Goa Election Dainik Gomantak
गोवा निवडणूक

गोव्यातील मतदान केंद्रात पर्यावरणपूरक पद्धतीने सजावट

निवडणूक अधिकारी कुणाल यांनी गोव्यातील (Goa) मतदारांना मतदान करण्याचे आवाहन केले आहे.

दैनिक गोमन्तक

पणजी: गोव्यात सध्या 'निवडणूकमय' वातावरण झाले आहे. अवघ्या काही तासात गोमंतकीय मतदानाचा हक्क बजावणार आहेत. लोकांचा मतदान प्रक्रियेचा अनुभव सुखद आणि सोयीस्कर करण्यासाठी निवडणूक आयोगाने जय्यत तयारी सुरू केली आहे.

याबाबत माहिती देताना गोव्याचे मुख्य निवडणूक अधिकारी कुणाल म्हणाले, गोव्यातील मतदान केंद्र पर्यावरणपूरक पद्धतीने सजवण्यात आली आहेत. 105 मतदान केंद्र महिला अधिकारी सांभाळतील. राज्यातील कोविड परिस्थिती लक्षात घेऊन अतिरिक्त 80 मतदान केंद्र वाढवण्यात आली आहेत. निवडणूक अधिकारी कुणाल यांनी गोव्यातील (Goa) मतदारांना मतदान करण्याचे आवाहन केले आहे.

निवडणूक आयोगाने मतदान यंत्रांचे वाटप सुरू केले आहे. गोव्यातील ताळगाव पठारावरील श्यामाप्रसाद मुखर्जी इनडोअर मैदानावर तसेच नावेली येथील पर्रीकर स्टेडियममध्ये मतदान केंद्रांवर कार्यरत असणार्‍या अधिकार्‍यांना मतदान यंत्रांचे आणि साहित्याचे वाटप सुरू करण्यात आले आहे. येथे गोवा पोलिस प्रशासन (Goa Police) आणि निवडणूक अधिकारी (Election Incharge) तैनात आहेत. गोव्यातील 40 मतदारसंघांमध्ये आज दिवसभरात 'मतदान बूथ' बसविण्यात येणार आहेत.

गोव्यातील लोक उद्या कोणत्या पक्षाला पसंती देतात हे जाणून घेण्यासाठी 10 मार्चची प्रतीक्षा करावी लागणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

अमेरिकेत 'इंडिया डे'चा धमाका! 80व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त न्यू यॉर्कची 'अँपायर स्टेट बिल्डींग' झाली तिरंगामयी; तारक मेहताच्या कलाकारांची खास उपस्थिती

Goa Crocodile Video: गोव्यात घरात घुसली भलीमोठी मगर; कुटुंबाची उडाली तारांबळ, वन विभागाकडून मगरीची सुरक्षित सुटका

PM Modi Mental Naxalism Statement: मोदींच्या ‘बौद्धिक नक्षली’ उल्लेखावरून रणकंदन; विरोधकांचा केंद्र सरकारवर हल्लाबोल

Upasnagar Sankval Junction: भुयारी मार्ग नाही तर रस्त्यावर उतरू! उपासनगर-सांकवाळ ग्रामस्थांचा इशारा; चौक ठरतोय ‘मृत्यूचा सापळा’

VIDEO: "चिदंबरम यांच्या काळात 5000 निष्पाप मारले गेले!"; 'दिमागी नक्षल' मुद्द्यावरुन भाजपचा काँग्रेसवर कडाडून हल्लाबोल, सुधांशु त्रिवेदींनी घेतलं फैलावर

SCROLL FOR NEXT