Polling Dainik Gomantak
गोवा निवडणूक

प्रचाराच्या तोफा थंडावल्या, गोव्यासह उत्तराखंडमध्ये 14 फेब्रुवारीला होणार मतदान

दैनिक गोमन्तक

उत्तराखंड आणि गोव्यातील विधानसभेच्या सर्व जागांसाठी त्याचबरोबर उत्तर प्रदेशातील दुसऱ्या टप्प्यातील निवडणुकीचा प्रचार शनिवारी संध्याकाळी 6 वाजता संपला. या राज्यात 14 फेब्रुवारीला मतदान होणार आहे. उत्तराखंडमधील (Uttarakhand) 70 विधानसभा मतदारसंघात मतदान होणार आहे. तर गोव्यात विधानसभेच्या (Goa Legislative Assembly) 40 जागा आहेत. यूपीमध्ये दुसऱ्या टप्प्यात 55 जागांवर मतदान होत आहे. यूपीमध्ये 14 फेब्रुवारीला पश्चिम उत्तर प्रदेश आणि रोहिलखंडमधील 9 जिल्ह्यांतील 55 जागांवर मतदान होणार आहे. सहारनपूर, बिजनौर, मुरादाबाद, अमरोहा, संभल, रामपूर, बदाऊन, बरेली आणि शाहजहानपूर या जिल्ह्यांमध्ये मतदान होणार आहे. (Polling Will Be Held On February 14 In Uttarakhand, Including Goa)

दरम्यान, दुसऱ्या टप्प्यातील निवडणुकीसाठी यूपीमध्ये कडेकोट सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे. 2017 मध्ये भाजपने या 55 पैकी 38 जागा काबीज केल्या होत्या. तर सपाला 15 जागांवर यश मिळाले होते. तर काँग्रेसच्या (Congress) खात्यातही दोन जागा आल्या होत्या. निवडणुका शांततेत पार पाडण्यासाठी 800 निमलष्करी दलाचे लष्कर या भागात तैनात करण्यात आले आहेत.

निवडणूक आयोगाने असेही म्हटले आहे की, ''उत्तराखंड आणि गोव्याच्या (Goa) सर्व विधानसभा जागांसाठी आणि उत्तर प्रदेशच्या दुसऱ्या टप्प्यातील 55 विधानसभा जागांसाठी आज संध्याकाळी 6 वाजल्यापासून अचारसंहितेचा कालावधी सुरु होत आहे. या काळात निवडणुकीच्या प्रचारावर निर्बंध घालण्यात आले आहेत.''

उत्तराखंडमध्ये प्रचाराच्या शेवटच्या दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही (Prime Minister Narendra Modi) रॅलीला संबोधित केले. इथे काँग्रेसकडून चुरशीच्या स्पर्धेशिवाय आम आदमी पक्षासह इतर अनेक लहान पक्षांनाही घाम फुटला आहे. उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर धामी आणि माजी मुख्यमंत्री हरीश रावत यांनीही गेल्या काही दिवसांत सभा घेतल्या आहेत.

दुसरीकडे, यूपी विधानसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात 854 उमेदवारांपैकी सुमारे 147 उमेदवारांवर (25 टक्के) गुन्हे दाखल आहेत. असोसिएशन फॉर डेमोक्रॅटिक रिफॉर्म्स (ADR) ने बुधवारी हा अहवाल प्रसिद्ध केला आहे.

तसेच, उत्तर प्रदेश इलेक्शन वॉच आणि असोसिएशन फॉर डेमोक्रॅटिक रिफॉर्म्सने उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात लढणाऱ्या 586 उमेदवारांपैकी 584 उमेदवारांच्या शपथपत्रांचा अभ्यास केला आहे. दोन उमेदवारांच्या शपथपत्रांचे व्यवस्थित स्कॅनिंग न केल्यामुळे किंवा संपूर्ण शपथपत्रे निवडणूक आयोगाच्या वेबसाइटवर अपलोड न केल्यामुळे त्यांचे विश्लेषण होऊ शकले नाही. या 584 पैकी 147 उमेदवारांनी आपल्यावर फौजदारी गुन्हे असल्याचे जाहीर केले. तर 113 जणांविरुद्ध गंभीर स्वरुपाचे गुन्हे प्रलंबित आहेत. प्रमुख राजकीय पक्षांपैकी सपाचे 35, काँग्रेसचे 23, बसपाचे 20, भाजपचे 18, राष्ट्रीय लोकदलाचे प्रत्येकी एक आणि आम आदमी पक्षाच्या सात उमेदवारांनी त्यांच्याविरुद्ध प्रलंबित गुन्हे दाखल असल्याची कबुली दिली आहे. महिलांवरील अत्याचाराचे गुन्हे, एकावर खून, 18 जणांवर खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी सहा उमेदवारांविरुद्ध खटले सुरु आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Subhash Velingkar: सुभाष वेलिंगकरांची अटक अटळ? कोर्टाचा दिलासा नाही, जामीन अर्जावर सोमवारी सुनावणी

Saint Francis Xavier: सुभाष वेलिंगकरांच्या अटकेसाठी उद्रेक; पर्यटक, विद्यार्थ्यांचे हाल, गोव्यात दिवसभर कुठे काय घडलं?

BKC ते आरे JVLR पंतप्रधान मोदींचा मेट्रोने प्रवास; शाळकरी विद्यार्थी, महिलांशी साधला संवाद पाहा Video

Goa HSE Board Exam: गोवा बारावी बोर्ड परीक्षेच्या वेळापत्रकात बदल, JEE परीक्षेमुळे मोठा निर्णय

गिरीत बंदिस्त खोलीत आढळला मृतदेह , संशयास्पद मृत्यूचा कुटुंबियांचा अंदाज; गोव्यातील ठळक बातम्या

SCROLL FOR NEXT