AAP Manish Sisodia Dainik Gomantak
गोवा निवडणूक

गोव्यात 'आप'चे सरकार आल्यास लोक इतर राजकीय पक्षांना विसरतील: सिसोदिया

इतर पक्षांच्या उमेदवारांना त्यांच्या बँक बॅलन्समध्ये शून्य जोडण्यासाठी निवडून यायचे आहे. मात्र, आपचे उमेदवार निवडून आल्यावर ते तुमचे वीज बिल शून्य करतील, असे मनीष सिसोदिया म्हणाले.

Akash Umesh Khandke

मडगाव: आम आदमी पार्टीचे सरकार गोव्याचा विकास करेल. आमचा पक्ष प्रत्येक व्यक्तीची समृद्धी सुनिश्चित करेल. मला खात्री आहे की, गोव्यात 'आप'चे सरकार स्थापन झाल्यास लोक पुढील निवडणुकांपर्यंत इतर सर्व राजकीय पक्षांना विसरतील, असा विश्वास दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया (Manish Sisodia) यांनी शनिवारी गोव्यात व्यक्त केला. (Goa Assembly Election 2022)

सिसोदिया शनिवारी सांगे मतदारसंघातील 'आप'चे उमेदवार अभिजित देसाई यांच्या प्रचाराचा भाग म्हणून सांगे नगरपालिका सभागृहात आयोजित सभेला संबोधित करत होते. यावेळस त्यांनी आपच्या घोषणापत्राचे अनावरण केले. सिसोदिया यांनी सांगेसह नावेली आणि कुंकळ्ळी
मतदारसंघात जाहिरनाम्याचे प्रकाशन केले.

सिसोदिया म्हणाले, दिल्लीत आम्ही निस्वार्थ सेवेने मतदारांचा (Voters) विश्वास जिंकला आहे. दिल्लीत आम्ही 76 जागांपैकी आम्ही 62 जागा जिंकल्या. इतर पक्षांच्या उमेदवारांना त्यांच्या बँक बॅलन्समध्ये शून्य जोडण्यासाठी निवडून यायचे आहे. मात्र आपचे उमेदवार निवडून आल्यावर ते तुमचे वीज बिल शून्य करतील. तुमचे मत अभिजितला आमदार म्हणून निवडून आणण्यासाठी आणि मंत्री बनवण्यासाठी नाही तर ते गोव्याला स्वच्छ आणि कार्यक्षम सरकार देण्यासाठी आहे.

'आप'चे (AAP) उमेदवार देसाई म्हणाले की, 'आप' आणि इतर राजकीय पक्षांमधील फरक लोकांना कळला आहे, यावेळी जनता 'आप'ला सुशासनासाठी संधी देणार याची मला खात्री आहे. 'आप'चे सरकार आल्यास प्रत्येक गृहिणीला घरखर्चासाठी दरमहा 1000 रुपये दिले जातील.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs AUS: शिखर धवन-युसूफ पठाणची वादळी खेळी निष्फळ, कांगारूंनी भारताचा 4 गडी राखून केला पराभव

Usgaon Bridge: उसगावात 62 वर्षे जुनाट पूल दुरावस्थेत; स्थानिकांची दुरुस्तीची मागणी

Valpoi: बाप रे... गायीच्या पोटात प्लास्टिकचा ढीग! शस्त्रक्रिया करून तब्बल 26 किलो प्लास्टिक काढलं

Viral News: प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत सापडली पत्नी, बेदम मार खाल्यानंतर नग्नच पळाला लव्हर Watch Video

Pusapati Ashok Gajapathi Raju: पुसापती अशोक गजपती राजूंनी गोव्याचे राज्यपाल म्हणून स्वीकारली सूत्रे; आंध्रवासीयांच्या आनंदाला भरते

SCROLL FOR NEXT