कॉंग्रेसला मतदान करून मत वाया घालवू नका; केजरीवाल यांचे गोमंतकीयांना आवाहन

गोव्याच्या जनतेने भाजप आणि कॉंग्रेसला संधी दिली आहे. आता एक संधी 'आप'ला द्या, असे केजरीवाल म्हणाले.
Arvind Kejriwal
Arvind Kejriwal Dainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: भाजप आणि कॉंग्रेसला मतदान करू नका. 10 मार्चला गोवा विधानसभा निवडणुकीचे निकाल जाहीर झाल्यावर एका दिवसात कॉंग्रेसचे सर्व आमदार भाजपमध्ये प्रवेश करतील. या पक्षांना मतदान करून तुमचे मौल्यवान मत वाया घालवू नका. ते मत आम आदमी पार्टीला (AAP) द्या, असे आवाहन शनिवारी 'आप'चे सर्वेसर्वा अरविंद केजरीवाल यांनी केले.

Arvind Kejriwal
गोव्यात काही पक्ष डिपॉजिट जप्त करून घेण्यासाठी निवडणूक लढवत आहेत: फडणवीस

केजरीवाल पुढे म्हणाले, भाजप समर्थकांना मी 'आप'ला मतदान करण्याचे आवाहन करतो. गोव्याच्या जनतेने भाजप आणि कॉंग्रेसला संधी दिली आहे. आता एक संधी 'आप'ला द्या. कारण 'आप' एकमेव असा पक्ष आहे जो भ्रष्टाचार न करता संपूर्णपणे जनतेच्या विकासावर भर देईल.

गोवा विधानसभा निवडणूक (Goa Assembly Election) मतदानाला आता अवघे काही तास उरले आहेत. राज्यात कलम 144 लागू करण्यात आले आहे. दरम्यान, प्रचार करण्यास देखील निवडणूक आयोगाकडून बंदी घालण्यात आली आहे. परिणामी या काळात सोशल मीडियावरून प्रचार होण्याची शक्यता आहे. उमेदवार सोशल मीडिया (Social Media) साईटचा प्रचारासाठी वापर करू शकतात. या माध्यमातून कोणत्याही प्रकारे आचारसंहितेचे उल्लंघन होऊ नये म्हणून मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांनी राज्यात 'विशेष सोशल मीडिया नियंत्रण कक्ष' स्थापन केले आहे. सोमवारी म्हणजेच 14 फेब्रुवारीला गोव्याची जनता कोणत्या पक्षाला प्राधान्य देते, हे 10 मार्च रोजीच सर्वांना कळणार आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com