मनोहर पर्रीकर यांच्या पश्चात आम्ही भाजप सरकार पाडणार होतो; पण.. : आलेमाव

चर्चिल आलेमाव : 18 आमदारांच्‍या विजयाचा दावा; अन्य आमदारही पाठिंबा देणार
 MGP-TMC alliance for goa election
MGP-TMC alliance for goa election Dainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: यावेळी गोवा विधानसभा निवडणुकीत तृणमूल काँग्रेस व मगो युतीचे सरकार बहुमत संपादन करून सत्तेवर येईल, असा विश्‍वास माजी मुख्यमंत्री तथा तृणमूल काँग्रेसचे नेते चर्चिल आलेमाव यांनी ‘गोमन्तक टिव्ही’ला दिलेल्या मुलाखतीत व्यक्त केला. तृणमूलचे 10 आणि मगोचे 8 असे आमचे 18 आमदार निवडून येतील. त्‍यानंतर पूर्ण बहुमतासाठी आवश्‍यक असलेले अन्य आमदार आमच्‍या बाजूने धावत येतील, असा दावा त्यांनी केला. तसेच यावेळची विधानसभा निवडणूक (Goa Assembly Election) ही आपली शेवटची निवडणूक असल्याचे सुतोवाच त्यांनी केले. (charchil Alemao statment about bjp government)

 MGP-TMC alliance for goa election
कोविड जोमात, कार्यकर्ते कोमात! खरी कुजबूज

तृणमूल काँग्रेस (Goa TMC) पक्षाला गोव्यातील ख्रिस्ती मतदार मते देतील काय, असे विचारले असता चर्चिल यांनी थेट उत्तर न देता तृणमूलच्या सर्वेसर्वा ममता बॅनर्जी या सर्वांना बरोबर घेऊन जाणाऱ्या नेत्या असल्याचे सांगितले. यासंदर्भात ते पुढे म्हणाले की, पश्‍चिम बंगालमध्‍ये 70 टक्के लोक हिंदू, 20 टक्के मुस्‍लिम व 3 टक्के लोक ख्रिस्ती आहेत. तेथे मदर तेरेझा यांनी जे कार्य केले आहे, ते सर्वांना ज्ञात आहे. त्याचप्रमाणे ममतांचेही खूप मोठे कार्य असल्याने त्यांना गोव्यात मतदार पाठिंबा देतील. ममतांनी ज्या तीन योजनांचे आश्‍वासन गोमंतकीयांना दिले आहे, त्यामुळे सत्ताधारी भाजपसह अन्य सर्व पक्ष बावचळले आहेत. तशा योजनांची तयारी कोणत्याही पक्षाने दाखवलेली नाही, याकडे आलेमाव यांनी लक्ष वेधले.

सरकार पाडणार होतो...पण...

मनोहर पर्रीकर (Manohar Parrikar) यांच्या निधनानंतर तुम्ही ते सरकार पाडणार होता काय, असे विचारले असता आलेमाव यांनी ‘होय’ असे उत्तर दिले. परंतु काँग्रेसला सरकार करायचे नव्हते, त्यामुळे तसे घडले नाही असा दावा त्यांनी केला. यावेळी मायकल लोबो यांच्यावरही त्यांनी टीका केली. लोबो आता काँग्रेसतर्फे आपण पाच आमदार निवडून आणणार असे वक्तव्य करतात. अगोदर त्‍यांनी निवडून येऊन दाखवावे, अशी टिप्पणी त्यांनी केली.

काँग्रेसने ‘तो’ प्रस्‍ताव नाकारला

राष्ट्रवादी काँग्रेस (Goa NCP Party) पक्षाने तुमच्या मागण्या मान्य न केल्यामुळे तुम्ही तृणमूलमध्ये जाण्याचा निर्णय घेतला काय, असे विचारले असता आपल्याला कोणी आव्हान देऊ शकत नसल्याचे ते म्हणाले. गेल्या आठ महिन्यांपूर्वी आपण काँग्रेससमोर प्रस्ताव ठेवला होता. आपण 8 जागा राष्ट्रवादीसाठी मागितल्या होत्या. परंतु दिनेश गुंडू राव यांनी त्याला योग्य प्रतिसाद दिला नाही. नुवे, दाबोळी, काणकोण व अन्य काही मतदारसंघांसाठी आपण मागणी केली होती, असे ते म्हणाले.

वालंका वारसा चालवणार!

आपल्याला 5 मुली आहेत. त्यापैकी फक्त एक वालंका हीच स्वतःहून राजकारणात आली आणि ती राजकारणाचा वारसा चालवणार असल्याचे आलेमाव यांनी सांगितले. ही आपली शेवटची निवडणूक आहे असे ते म्‍हणाले. राजकारण व फुटबॉल यापैकी कोणती गोष्ट सोडणार, असे विचारले असता फुटबॉल सोडणार नाही असे त्यांनी स्पष्ट केले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com