Assembly Elections: देशातील पाच राज्यांमध्ये यावर्षी विधानसभा निवडणुका जाहीर झाल्या आहेत. निवडणूक आयोगाच्या निर्बंधांचे पालन करणे पाचही राज्यांसाठी अनिवार्य असणार आहे. गोव्यातही विधानसभा निवडणुकीची (Goa Assembly Elections 2022) जय्यत तयारी सुरू आहे. सर्वच राजकीय पक्षांनी निवडून येण्यासाठी कंबर कसली आहे. गोव्यात आता कुणाचे सरकार येणार याची सर्वांनाच उत्सुकता लागली आहे. आता निवडणूक अगदी काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. याच पार्श्वभूमीवर गोव्यातील सत्ताधारी पक्षाचे नेते आणि आणि गोव्याचे मुख्यमंत्री (CM Pramod Sawant) आज दिल्लीला रवाना झाले आहे.
आज सकाळी (16 जानेवारी) ते नवी दिल्लीला जाण्यासाठी निघाले आहेत. खरतर आज भाजप (BJP) पक्षातर्फे उमेदवारांची पहिली यादी जाहीर होणार होती. पण पक्षातील वाढत्या घडामोडींमुळे ही यादी पुढे ढकलली असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे आता भाजपाची पहिली यादी 19 जानेवारीला जाहीर होणार आहे. दरम्यान मुख्यमंत्री आगामी विधानसभा निवडणुकीसाठी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा (J.P. Nadda) यांची भेट घेण्याची शक्यता आहे.
काल आपचे सर्वेसर्वा अरविंद केजरीवाल (Arvind Kejariwal) दिल्लीतून गोव्यात प्रचारासाठी आले होते. आणि घरोघरी जाऊन मतदारसंघातील नागरिकांना भेट दिली. आणि आज प्रमोद सावंत हे निवडणुकीच्या संबंधित चर्चेसाठी नवी दिल्लीला रवाना झाले आहेत. त्यांच्या या दौऱ्याकडे संपूर्ण गोव्याचे लक्ष लागून राहिले आहे.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.