Michael Lobo Dainik Gomantak
गोवा निवडणूक

मायकेल लोबोंमुळे भाजप कचाट्यात

भाजप (BJP) व भाजपचे कार्यकर्ते हे आमचे कुटुंब आहे. त्यामुळे इतर पक्षात जाण्याबाबत विचारच नाही.

दैनिक गोमन्तक

भाजप (BJP) व भाजपचे कार्यकर्ते हे आमचे कुटुंब आहे. त्यामुळे इतर पक्षात जाण्याबाबत विचारच नाही. असे सांगणारे भाजपचे मंत्री मायकेल लोबो आणि त्यांच्या पत्नी सध्या खूपच चर्चेत आहेत. त्याचे कारणही तसेच आहे, ते म्हणजे त्यांच्या पत्नी गोव्यातील येणारी निवडणूक लढविण्याची प्रबळ इच्छा एकीकडे लोबो म्हणतात, मी भाजप आणि आमचे कार्यकर्ते सोडून कोठेच जाणार नाही, पण दुसरीकडे त्यांच्या पत्नी दिलायला लोबो या येणारी निवडणूक काही झाले तरी लढविणारच मग अपक्ष उभे राहावे लागले तरी चालेल. असा प्रचार करत आहे. पत्नीच्या हट्टापुढे लोबो आणि त्यांचा पक्ष भाजप चांगलाच कचाट्यात आडकले आहेत.

मायकेल व्हिन्सेंट लोबो (Michael Lobo) गोव्यातील एक व्यापारी आणि मुरब्बी राजकारणी, लोबो यांचा जन्म 8 जून 1976 रोजी झाला. लोबो हे रोमन कॅथलिक समाज्याचे आहेत. सद्या गोव्यात भारतीय जनता पक्षाचे (BJP) सरकार आहे. या सरकार (Government) मध्ये लोबो यांच्याकडे कचरा नियोजन आणि विकस या खात्याचे मंत्री आहेत. 2012 मधील गोवा विधानसभा निवडणुकीत, त्यांनी कळंगुट मतदारसंघातील विद्यमान सदस्य ऍग्नेलो निकोलस फर्नांडिस यांचा पराभव करत राज्याच्या सहाव्या विधानसभेचे सदस्य बनले.

लोबो हे उत्तर गोवा नियोजन आणि विकास प्राधिकरणाचे अध्यक्ष आहेत. तसेच सरकारमधील विविध समित्यांचे सदस्य देखील आहेत. कँडोलिममध्ये भारतातील पहिला प्लेबॉय क्लब (Playboy Club) सुरू करण्यास त्यांनी जोरदार विरोध केला.

लोबो यांची राजकीय कारकीर्द:

लोबो हे भारतीय जनता पक्षाचे सदस्य असून ते उत्तर गोवा भाजपचे अध्यक्ष देखील आहेत. लोबो यांनी 2012 च्या गोवा विधानसभेच्या निवडणुकीत कळंगुट विधानसभा मतदारसंघातून (मतदारसंघ क्रमांक 8 ) भाजपच्या तिकिटावर निवडणूक लढवली होती. निवडणुकीवरील (election) खर्चाच्या त्यांच्या विधानानुसार, त्यांनी त्यांच्या प्रचारावर जवळपास 400,000 ईतके पैसे खर्च केले होते. 17,751 या मतांपैकी एकूण 9,891 मते त्यांना मिळाली होती. त्यांनी भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे उमेदवार आणि कलंगुटचे विद्यमान आमदार अग्नेलो निकोलस फर्नांडिस (Nicholas Fernandes) यांच्या विरोधात 1,875 मतांनी विजय मिळवला होता. ते गोवा राज्याच्या सहाव्या विधानसभेचे सदस्य झाले.

मायकेल लोबो आणि प्लेबॉय क्लब

24 मे 2012 पासून ते उत्तर गोवा नियोजन आणि विकास प्राधिकरणाचे अध्यक्ष आहेत. गोव्याची राजधानी पणजी आणि म्हापसा यांच्यावर प्राधिकरणाचा अधिकार आहे. एप्रिल 2013 मध्ये, त्यांनी कँडोलिम बीच, कँडोलिम येथे भारताचा पहिला प्लेबॉय क्लब उघडण्याच्या प्रस्तावाला तीव्र विरोध केला आणि हा प्रस्ताव "वेश्या व्यवसायाला प्रोत्साहन देण्याच्या समान" असल्याचे सांगितले. सरकारने या प्रस्तावावर पुढे जाऊन प्लेबॉय क्लबला परवानगी दिल्यास त्याविरोधात उपोषण करण्याचा इशारा देखील त्यांनी दिला होता.

सरपंच, सामाजिक कार्यकर्ते, महिला गट आणि स्वतः सत्ताधारी पक्षाच्या सदस्यांसह समाजाच्या विविध क्षेत्रातील तीव्र विरोधामुळे सरकारने आपली परवानगी मागे घेतली.

निवडणुकीदरम्यान त्यांनी मंगळुरूमध्ये पक्षाच्या उमेदवारांसाठी प्रचार केला. त्यांच्या समर्थनासाठी मंगळूरच्या रोमन कॅथोलिक डायोसीजचे बिशप अलॉयसियस पॉल डिसोझा यांची भेट घेतली होती. 8 ऑगस्ट 2013 पासून ते गोवा सरकारमधील (Goa Government) अंदाज समिती आणि अंदाजपत्रक समितीचे सदस्य आहेत.

तसेच, 8 नोव्हेंबर 2015 रोजी, लोबो यांनी कळंगुट येथील एका रिसॉर्टच्या शेजारी बांधलेली बेकायदेशीर कंपाउंड भिंत पाडली. रिसॉर्ट (Resort) मालकाने कळंगुट चर्चजवळील त्याच्या रिसॉर्टला लागून असलेल्या सखल भातशेतीतही बेकायदेशीरपणे भराव टाकला आहे.

लोबो-फडणवीस यांची भेट

राजकीय क्षेत्रातील व्यक्तींची भेट ही कधीच वैयक्तिक नसते जेव्हा दोन राजकारणी एकत्रित येतात तेव्हा ते राजकारणाच्याच गोष्टी करतात. मंत्री मायकल लोबोंच्या (Minister Michael Lobo) निवासस्थानी गोव्याचे प्रभारी देवेंद्र फडणवीसांची (Devendra Fadnavis) झालेली भेट सुद्धा येत्या विधानसभा निवडणुकी संबंधात उहापोह करण्यासाठी होती असे गोवा प्रभारी देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी सांगितले.

या भेटीबाबत लोबो म्हणाले, पर्राच्या सरपंच तसेच आपल्या पत्नी दिलायला लोबो या शिवोली मतदार संघातून विधानसभेची निवडणूक लढवण्याची तयारी करत आहेत. याबाबतीत मी भाजपचा एक सदस्य असल्या कारणाने फडणवीस यांना कल्पना दिली आहे. यांवर त्यांनी हसून योग्य वेळी योग्य निर्णय घेणार असल्याचे आश्वासन देखील दिले आहे. असे मंत्री लोबो यांनी सांगितले.

लोबो पती-पत्नीचे शिवोलीत स्वागतच

निवडणुका लढविण्याचा अधिकार हा प्रत्येक भारतीय नागरिकाला आहे. त्यामुळे तसा तो मायकल लोबो (Michael Lobo) आणि त्यांच्या पत्नी दिलायला लोबो यांनाही आहे. येत्या विधानसभेची निवडणूक जर लोबो पती-पत्नींना शिवोलीतून लढवायची असेल तर त्यांचे येथे स्वागतच आहे.

पण स्वाभिमानी शिवोलकरांचा पाठींबा मात्र आपल्यालाच असल्याचे शिवोलीचे आमदार तथा माजी जलसंपदा मंत्री विनोद दत्ताराम पालयेंकर (Minister Vinod Dattaram Palayenkar) यांनी छातीठोकपणे सांगितले आहे. मी माझ्या शिवोली मतदारसंघात आतापर्यंत भरघोस विकास कामे केलेली आहेत. त्यामुळे स्थानिक जनता आपल्या पाठीशी ठामपणे उभी असल्याचे त्यांनी सांगितले.

लोबो यांची पत्नी शिवोलीत 'अपक्ष' म्हणून निवडणूक लढवणार

शिवोली मतदारसंघातून (Siolim Constituency) आपण चार वेळा निवडून आलो आहे. गेली 25 वर्षे मी शिवोलिच्या लोकांसाठी काम करत आहे. शिवोलित भारतीय जनता पक्षाची (BJP Goa) संघटना मजबूत आहे. त्यामुळे येत्या निवडणुकीत शिवोलीत पुन्हा एकदा भाजपचाच उमेदवार निवडून येणार आहे. त्यामुळे कोणत्यारी पक्षाने तिकीट दिले नाहीतर अपक्ष निवडणूक लढविणार असल्याचे लोबो यांच्या पत्नी यांनी सांगितले. लोकशाहित कुणीही निवडणूक लढवू शकतो.

उमेदवारीचा निर्णय पक्षाचा

येत्या निवडणूकीत शिवोलीतून उमेदवारी कुणाला द्यायची याचा निर्णय पक्षाला घ्यायचा आहे. आपण पक्ष निवडणुकीत पराभूत होऊनही आपले काम चालूच ठेवले आहे. गेली साडेचार वर्षे आपण आमदार नसताना देखील कामे केली आहेत. या उलट विद्यमान आमदार पुर्ण अपयशी ठरले आहेत.

दुसऱ्या पक्षात जाणार नाही

उमेदवारी मिळे वा ना मिळो आपण दुसऱ्या पक्षात जाणार नाही. भाजपमधून (BJP) राजकीय कारकिर्दी सुरु केलीय. राजकीय निवृत्तीही भाजपमधूनतच घेणार आहे. भाजप व भाजपचे कार्यकर्ते हे आमचे कुटुंब आहे. त्यामुळे इतर पक्षात जाण्याबाबत विचारच नाही. त्याचबरोबर पक्ष माझ्यावर अन्याय करणार नाही याची खात्री मला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Karthik Aaryan In Goa: 'रुह बाबा'नं पुन्हा जिंकलं चाहत्यांचं मन; गोव्यात एन्जॉय करतानाचे फोटो केले शेअर!

Winter Care Tips: हिवाळ्यात त्वचेची घ्या विशेष काळजी; 'हे' घरगुती उपाय नक्की ट्राय करा!

Margao Police: हुल्लडबाजांना चाप; मडगाव पोलिसांनी जप्त केल्या मॉडिफाईड बुलेट

South Goa Beach: दक्षिण गोव्यातील समुद्र किनाऱ्यांची धूप वृध्दी सुरुच; राष्ट्रीय अभ्यासातून खुलासा!

Shruti Prabhugaonkar: गोमंतकीयांना कोट्यवधी रुपयांना गंडवणाऱ्या श्रुतीला अवघ्या १० दिवसात जामीन

SCROLL FOR NEXT