उत्तराखंड, पंजाब आणि गोवा निवडणुकीपूर्वीच 'हा' मोठा सर्व्हे आला समोर

भाजपला 32.64 टक्के, काँग्रेसला 16.74 टक्के आणि आम आदमी पार्टीला 24.85 टक्के मते मिळू शकतात.
Assembly Election 2022
Assembly Election 2022Dainik Gomantak
Published on
Updated on

कडाक्याच्या थंडीत पाच राज्यांमध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकांमुळे देशातील राजकीय वातावरण तापले आहे. पंजाब वगळता उर्वरित चार राज्ये- उत्तर प्रदेश, उत्तराखंड, गोवा आणि मणिपूरमध्ये सध्या भाजपची सत्ता आहे आणि या राज्यांमध्ये आपली सत्ता टिकवून ठेवण्याचे आव्हान पक्षासमोर आहे. त्याचबरोबर देशातील जनता भाजपच्या विरोधात असून यावेळी या राज्यांमध्ये मोठा बदल होणार असल्याचा दावाही विरोधक करत आहेत. दरम्यान, उत्तराखंड, गोवा (goa) आणि पंजाबच्या संदर्भात ओपिनियन पोल समोर आला आहे, ज्यामध्ये काँग्रेसची चिंता वाढल्याची बातमी आहे.

Assembly Election 2022
TMC गोव्यात भाजपला पराभूत करण्यासाठी नाही तर..

भाजप गोव्यात परतणार का?

गोव्याबाबत घेतलेल्या जनमत चाचणीत भारतीय जनता पक्ष (BJP) पुन्हा एकदा येथे सरकार स्थापन करताना दिसत आहे. मात्र, गोव्यातून आम आदमी पक्षासाठीही एक आनंदाची बातमी आहे. ओपिनियन पोलनुसार, गोव्यातील विधानसभेच्या 40 जागांपैकी भाजप 20 ते 23 जागा आणि आम आदमी पार्टी (AAP) 6 ते 10 जागा जिंकू शकते. त्याचबरोबर काँग्रेसला (Congress) 4 ते 6 जागा मिळतील. याशिवाय अपक्ष उमेदवार 5 ते 6 जागा जिंकू शकतात. येथे भाजपला 32.64 टक्के, काँग्रेसला 16.74 टक्के आणि आम आदमी पार्टीला 24.85 टक्के मते मिळू शकतात.

Assembly Election 2022
टीएमसीचा जाहीरनामा जनतेसमोर, गोव्यातील तरुणांसह महिलांना मिळणार लाभ

पंजाबमध्ये यावेळी सरकार कोण बनवणार?

ओपिनियन पोलनुसार पंजाब विधानसभा निवडणुकीत (Assembly Election) आम आदमी पक्ष मोठा विजय मिळवून सरकार स्थापन करू शकतो. विधानसभेच्या 117 जागा असलेल्या पंजाबमध्ये आम आदमी पक्ष 57 ते 60 जागा जिंकताना दिसत आहे. त्याचवेळी पंजाबमध्ये सरकार चालवणाऱ्या काँग्रेसच्या खात्यात 43 ते 46 जागा जाऊ शकतात. याशिवाय 10 ते 13 जागा शिरोमणी अकाली दलाच्या आणि 0 ते 3 जागा भारतीय जनता पक्षाच्या खात्यात जाऊ शकतात. मात्र, काँग्रेससाठी दिलासा देणारी बातमी म्हणजे सर्वेक्षणात सहभागी 46.32 टक्के लोक मुख्यमंत्री चरणजीत सिंह चन्नी यांच्या कामावर खूश आहेत.

उत्तराखंडमध्ये काँग्रेसला किती जागा मिळतील?

ओपिनियन पोलच्या निकालात, विद्यमान मुख्यमंत्री (CM) पुष्कर सिंह धामी यांना पुढील मुख्यमंत्री म्हणून त्यांची पहिली पसंती लोकांकडून सांगण्यात आली आहे. 70 विधानसभा जागांसह उत्तराखंडमध्ये भाजप पुन्हा एकदा सरकार स्थापन करू शकते आणि 42 ते 46 जागा जिंकताना दिसत आहे. दुसरीकडे काँग्रेसला 12 ते 14 तर आम आदमी पार्टीला 8 ते 11 जागा मिळू शकतात. याशिवाय 2 ते 5 जागांवर अपक्ष उमेदवारांना विजय मिळू शकतो. मतांच्या प्रमाणातही भाजप आघाडीवर आहे आणि 41.11 टक्के मते त्यांच्या खात्यात जाऊ शकतात. त्याचबरोबर काँग्रेसला 27.31 टक्के आणि आम आदमी पार्टीला 18.67 टक्के मतं मिळत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com