पत्नीप्रेमापोटी मायकल लोबो देणार भाजपला सोडचिठ्ठी!

प्रमोद सावंत सरकारमध्ये मंत्री असणारे आणि कळगुंटचे आमदार मायकल लोबो (Michael Lobo) भाजपला सोडचिठ्ठी देणार असल्याचे निश्चित झाले आहे.
Michael Lobo
Michael Lobo Dainik Gomantak

देशात पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचे (Assembly Elections) बिगुल अत्तापासूनच वाजू लागले आहे. यातच आता छोट्याशा गोव्यातही (Goa) विधानसभा निवडणूकीचे पडघम वाजू लागले आहेत. राज्यात सर्वच राजकीय पक्षांनी तयारी सुरु केली आहे. सत्ताधारी भाजप आपल्या पाच वर्षातील कामाचा लेखाजोखा मतदारासमोर माडंत आहे. तर दुसरीकडे कॉंग्रेस (Congress), तृणमूल कॉंग्रेस, आपसह स्थानिक पक्ष सत्तेत असणाऱ्या भाजपवर (BJP) निशाणा साधत आहेत. तसेच अनेक राजकीय पक्षांच्या बड्या नेत्यांनी प्रचारसभा घेत गोव्यातील जनतेला रिझविण्यासाठी प्रयत्न सुरु केले आहेत. या सगळ्या पाश्वभूमीवर गोवा हे अत्यंत प्रभावशाली असे राज्य आहे. मात्र विकासाच्या नावावर फक्त सरकार लोकांना फसविण्याचा प्रयत्न करत आहे. राज्यातील मच्छिमार बांधव अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे. मात्र दिल्ली गोव्याला आपल्या तालावर नाचवत असल्याचे म्हणत ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) यांनी मोदी सरकारवरही निशाणा साधला.

दरम्यान, शिवोलीमधून (Shivolim) डिलायला लोबो (Dilayala lobo) यांना भाजपकडून उमेदवारी मिळणे अशक्य झाल्यानंतर प्रमोद सावंत सरकारमध्ये मंत्री असणारे आणि कळगुंटचे आमदार मायकल लोबो भाजपला सोडचिठ्ठी देणार असल्याचे निश्चित झाले आहे. पुढील काही दिवसांमध्ये मायकल लोबो आणि पत्नी डिलायला लोबो भाजपला सोडचिठ्ठी देऊन कॉंग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत. यासंदर्भात लोबो यांची कॉंग्रेसमधील जेष्ठ नेत्यांशी चर्चा सुरु असल्याचे देखील सांगण्यात येत आहे.

Michael Lobo
लोबोंनी दिले भाजपला खुले आव्हान

साळगावमध्ये बोलताना मंत्री मायकल लोबो म्हणाले, भाजपसमोर आम्ही योग्यवेळी आम्हाला जे वाटते ते मांडू. पक्षाला आमचे म्हणणे मान्य नसल्यास आम्हाला इतर पक्षांचेही पर्याय खुले आहेत. मंगळवारी आम्ही फक्त तीन उमेदवारांची नावे घोषित केली आहेत. त्याचबरोबर राज्यातील इतर काही मतदारसंघात विधानसभा निवडणूक जिंकू शकणाऱ्या इतर उमेदवारांची देखील आम्ही लवकरच नावे घोषित करणार आहोत.'' पत्नी डिलायला लोबो यांना शिवोलीमधून उमेदवारी देण्याचे आणि बार्देश तालुक्यातून पाच मतदारसंघात आपल्याच मर्जीतील उमेदवार देण्याची तयारी केल्याचे देखील स्पष्ट झाले आहे. यासाठी राज्यातील भाजप नेतृत्वावर दबाव आणत आहेत. परंतु भाजपमध्ये अशाप्रकारच्या दबावतंत्राचा कोणताही फायदा होणार नसल्याने लोबो यांनी भाजपला त्याग करुन भाजपचाच प्रतिस्पर्धी असणाऱ्या कॉंग्रेसमध्ये जाऊन बार्देश तालुका राजकीयदृष्ट्या आपल्या हातात ठेवण्याचे लोबो यांनी निश्चित केले असल्याचे म्हटले जात आहे.

काम न करणाऱ्या आमदारांवर लोबोंचा हल्लाबोल

बार्देशमधील मतदारसंघांचा सर्व्हे करण्याची आवश्यकता आहे. त्यामधून मागील पाच वर्षामध्ये कोणत्या मतदारसंघामध्ये विकासकामे झाली आहेत, हे लोकांसमोर येईल. मात्र एखाद्या मतदारसंघामध्ये विकास झाला नाही म्हणून थेट सरकारला जबाबदार धरता कामा नये. तर त्या संबंधित मतदारसंघांतील आमदाराचा दोष आहे. लोकप्रतिनीधींनी आपल्या मतदारसंघामध्ये जनतेच्या विकासासाठी कामे केली पाहिजेत. त्याचबरोबर लोकांच्या हितासाठी आमदारांनी रस्त्यावर येऊन लढलेही पाहिजे, असे म्हणत मायकल लोबो यांनी अप्रत्यक्षरित्या सत्ताधारी पक्षातील काही आमदारांवर निशाणाही साधला.

Michael Lobo
Goa: मडगाव येथील 'रविंद्र भवन' तियात्र सादरीकरणासाठी खुले

मायकल लोबोंना कॉंग्रेस कार्यकर्त्यांचा विरोध

प्रमोद सावंत सरकारमध्ये मंत्री असणारे मायकल लोबो लवकरच कॉंग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याचे सांगितले जात आहे. मात्र कळंगुटमधील स्थानिक कॉंग्रेस पदाधिकाऱ्यांकडून जोरदार विरोध होताना दिसत आहे. मायकल लोबोंना कॉग्रेसमध्ये घेतल्यास आम्ही पक्षाचा त्याग करणार असल्याचा इशारा या पदाधिकाऱ्यांकडून देण्यात आला आहे. त्यामुळे कॉंग्रेसच्या नेत्यांनी कळंगुटमधील कॉंग्रेस पदाधिकाऱ्यांची समजूत काढण्याचे प्रयत्न सुरु केले असल्याचे देखील माहिती सूत्रांकडून मिळत आहे.

कॉंग्रेस नेत्यांचे बंड

मंत्री मायकल लोबो आणि त्यांची पत्नी डिलायला लोबो यांना कॉंग्रेसमध्ये प्रवेश दिल्यास आम्ही कॉंग्रेसला सोडचिठ्ठी देणार असल्याचे कॉंग्रेस पदाधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले आहे. माजी आमदार आग्नेल फर्नांडिस, माजी सरपंच जोजफ सिक्वेरा, अँथनी मिनेझिस यांच्यासह कॉंग्रेसमधील पदाधिकाऱ्यांनी पत्रकार परिषद घेत इशारा दिला आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com