former Spokesperson of South Goa In Congress Rakhi Prabhudessai Naik joins Goa Trinamool Congress

 

Dainik Gomantak

गोवा निवडणूक

काँग्रेसला आणखी एक झटका! राखी प्रभुदेसाई नाईक यांचा तृणमूलमध्ये प्रवेश

काँग्रेसच्या दिशाहीन नेतृत्वावर राखी प्रभुदेसाई नाईक यांनी राजीनामा देवून ठपका ठेवला.

दैनिक गोमन्तक

गोव्यातील विधानसभा निवडणुकीपूर्वी (Goa Assembly Election) काँग्रेसला एकापाठोपाठ एक धक्के बसत आहेत. आता प्रदेश काँग्रेस (Congress) कमिटीच्या प्रवक्त्या राखी प्रभुदेसाई नाईक (Rakhi Prabhudessai Naik) यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. त्यांनी बुधवारी पक्ष सोडला आणि तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश केला. राखी प्रभुदेसाई यांनी गोवा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर (Girish Chodanakr)यांच्याकडे राजीनामा सुपूर्द केला. यानंतर, त्यांनी ट्विट केले आणि लिहिले की, जड अंतःकरणाने खूप विचारविनिमय केल्यानंतर, त्यांनी काँग्रेससोबतची त्यांची छोटी पण अर्थपूर्ण खेळी संपवण्याचा निर्णय घेतला आहे. काँग्रेसच्या दिशाहीन नेतृत्वावर त्यांनी हा राजीनामा देवून ठपका ठेवला आहे.

केंद्रीय नेतृत्वाविरोधात स्थानिक नेतृत्व काम करत आहे

राखी प्रभुदेसाई म्हणाल्या की, "गोव्यातील काँग्रेसचे स्थानिक कार्यकर्ते केंद्रीय नेतृत्वाच्या विरोधात काम करत आहेत. येथे स्थानिक नेतृत्व पूर्णपणे गोंधळलेले आहे. गोव्यात भाजपला तृणमूल काँग्रेस हा एकमेव पर्याय आहे." राखी यांनी दोन महिन्यांपूर्वी शिवसेना सोडून काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Vietnam Boat Accident: व्हिएतनाममध्ये मोठी दुर्घटना! 32 भारतीय पर्यटकांना घेऊन जाणारी बोट उलटली; बचावकार्य सुरू

Tivare Village: तिवरे; हिरवाई, शेतीसंस्कृती आणि परंपरा जपणारे शांत गाव

Goa Mining: कावरे खनिज ब्लॉक; सरकारला दिलासा; खंडपीठाच्या निर्णयात हस्तक्षेप करण्यास सुप्रीम कोर्टाचा नकार

Goa Crime: कर्नाटक पोलिसांची म्हापशात धडक; चोरीच्या दागिन्यांचा तपास, गोव्यातील व्यवहार 'महत्त्वाचा दुवा'

Viral Post: इंजिनिअरिंग पूर्ण, 500 ठिकाणी नोकरीसाठी अर्ज... पण इंटरव्ह्यूसाठी एकही कॉल नाही; तरुणाची पोस्ट व्हायरल

SCROLL FOR NEXT