Political Fight in Priol Constituency Dainik Gomantak
गोवा निवडणूक

प्रियोळ मतदारसंघात ‘करो या मरो’ची स्थिती

गावडेंसमोर परंपरा टिकवण्याचे आव्हान : ढवळीकर, निगळ्येही शर्यतीत

दैनिक गोमन्तक

मिलिंद म्हाडगुत

प्रियोळ हा सध्या फोंडा तालुक्यातील सर्वात ‘संवेदनशील’ मतदारसंघ बनला आहे. ‘रात्रंदिन आम्हा युध्दाचा प्रसंग’ अशी परिस्थिती सध्या प्रियोळात दिसते. उमेदवारा एवढेच त्यांच्या कार्यकर्त्यांवरही निवडणुकीचा ‘ज्वर’ चढल्याचे स्पष्टपणे दिसत आहे. माजी कला, संस्कृती मंत्री गोविंद गावडे, माजी मंत्री तथा मगो पक्षाध्यक्ष दीपक ढवळीकर व अपक्ष म्हणून रिंगणात उतरलेले उद्योजक संदीप निगळ्ये या तिघांतील लढत सध्या रंगतदार होत चालली आहे. (Political Fight in Priol Constituency News Updates)

कोण जिंकून येणार, यावर पैजाही लावल्या जात आहेत. सोशल मीडियावर पण प्रियोळच ‘हायलाईट’ होताना दिसत आहे. ‘व्होकल फॉर लोकल’ या नाऱ्याला धार चढली असून अपक्ष उमेदवार संदीप निगळ्ये यांच्या प्रचाराचा हा नारा गाभा बनला आहे. मगोपचे (MGP) दीपक ढवळीकर प्रचारात सक्रिय बनले असून त्यांना आता मगोपचे सर्वेसर्वा तथा मडकईचे आमदार सुदिन ढवळीकर यांची साथ लाभत आहे. मडकईत संभाव्य विजय गृहीत धरून सुदिन ढवळीकरांनी आपला मोर्चा आता प्रियोळकडे वळविला आहे. ही आपल्या भावाची शेवटची निवडणूक असून त्यांना एक शेवटची संधी द्या, असे भावनिक आवाहन ते मतदारांना करताना दिसताहेत. माजी मंत्री गोविंद गावडे हे आपण केलेल्या विकासाचा दाखला देऊन मते मागताना दिसत आहेत. 2017 च्या निवडणुकीत भाजप पुरस्कृत अपक्ष उमेदवार असलेल्या गोविंद गावडे यांनी दीपक ढवळीकरांवर 4812 मतांनी विजय मिळवला होता. यावेळी ते भाजपचे (BJP) अधिकृत उमेदवार आहेत. आता त्यांची जागा निगळ्येंनी घेतली आहे. निगळ्ये हे भाजप उमेदवारीच्या शर्यतीत होते. पण गावडेंनी भाजप मध्ये प्रवेश केल्यामुळे त्यांच्या आशेवर पाणी पडले. त्यामुळे ते आता स्वतःच्या शक्तीवर ही निवडणूक लढवित आहेत.

प्रियोळ जि. पंचायतीत मगोपचे दामोदर नाईक, तर कुर्टी जिल्हा पंचायतीत मगोपच्याच प्रिया च्यारी या निवडून आल्या होत्या, पण जिल्हापंचायतीचे प्रियोळच्या बाबतीत महत्व थोडे कमी आहे. या तिघांशिवाय कॉंग्रेसतर्फे दिनेश जल्मी, आपतर्फे नोनू नाईक, आरजीतर्फे विश्वेष नाईक, राष्ट्रवादीतर्फे दिग्विजय वेलिंगकर हे रिंगणात आहेत. दत्ताराम शेटकर यांनी अपक्ष उमेदवारी दाखल केली आहे. पण खरी लढत आहे, ती भाजप, मगोप व अपक्ष यांच्यात. यामुळे सध्या प्रियोळमधील राजकीय वातावरण काय, ‘करो या मरो’ असे बनले असून कोण बाजी मारणार हे 10 मार्चलाच दिसेल.

दोघांच्या संघर्षात तिसऱ्याचा लाभ ?

गोविंद गावडे व संदीप निगळ्ये हे दोघेही भाजपचे असल्यामुळे त्यांच्या संघर्षात दीपक ढवळीकर तर बाजी मारणार नाही ना, अशीही चर्चा रंगत आहे. पण गावडे समर्थक त्यांची वैयक्तिक मते व भाजपची मते ,असा हिशोब करीत असून ते पुन्हा बाजी मारतील, असा दावा करीत आहेत. तर दीपक ढवळीकरांचा सावईवेरे, माशेल, भोम, प्रियोळ या भागात जोर असून ते इथे आघाडी घेतील, असा दावा समर्थक करताहेत.

मगोच्या प्रचारापासून तृणमूल नेते दूरच !

मगोपचे उमेदवार दीपक ढवळीकर यांच्या प्रचाराची धुरा सुदिन ढवळीकर हेच सांभाळताना दिसताहेत. तृणमूलशी युती असली तरी तृणमूलचा (TMC) कोणताही नेता अद्याप मगोपच्या प्रचाराला आलेला दिसला नाही. वास्तविक तृणमूलशी युती ही मगोपची नकारार्थी बाजू ठरू शकते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Karthik Aaryan In Goa: 'रुह बाबा'नं पुन्हा जिंकलं चाहत्यांचं मन; गोव्यात एन्जॉय करतानाचे फोटो केले शेअर!

Winter Care Tips: हिवाळ्यात त्वचेची घ्या विशेष काळजी; 'हे' घरगुती उपाय नक्की ट्राय करा!

Margao Police: हुल्लडबाजांना चाप; मडगाव पोलिसांनी जप्त केल्या मॉडिफाईड बुलेट

South Goa Beach: दक्षिण गोव्यातील समुद्र किनाऱ्यांची धूप वृध्दी सुरुच; राष्ट्रीय अभ्यासातून खुलासा!

Shruti Prabhugaonkar: गोमंतकीयांना कोट्यवधी रुपयांना गंडवणाऱ्या श्रुतीला अवघ्या १० दिवसात जामीन

SCROLL FOR NEXT