गोवा एक छोटसं राज्य आहे, मात्र या छोट्याश्या राज्याच्या समुद्रात राजकीय त्सुनामी यायला सुरवात झाली आहे. गोव्याचे मंत्री मायकल लोबो यांनी एकतर्फी निवडणूक लढण्याची घोषणा केली. 2022 मध्ये होणाऱ्या निवडणुकांपूर्वी सत्ताधारी भारतीय जनता पक्षामध्ये (BJP) वादाची ठीणगी पडताना दिसत आहे. त्यामुळे दिलायला लोबो यांनी शिवोली मतदारसंघातून विधानसभा निवडणूक लढवण्याचे ठरवले आहे. त्यांनी काँग्रेस नेते सुधीर कांदोळकर यांचेही समर्थन केले आहे आणि मी कोणत्याही तिकिटावर लढले तरी विजयी होणार असा विश्वासही दिलायला यांनी व्यक्त केला.
भाजपचे प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे यांनी तिकीट इच्छुकांना पक्षाच्या अंतर्गत प्रक्रियेचा आदर करण्याचे वारंवार सांगितले असतानाच लोबोंच्या या घोषणेमुळे सत्ताधारी पक्ष द्विधा परिस्थीती अडकला आहे असे म्हणायला हरकत नाही. तानावडे यांनी यापुर्वीच सांगितले की, तिकीट वितरण प्रक्रियेमध्ये राज्य युनिटकडून राष्ट्रीय संसदीय मंडळाकडे शिफारस केली जाते, त्यांचा निर्णय अंतिम असतो. जोपर्यंत ती प्रक्रिया पूर्ण होत नाही, तोपर्यंत कोण भाजपच्या तिकिटावर निवडणूक लढवणार हे मी स्वत: ठरवू शकत नाही.
एकीकडे 2017 मध्ये शिवोलीमधून पराभूत झालेले भाजपचे माजी खासदार दयानंद मांद्रेकर हे स्वतःसाठी किंवा आपल्या मुलासाठी भाजपचे तिकीट मिळविण्यासाठी प्रयत्न करत असल्याचे दिसत आहे. तर दुसरीकडे माजी मुख्यमंत्री आणि भाजप नेते लक्ष्मीकांत पार्सेकर, जे मांद्रे मतदारसंघातून निवडणूक लढवणार आहेत, त्यांना सध्या या जागेचे प्रतिनिधित्व करणारे दयानंद सोपटे यांचे आव्हान आहे. सोपटे यांनी फेरनिवडणुकीसाठी भाजपचा झेंडा घेऊन प्रचाराचा अधिकृत शुभारंभ केला आहे. 2017 मध्ये त्यांनी काँग्रेसच्या तिकिटावर पार्सेकर यांच्याविरोधात निवडणूक लढवली होती. नंतर त्यांनी राजीनामा दिला, आणि भाजपमध्ये प्रवेश केला आणि ते पुन्हा निवडून आले. आता तिकीट कोणाला मिळणार याचा पत्ता नाही आणि प्रचारासाठी गोव्यातील नेत्यांचा आटापिटा चाललेला दिसत आहे.
मला वाटतं की यावेळी 100% जनता दिलायला निवडून देईल. दिलायला लोकांच्या आशीर्वादाने शिवोलीमधून निवडणूक लढवेल असे वक्तव्य लोबो यांनी बुधवारी केले. “गोव्यातील लोकांना चांगले उमेदवार हवे आहेत जेणेकरून ते लोकांचे प्रश्न सोडवतील. मग ते पाणी असो की वीज. आज लोक मूलभूत गरजांसाठी लढत आहेत. काही खासदारांनी जनतेच्या हितासाठी कोणतेही काम केले नाही म्हणून आता गोव्यातील लोक एक चांगला उमेदवार शोधत आहेत.
लोबो म्हणाले की, "मी कोणासाठी तिकीट मागत नाही मात्र चांगल्या उमेदवारांना तिकीट द्यायला हवे अशी माझी इच्छा आहे, त्यांच्या पत्नीने स्वतः शिवोलिमधून निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आणि त्यांना सुरवातीपासूनच प्रतिसाद सकारात्मक आहे. त्यमुळेच भाजपने दिलायलाला तिकिट देण्याचे निच्छीत केले नाही."
कांदोळकर यांना लोबो म्हापसा येथे पाठिंबा देत आहेत, ते भाजपचे माजी सदस्य आहेत. ते माजी उपमुख्यमंत्री फ्रान्सिस डिसोझा यांच्या जवळचे होते, ज्यांचे 2019 मध्ये निधन झाले. डिसोझा यांच्या निधनामुळे झालेल्या पोटनिवडणुकीत भाजपने त्यांचा मुलगा जोशुआ यांना उमेदवारी दिली आणि कांदोळकर यांना काँग्रेसमध्ये सामील होण्यास प्रवृत्त केले होते. आणि म्हणून त्यांनी म्हापसा येथून निवडणूक लढवली होती. आता कांदोळकर यांनी काँग्रेसच्या तिकीटाची अपेक्षा असल्याचे सांगत लोबो यांच्या पाठिंब्याचे स्वागत केले. राज्यात सत्ता टिकवण्याचा प्रयत्न करणाऱ्या भाजपकडे 39 सदस्यीय सभागृहात 27 आमदार आहेत, तर काँग्रेसकडे चार, गोवा फॉरवर्ड तीन, महाराष्ट्रवादी गोमंतक पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रत्येकी एक सदस्य आहे. सभागृहात तीन अपक्ष आहेत. आता लोबो यांच्या पत्नीला तिकीट मिळणार का? लोबो कॉंग्रेसमध्ये प्रवेश करणार का? या सगळ्या प्रश्नांची उत्तर येणारा काळच देईल.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.