Goa Forward Party : Vijai Sardesai
Goa Forward Party : Vijai SardesaiDainik Gomantak

Vijai Sardesai: माझ्या विकासाच्या अजेंड्याला फातोर्डेकरांचा पाठिंबा

गोवा फॉरवर्ड पक्षाचे (Goa Forward Party) अध्यक्ष विजय सरदेसाई (Vijai Sardesai) यांनीही प्रचाराला सुरुवात केली आहे. यादरम्यान त्यांनी फातोर्ड्यातील कुटुंबांची भेट घेत प्रचार केला आहे.
Published on

Vijai Sardesai: गोव्यात सध्या निवडणुकीचे वातावरण दिसत आहे. निवडणूक जाहीर झाल्यापासून सर्वच पक्षांतर्फे मतदारराजाला खूश करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. गोव्यातील राजकीय त्याचबरोबर स्थानिक पक्षांनी आपल्या निवडणूक प्रचाराला (Election Campaign) सुरुवात केली आहे. आपलाच पक्ष सर्वश्रेष्ठ कसा, आपल्याला जनतेची काळजी असून येत्या निवडणुकीत जर जनतेने आपल्याला निवडून दिले तर नक्कीच जनतेच्या समस्या दूर करू, अश्या प्रकारची आश्वासने सर्वच पक्षांतर्फे देण्यात येत आहेत.

Goa Forward Party : Vijai Sardesai
Goa Police Accident: भरधाव कारच्या धडकेत 2 पोलिसांचा मृत्यू

गोवा फॉरवर्ड पक्षाचे (Goa Forward Party) अध्यक्ष विजय सरदेसाई (Vijai Sardesai) यांनीही प्रचाराला सुरुवात केली आहे. यादरम्यान त्यांनी फातोर्ड्यातील कुटुंबांची भेट घेत प्रचार केला आहे. कुटुंबांच्या समस्या त्यांनी जाणून घेतल्या आहेत. यावेळी कुटुंबासोबतचा फोटो ट्विटरवर शेअर करत त्यांनी लिहिले आहे की, 'फातोर्डाला नवीन उंचीवर नेण्यासाठी कुटुंबे कटिबद्ध आहेत. माझ्या प्रचारादरम्यान मी याचा साक्षीदार आहे. 14 फेब्रुवारीला होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत (Goa Assembly Elections 2022) फातोर्डेकर फातोर्डावर प्रेम व्यक्त करतील आणि माझ्या विकासाच्या अजेंड्याला सहमतीने पाठिंबा देतील, यात मला शंका नाही.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com