कळंगुट: राज्यातील भंडारी समाजाला कुणीच कुणाच्या दावणीला बांधण्याचा प्रयत्न करू नये. आतापर्यंत शिवोलीचे प्रतिनिधित्व करणाऱ्या एकाही भंडारी समाजाच्या नेत्याने समाजाच्या विकासासाठी किंबहुना शिवोलीच्या विकासासाठी काडीचेही योगदान दिले नसल्याचे मत बार्देश तालुका भंडारी समाजाचे उपाध्यक्ष जयदेव शिरोडकर यांनी सांगितले. दिलायला लोबो ह्या शिवोलीच्या (Siolim) विकासासाठी तळमळत असल्याने आता त्यांना भंडारी समाजाचा पाठिंबा राहणार असल्याचेही त्यांनी सांगितले. (political leaders igniorant towards development of siolim)
भंडारी समाज आणि माजी मंत्री मायकल लोबो (Michael Lobo Goa) यांच्या संदर्भात प्रसिद्ध झालेल्या विरोधार्थी वृत्ताला अनुसरून शिवोलीत घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत जयदेव शिरोडकर बोलत होते. यावेळी व्यासपीठावर उत्तर गोवा जिल्हा पंचायतीचे माजी अध्यक्ष वासुदेव कोरगावकर, हणजूण पंचायतीचे पंच सदस्य हनुमंत गोवेकर, महिला पंच सदस्या शितल गोवेकर तसेच चंदन मांद्रेकर उपस्थित होते. नारायण मांद्रेकर म्हणाले, विरोधी वृत्त प्रसिद्ध करण्याआधी बार्देशातील भंडारी समाज बांधवांची बैठक बोलविणे आवश्यक होते. कळंगुटचे माजी आमदार तथा माजी मंत्री राहिलेले मायकल लोबो हे राज्यव्यापी नेते आहेत. त्यांनी आतापर्यंत भंडारी समाजाला सदोदित सहकार्य केलेले आहे.
दिलायला यांना बाहेरची म्हणणे चुकीचे
पर्राच्या माजी सरपंच तसेच मायकल लोबो यांच्या पत्नी दिलायला लोबो यांना शिवोलीकरांनी स्वतःहून शिवोलीतून विधानसभेची निवडणूक लढण्याचा आग्रह धरला होता त्यामुळे त्या यंदाच्या निवडणूक रिंगणात उतरलेल्या आहेत. त्यांना बाहेरच्या संबोधणे पूर्ण चुकीचे असल्याचे हणजूण - कायसूव पंचायतीचे पंच सदस्य हनुमंत गोवेकर यांनी सांगितले.
बहुमताने निवडून आणण्याचा संकल्प
भंडारी समाजाच्या आग्रहानुसार, विधानसभेची निवडणूक (Goa Assembly Election) लढविणाऱ्या दिलायला लोबो यांना भंडारी समाजाचा पूर्ण पाठींबा असून, त्यांना बहुमताने शिवोली मतदारसंघातून निवडून आणण्याचा आपण संकल्प करत असल्याचे हनुमंत गोवेकर यांनी सांगितले.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.