बाबू आजगावकर उपमुख्‍यमंत्री, दामोदर नाईक मंत्री!

मुख्‍यमंत्र्यांची घोषणाबाजी: सासष्‍टीच्‍या आठही जागा जिंकणार
Manohar Babu Ajgaonkar
Manohar Babu AjgaonkarDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: सासष्‍टी तालुक्‍यातील आठही जागा भारतीय जनता पार्टी (BJP) जिंकेल असा विश्‍‍वास व्‍यक्त करत निवडणुकीपूर्वीच मडगावचे उमेदवार बाबू आजगावकर हे नव्‍या मंत्रिमंडळात उपमुख्‍यमंत्री तर फातोर्ड्याचे उमेदवार दामोदर नाईक मंत्री असतील, अशी घोषणा मुख्‍यमंत्री डॉ. प्रमोद सावंत (Pramod Savant) यांनी केल्‍याने सर्वत्र चर्चेला ऊत आला आहे. मडगाव येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यापूर्वीच मुख्‍यमंत्र्यांनी गोविंद गावडे(Govind Gawde), रवी नाईक यांनाही मंत्री करण्‍याचे जाहीर केल्‍याने इतर उमेदवारांच्‍या भुवया उंचावल्‍या आहेत. (Goa election 2022)

Manohar Babu Ajgaonkar
गोव्यात कॉंग्रेसची सत्ता आल्यास महिलांच्या रक्षणासाठी प्रथम प्राधान्य: प्रियंका गांधी

यावेळी मुख्‍यमंत्री पुढे म्‍हणाले की, बाबू आजजगावकर(Babu Ajgaonkar) यांना मडगावातील अल्पसंख्याक मतदारांचा मिळत असलेला प्रतिसाद पाहून दिगंबर कामत वैफल्यग्रस्त झालेले आहेत. कामत यांनी साखळी मतदारसंघात हस्तक्षेप करण्यापेक्षा त्यांचा ढासळत चाललेला गड सांभाळावा. भाजपवर टीका करणाऱ्या विजय सरदेसाई यांनी काब्रस्तानाची ती जामीन रूपांतर करण्यामागील कारण स्पष्ट करावे असे आवाहन सावंत यांनी केले आहे. भाजप पहिल्याच वेळी सासष्टी तालुक्यातील आठही मतदारसंघांत निवडणूक लढवत असून तेथे सर्वत्र ‘कमळ’ च फुलणार आहे असा विश्वास त्‍यांनी व्यक्त केला. डॉ. सावंत यांच्‍याबरोबर सासष्टीतील मडगावचे उमेदवार बाबू आजगावकर, फातोर्ड्याचे दामू नाईक उपस्थित होते.

जाहीरनामा उद्या

विधानसभा निवडणुकीसाठी (Assembly elections) भाजपचा जाहीरनामा (संकल्‍पपत्र) उद्या मंगळवार दि. 8 रोजी केंद्रीय मंत्री आणि भाजपचे ज्‍येष्‍ठ नेते नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांच्‍या हस्‍ते पणजीत प्रकाशित करण्‍यात येणार आहे. पर्यटनविकास, साधनसुविधांची निर्मिती, खनिज उद्योगाची सुरूवात आणि रोजगाराच्‍या संधी यावर बेतलेला हा जाहीरनामा असेल, अशी माहिती प्रदेशाध्‍यक्ष सदानंद शेट तानावडे (SADANAND SHET TANAVADE) यांनी दिली.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com