डिचोली: भाजप हा शाश्वत विकास आणि शाश्वत राजकारण करणारा पक्ष आहे. विकास हेच भाजपचे धोरण आहे. राजकारणात कुठे तरी तडजोड करावीच लागते. मात्र राजकारणात 'सौदेबाजी'ला थारा देता कामा नये, असे प्रांजळ मत महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री तथा भाजपचे (BJP) निवडणूक प्रचार प्रभारी देवेंद्र फडणवीस यांनी डिचोलीत बोलताना व्यक्त केले. (Devendra Fadnavis Election Campaign Goa)
शनिवारी सायंकाळी भाजपच्या प्रमुख कार्यकर्त्यांसह प्रतिष्ठित नागरिक आणि विविध संघटनांच्या प्रतिनिधीशी संवाद साधताना फडणवीस बोलत होते. येथील शेट्ये प्राईड इमारतीतील सभागृहात आयोजित या कार्यक्रमप्रसंगी भाजपचे डिचोलीतील (Bicholim) उमेदवार राजेश पाटणेकर यांची उपस्थिती होती.
मगो, तृणमूलवर टिका
यावेळी फडणवीस यांनी मगो आणि तृणमूलवर (TMC) टिका केली. तृणमूल काँग्रेस हा अलोकशाही पद्धतीने वागणारा पक्ष आहे. अशा पक्षाची ध्येयधोरणे जर मगो पक्षाला मान्य असतील. तर मगो पक्षाला साथ द्यावी की नाही, त्याचा सुज्ञ गोमंतकीयांनी विचार करण्याची वेळ आली आहे, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.
तो निर्णय चुकीचा होता
राजेश पाटणेकर यांनी बोलताना आपल्या आमदारकीच्या काळात डिचोलीच्या विकासासाठी केलेले कार्य उपस्थितांसमोर ठेवत भावी संकल्पही स्पष्ट केले. प्रचारा दरम्यान आपल्याला मतदारांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. असे राजेश पाटणेकर यांनी स्पष्ट करतानाच यावेळी निवडणूक न लढविण्याचा पूर्वी घेतलेला निर्णय चुकीचा होता. याची आता आपल्याला जाणीव झाल्याची कबुली दिली. सूत्रसंचालन डॉ. शेखर साळकर यांनी केले. नगराध्यक्ष कुंदन फळारी यांनी आभार मानले.
जनतेशी संवाद
यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थितांशी संवाद साधून उपस्थितांनी उपस्थित केलेल्या शंकांचे निरसन केले. डॉ. मिथुन महात्मे, राजन केसरकर, आश्विनी पटवर्धन, पारिश खानोलकर, उदय जांभेकर आदींनी या कार्यक्रमात भाग घेतला.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.