कॉंग्रेस म्हणतंय कोण मायकल लोबो?

हल्लीच काँग्रेस पक्षात प्रवेश केलेल्या बार्देसमधील काही नेत्यांना लोकांनी लोबो यांच्या व्यासपीठावरही पाहिले आहे.
Congress Leader P Chidambaram says who is Michael Lobo
Congress Leader P Chidambaram says who is Michael Lobo Dainik Gomantak

पणजी : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि गोवा निवडणुकीचे निरीक्षक पी. चिदंबरम यांनी कोण आहेत मायकल लोबो, असे उद्गार काढून राजकीय घडामोडींबद्दल साळसूदपणाचा आव आणण्याचा प्रयत्न केला असला तरी मायकल लोबो यांनी दिल्लीत काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांबरोबर वाटाघाटी पूर्ण केल्या आहेत. लोबो यांच्या संभाव्य काँग्रेस प्रवेशामुळे काँग्रेस पक्षात तीव्र असंतोष निर्माण झाला आहे. त्यामुळे चिदंबरम यांनी सारवासारव करण्याचा प्रयत्न केला, परंतु, दिल्लीहून मिळालेल्या विश्वसनीय वृत्तानुसार, ते निवडणुकीपूर्वी काँग्रेस पक्षात प्रवेश करतील. त्यांच्याच सल्ल्याने बार्देसमधील उमेदवारांच्या निवडीबाबत काँग्रेस पक्ष हालचाल करीत आहेत. हल्लीच काँग्रेस पक्षात प्रवेश केलेल्या बार्देसमधील काही नेत्यांना लोकांनी लोबो यांच्या व्यासपीठावरही पाहिले आहे.

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर कॉंग्रेसने मतदारसंघनिहाय गटसमित्यांच्या बैठका सुरू केल्या आहेत. आज पणजी आणि कळंगुट मतदारसंघातील गटाध्यक्ष आणि प्रमुख कार्यकर्त्यांच्या बैठका पार पडल्या. मात्र, सर्वांचे लक्ष कळंगुटच्या बैठकीकडे होते. कारण या मतदारसंघात भाजपचे मंत्री लोबो कॉंग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा गेल्या महिन्यापासून सुरू आहे. या चर्चेमुळे निष्ठावंत कॉंग्रेस कार्यकर्ते दुखावल्याचे चित्र होते. आता निवडणूक प्रभारी चिदंबरम यांनी निष्ठावंतांना न्याय देत पक्षातील कार्यकर्त्यालाच उमेदवारी दिली जाईल, असे जाहीर केल्याने कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.

Congress Leader P Chidambaram says who is Michael Lobo
बाबूश यांच्यावर आरोप करणाऱ्या पीडित मुलीला समन्स जारी करण्याची विनंती

यावेळी विरोधी पक्षनेते दिगंबर कामत, प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर, उत्तर गोवा कॉंग्रेसचे अध्यक्ष विजय भिके, कार्याध्यक्ष आलेक्स रेजिनाल्ड लॉरेन्स, कळंगुटचे माजी आमदार आग्नेलो फर्नांडिस, माजी सरपंच जोसेफ सिक्वेरा, तसेच ॲन्थनी मिनेझिस आदी उपस्थित होते. येथील एका तारांकीत हॉटेलमध्ये दीर्घ काळ सुरू असलेली ही बैठक कार्यकर्त्यांसमवेत बंद दरवाजाआड झाली. या बैठकीला सुमारे 300 कार्यकर्ते उपस्थित होते. या बैठकीत पक्षाची मतदारसंघातील स्थिती, आव्हाने यांचा आढावा घेत पक्षाच्या निष्ठावंत आणि प्रामाणिक कार्यकर्त्यांना निवडणुकीला सामोरे जाण्याचा सल्ला देण्यात आला.

माझी ऊर्जा दुप्पट : विदर्भातील अंधारी व्याघ्र प्रकल्पाला शुक्रवारी भेट देऊन मी इथला आरामदायी अनुभव घेतला. गोव्याच्या ऐतिहासिक राजकीय घडामोडींच्या पूर्वी इथले निर्भय आणि भव्य अस्तित्व पाहून लोकांसाठी काम करण्याची माझी उर्जा दुप्पट झाली आहे, असे मायकल लोबो यांनी ट्वीट केले आहे.

Congress Leader P Chidambaram says who is Michael Lobo
कळंगुटचे गत वैभव पुन्हां परतण्यासाठी एकजुट व्हा : पी. चिदंबरम

राज्याच्या सर्वांगीण विकासामध्ये कॉंग्रेसचे मोठे योगदान असून विद्यमान सरकारने जनतेच्या विरोधात अनेक कामे केल्याने लोक त्यांना त्यांची जागा दाखवून देतील. मागच्या दहा वर्षांत कळंगुटमध्ये हरवलेले पक्षाचे गतवैभव प्राप्त करण्यासाठी सर्वांनी एकजुटी कामाला लागावे.

- पी. चिदंबरम, निवडणूक प्रभारी.

शुक्रवारच्या या बैठकीकडे मतदारसंघातील सर्वांचेच या बैठकीकडे लक्ष लागून राहिले होते. तथापि, मंत्री लोबो यांच्या कॉंग्रेस प्रवेशाबाबत या बैठकीत पुसटशीही चर्चा झाली नाही. लोबो यांचा कॉंग्रेस प्रवेश ही हेतूपुरस्सर पसरविलेली अफवा असल्याचे वरिष्ठांकडून सांगण्यात आले.

- बेनेडिक्ट डिसोझा, कळंगुट गट समितीचे अध्यक्ष

‘‘ कळंगुट मतदारसंघात हेवेदावे विसरून पक्षाने दिलेल्या उमेदवाराच्या पाठीशी आम्ही ठामपणे उभे राहू आणि त्याला निवडून आणू. पक्षाच्या उमेदवारीसाठी ज्या कुणाची वरिष्ठांकडून निवड केली जाईल, त्याच्यामागे आम्ही खंबीरपणे उभे राहू.

- आग्नेलो फर्नांडिस, माजी आमदार

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com