्यात निवडणुकीच्या रणधुमाळीला सुरुवात झाली असून, सत्ताधारी भाजपला आव्हान देण्यासाठी विरोधक सज्ज झाले आहेत. 2022 च्या निवडणुका भाजप आणि काँग्रेस या दोघांसाठी लिटमस टेस्ट ठरणार असून, 2017 मध्ये, काँग्रेस 40 पैकी 17 जागा जिंकून सर्वात मोठा पक्ष म्हणून उदयास आला होता, दरम्यान भाजप केवळ 13 जागा जिंकू शकला होता. या निवडणुकीमध्ये मतांच्या टक्केवारीबाबत, 32.48% मतांसह भाजप आघाडीवर राहिला होता, आणि हे प्रमाण काँग्रेसपेक्षा 4 टक्के जास्त होते. (Review of the political situation of BJP and Congress in Goa for goa election 2022)

गोव्यातील प्रादेशिक पक्ष MGP आणि Goa Forward या पक्षांनी प्रत्येकी तीन जागांसह 2017 मध्ये किंगमेकरची भूमिका बजावली होती. दरम्यान या प्रादेशिक पक्षांच्या पाठिंब्याने 2017 मध्ये सरकार स्थापन करण्यात यशस्वी झालेल्या भाजपला या निवडणुकीच्या बाबतीत देखील आशा असेल.

मनोहर पर्रीकर आणि भाजप

या निवडणुकीच्या (Goa Assembly Election) दरम्यान भाजपला गोव्यातील सर्वात लोकप्रिय नेत्याची म्हणजेच स्वर्गीय मनोहर पर्रीकर यांची साथ नसणार आहे. मनोहर पर्रीकर (Manohar Parrikar) यांचे 2019 मध्ये निधन झाले. पर्रीकर हे 2017 च्या भाजप सरकारचे शिल्पकार होते. म्हणूनच प्रादेशिक पक्षांना आकर्षित करण्यात पर्रीकर यांची भूमिका महत्वाची होती. मात्र या दरम्यान आघाडी सरकारचे मुख्यमंत्री म्हणून भाजपने त्यांना केंद्रीय संरक्षण मंत्रीपद सोडण्यास भाग पाडले होते. आताही काही वेगळी परिस्थिती नाही पणजीतून भाजप पक्षाचे तिकीट नाकारण्यात आल्यानंतर त्यांचा मुलगा उत्पल पर्रीकर यांनी भाजपविरुद्ध बंडखोरी केली आहे. उत्पल यांनी भाजपला सोडचिठ्ठी दिली असून ते ही निवडणूक अपक्ष म्हणून लढवणार आहेत.

काँग्रेसला मोठा धक्का

केवळ भाजपलाच या प्रकारच्या नाराजीचा सामना करावा लागत आहे असे नाही. मात्र हे सत्ताधारी पक्षासाठी प्रमुख आव्हान ठरणार आहे. काँग्रेस हा पक्ष देखील निवडणुकीपूर्वी पक्षांतराचा सामना करत आहे. खरे तर, मागील 5 वर्षांत काँग्रेसने गोव्यात तब्बल 15 आमदार गमावले आहेत. कॉंग्रेस हा एकच सर्वात मोठा पक्ष असूनही, 2017 मध्ये सरकार स्थापनेत भाजपने काँग्रेसवर कुरघोडी केली होती. दरम्यान 13 आमदारांनी भाजपमध्ये प्रवेश केल्याने या पक्षाला आणखी एक धक्का बसला. काँग्रेसने तृणमूल काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री लुइझिनो फालेरो यांनाही गमावले होते.

फसवणुकीमुळे त्रस्त झालेल्या काँग्रेसने (Goa Congress) या निवडणुकीत 31 नवीन चेहरे उभे केले आहेत, त्यापैकी 18 प्रथमच उमेदवार आहेत. मागील निकालांचे विश्लेषण केल्यास असे दिसून येते की गेल्या काही निवडणुकांमध्ये राज्यात भाजप आणि काँग्रेस हे प्रमुख पक्ष असून इतरांसाठी आव्हान ठरणारे आहेत. दोघांच्यात तुलना करायची झाल्यास, काँग्रेसने 20 जागांचा आकडा दोनवेळा गाठला आहे, तर भाजप आतापर्यंत फक्त एकदाच या अकड्यापर्यंत पोहोचू शकला आहे. यावरून राज्यातील सरकार स्थापनेत प्रादेशिक पक्षांची महत्त्वाची भूमिका अगदी ठळकपणे दिसून येते. मागील काही वर्षांत भाजपने राज्यातील कामगिरी सुधारली असून, 2012 मध्ये भाजपने प्रथमच काँग्रेसला मतांच्या प्रमाणात पराभूत करण्यात यश मिळविले होते. 2017 मध्येही, भाजप पक्षाने कॉंग्रेस पक्षापेक्षा कमी जागा जिंकल्या असूनही भाजपची मतांची टक्केवारी काँग्रेसपेक्षा जास्त होती.

केवळ भाजप (Goa BJP) आणि काँग्रेस पुन्हा एकदा एकमेकांना मागे टाकण्याचा प्रयत्न करतील म्हणून ही निवडणूक रंजक ठरणार नसून,आता अरविंद केजरीवाल यांचा आम आदमी पक्ष तर ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेस रणांगणात उतरल्याने निवडणूक रिंगणात आता चुरशीची लढत होणार आहे. गोवा राज्यात सत्तेसाठी प्रमुख खेळाडू म्हणून समोर येण्यासाठी दोन्ही पक्ष खूप प्रयत्नशील आहेत. 'आप'साठी ही गोव्यातील दुसरी निवडणूक असून, 2017 मध्ये पक्षाने 39 जागा लढवल्या होत्या, पण एकही जागा जिंकता आली नाही.

तृणमूलमुळे आम आदमी पार्टीला कलाटणी मिळण्याची शक्यता

यावेळीही पक्षाला कलाटणी मिळण्याची शक्यता आहे. कारण ममता बॅनर्जींच्या तृणमूल काँग्रेसने (Goa TMC) गोव्यात मोठ्या धूमधडाक्यात प्रवेश केला आहे. ममता बॅनर्जीं यांनी गोव्यात केवळ काँग्रेसच्या नेत्यांचीच शिकार केली नाही तर राहुल गांधी यांची देखील खिल्ली उडवली आहे. याव्यतिरिक्त भाजपला आव्हान देण्याच्या काँग्रेसच्या क्षमतेवर गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत. परंतु, जसजशी निवडणूक जवळ येत आहे, तसतशी तृणमूलच्या प्रचाराची गती कायम ठेवण्यासाठी धडपड होताना दिसत आहे. दरम्यान ते आक्रमकतेतून हळूहळू तडजोडीकडे वळले आणि काँग्रेससोबत युतीची चर्चा देखील झाली. मात्र, काँग्रेसने तृणमूलच्या या प्रस्तावात फारसा रस दाखवला नाही.

विरोधी गटातील इतर खेळाडूंमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) आणि शिवसेना यांचा देखील समावेश आहे. मात्र या पक्षांचा राज्यात फारच मर्यादित प्रभाव आहे, तर गोव्याच्या राजकारणात शिवसेना केवळ एक किरकोळ खेळाडू आहे. दोन्ही पक्षांनी युतीसाठी काँग्रेसशी संपर्क साधला. परंतु, काँग्रेसने त्यांच्या या निर्णयात फारसा रस दाखवला नाही. 2017 प्रमाणे, भाजप स्वबळावर अर्धा टप्पा गाठू शकला नाही तर, विरोधी पक्ष निवडणूकोत्तर युती ठेवण्यासाठी हातमिळवणी करण्याची शक्यता नाकारता येत नाही.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Indian Super League: 'आयएसएल' पंचगिरीबाबत FC Goa नाराज, अखिल भारतीय फुटबॉल महासंघाकडे लेखी तक्रार; तीव्र चिंता व्यक्त

Ducati ची दमदार अ‍ॅडव्हेंचर बाईक भारतात येणार! बुकिंग सुरू, 890cc इंजिनसह मिळणार भन्नाट फीचर्स; Royal Enfield-KTM ला देणार टक्कर, किंमत किती?

डिचोलीत दिवाळीचा उत्साह शिगेला! नरकासुर प्रतिमांनी वेधलं लक्ष; बाजारपेठेत खरेदीसाठी प्रचंड गर्दी

Viral Video: ट्रेनमध्ये चोरी करायला गेला अन् स्वतःच अडकला! खिडकीतून हात घालताच प्रवाशांनी चोराला पकडलं; 94 सेकंदांचा व्हिडिओ व्हायरल

Accident Death: तन्मयची दिवाळी ठरली अखेरची! डिचोलीत भीषण अपघातात 22 वर्षीय युवकाचा मृत्यू

SCROLL FOR NEXT