गोंयकार काँग्रेसला पाठिंबा देण्याच्या निष्कर्षापर्यंत पोहोचलेत : चोडणकर

स्थिर सरकारसाठी काँग्रेस-गोवा फॉरवर्डला मतदार कौल देणार असल्याचा दावा
Girish Chodankar Congress PC in Goa
Girish Chodankar Congress PC in GoaDainik Gomantak

पणजी : गोवा प्रदेश काँग्रेस समिती अध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी बुधवारी सांगितले की, भाजपने, आप आणि तृणमूलच्या संगनमताने गोव्यातील मतदारांमध्ये संभ्रम निर्माण केला होता. मात्र आता लोक निष्कर्षापर्यंत पोहोचले असून, त्यांचा मतांचा विभाजनाचा अजेंडा समोर आल्यानंतर लोक आता स्थिर सरकारसाठी काँग्रेस आणि गोवा फॉरवर्ड आघाडीला मतदान करणार. (Girish Chodankar Congress PC in Goa News Updates)

गिरीश चोडणकर यांनी बुधवारी पणजी येथे पत्रकार परिषद घेऊन मतांचे विभाजन करण्यासाठी येथे आलेल्या इतर राजकीय पक्षांमध्ये सामील झालेल्या काँग्रेस समर्थकांना परत येण्याचे आवाहन केले. 'आज गोंयकार आमच्यासोबत आहेत. त्यामुळे आमच्या माजी कार्यकर्त्यांनी आम्हाला पाठिंबा द्यावा, असे आवाहन मी करतो. आम्ही नवीन चेहरे दिले आहेत आणि काँग्रेस बदलत आहे.' असे ते म्हणाले.

गोव्यातील लोकांचे काँग्रेस पक्षाशी भावनिक नाते आहे. लोकांनी सुचविल्यानंतर आणि पक्षांतर केलेल्यांना प्रवेश न देता आम्ही आमची रचना बदलली आहे. कधी कधी निवडणुका जिंकणे सोपे असते, पण लोकांची मने जिंकणे सोपे नसते. पण त्यात आम्हाला यश मिळाले आहे.” असे चोडणकर म्हणाले.

Girish Chodankar Congress PC in Goa
मनोहर पर्रीकरांची उणीव भरुन निघू शकत नाही, मात्र... : गडकरी

'रवी नाईक यांच्या मुलांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यामुळे आम्ही यांच्या जागी नवीन चेहरा आणला. रेजिनाल्ड लॉरेन्स यांचा भाजपशी संबंध होता. पण तो टीएमसीमध्ये (TMC) सामील झाल्यानंतर आणि तिथे राजीनामा दिल्यानंतरही आम्ही त्याला तिकीट दिले नाही. ही नव्या पिढीतील काँग्रेस आहे. जुनी काँग्रेस आता भाजप, आप आणि टीएमसीसोबत आहे, ज्यांनी आमच्या नेत्यांना आपल्या गोटात घेतले आहे,' असा खोचक टोला चोडणकर यांनी लगावला.

मतांचे विभाजन करू पाहणाऱ्या पक्षांनी काँग्रेसला (Congress) एक नवीन दिशा दिली आहे असे ते म्हणाले. ते म्हणाले की भाजप, आप आणि टीएमसीची मिलीभगत मतांची विभागणी करण्यासाठी आहे हे लोकांना माहिती आहे आणि म्हणूनच ते स्थिर काँग्रेस सरकारला मतदान करतील. 2017 मध्ये आम्हाला 17 जागा मिळाल्या आणि आता 2022 मध्ये आम्हाला 22 पेक्षा जास्त जागा मिळतील. आम्हाला पूर्ण बहुमत मिळेल,' असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

Girish Chodankar Congress PC in Goa
कॉंग्रेस उमेदवार सुधीर कांदोळकर यांच्याविरुद्ध पोलिसांत गुन्हा दाखल

चोडणकर पुढे म्हणाले की, भाजपचे (BJP) निष्ठावंत कार्यकर्ते त्यांच्या पक्षाच्या कार्यपद्धतीवर नाराज असून पक्षाला कंटाळले आहेत. 'मुख्यमंत्री त्यांच्या साखळी मतदारसंघात पराभूत होत आहेत. अमित शहा यांची त्यांच्या मतदारसंघातील सभा त्याचा पुरावा आहे,’ असा निशाणा चोडणकर यांनी साधला.

दरम्यान, राष्ट्रवादीचे माजी सरचिटणीस संजय बर्डे आणि म्हापसा येथील परेश पानकर यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. काँग्रेस पक्ष मजबूत करण्यासाठी काम करणार असल्याचे दोघांनी स्पष्ट केलं आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com