Aditya Thackeray
Aditya Thackeray Dainik Gomantak

Goa Election 2022: 'गोव्यात कायदा सुव्यवस्थेची चिरफाड झालीयं'

गोव्यात (Goa) मागील दहा वर्षात कायदा सुव्यवस्थेची चिरफाड झाली आहे. सध्या राज्यात दडपशाहीचे वातावरण निर्माण झाले आहे.
Published on

आगामी काळात पाच राज्यांमध्ये निवडणुका होणार आहेत. यामध्ये गोवा राज्याचा देखील समावेश आहे. राजकीय नेते निवडणुकीच्या काळात एकमेकांवर आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झाडत आहेत. याच पाश्वभूमीवर शिवसेना युवा नेते आणि महाराष्ट्र राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) दोन दिवसीय गोवा दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी राज्यातील प्रमोद सावंत (Pramod Sawant) सरकारवर साखळी मतदार संघातून प्रचारसभा घेत हल्लाबोल केला. त्यातच आज आदित्य ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेत सामान्य गोवेकरांशी संवाद साधला. (Shiv Sena leader Aaditya Thackeray launches Digital Manifesto Of For Goa Election)

ठाकरे पुढे म्हणाले, ''आम्ही कोणतेही श्रेय मिळविण्यासाठी काम करत नाही. जनतेचा विकास हाच आमच्या श्रेयाचा मुळ हेतू आहे. आम्हाला लोकांमध्ये राहून लोकांचं काम करायचं आहे. पक्ष वाढविण्याचा प्रत्येक पक्षांना अधिकार आहे, त्यामुळे आम्हाला कोणत्याही ब्लेम गेममध्ये पडायचं नाही. गोव्यात मागील दहा वर्षात कायदा सुव्यवस्थेची चिरफाड झाली आहे. सध्या राज्यात दडपशाहीचे वातावरण निर्माण झाले आहे. गोव्यात पर्यावरणाचा मुद्दा कळीचा बनला आहे. त्यामुळे महाराष्ट्राप्रमाणे गोव्यात शाश्वत विकास करण्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत.''


Aditya Thackeray
शिवसेना भूमिपुत्रांना न्याय मिळवून देणार: आदित्य ठाकरे

दरम्यान ठाकरे म्हणाले, गोव्यात शिवसेना गोवेकरांचा विकास करण्यासाठी आली आहोत. गोव्यातील प्रत्येक सामान्य नागरिकापर्यंत शिवसेना पोहोचली आहे. शिवसेना गोव्यातीला आगामी निवडणुकीसह प्रत्येक निवडणुक लढवणार आहोत. शिवसेना ही गोव्याला नवी नाही. भाजपने आमच्या पाठीमध्ये खंजीर खुपसला. गोव्यात आम्हाला उत्तम प्रतिसाद मिळत आहे. त्याचबरोबर स्थानिक भूमिपुत्रांना आम्ही न्याय देणार आहोत. त्यामुळे स्थानिकांना नोकऱ्या देणे, शाश्वत विकास करणे यासाठी आम्ही कटीबध्द आहोत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com