Goa Elections

 

Dainik Gomantak 

गोवा निवडणूक

Goa Elections: मतदारसंघातील बूथवर जास्त लक्ष केंद्रित करा...

आपल्या मतदारसंघातील बूथवर जास्त लक्ष केंद्रित करावे, असे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी प्रमुख कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना आवाहन केले.

दैनिक गोमन्तक

Goa Elections: बूथ सक्षम व कार्यरत करणे, हा कुठल्याही निवडणुकीपूर्वीचा डावपेच असतो. त्याप्रमाणे दक्षिण गोव्यातील प्रत्येक मतदारसंघातील भाजप मंडळाचे पदाधिकारी किंवा जिल्हा परिषदेचे सदस्य यांनी आपल्या मतदारसंघातील बूथवर जास्त लक्ष केंद्रित करावे, असे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी प्रमुख कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना आवाहन केले.

बूथ स्तरावर मतदारांच्या बैठका घेणे. बूथ समितीचे गठण करणे, मतदारांपाशी जाण्यापूर्वी त्यांच्याशी काय बोलावे, कुठले मुद्दे मांडावे, विरोधी पक्षांच्या अपयशाची माहिती देणे, या सारखे मार्गदर्शन कार्यकर्त्यांना करणे योग्य ठरेल असेही नड्डा (J.P Nadda) म्हणाले.

दक्षिण गोवा भाजप (BJP) जिल्हा कार्यालयात त्यानी प्रमुख कार्यकर्त्यांसमोर भाषण केले नाही, तर त्यांच्या समस्या, अडचणी, मतदारसंघाती परिस्थिती या संबंधी माहिती जाणून घेतली. तृणमूल (TMC) तसेच आप (AAP) पक्षांच्या गोव्यातील स्थितीचा त्यांनी आढावा घेतला व त्यांच्या प्रचाराला कसे उत्तर द्यावे, त्यासाठी काय करावे यासंबंधीचे मुद्दे त्यांनी मांडले. कार्यकर्त्यांनी निवडणुकीच्या वेळी संयम बाळगावा, मतदारांकडे अरेरावी भाषेचा वापर करु नये. त्यांच्या प्रश्र्नांची समर्पक उत्तरे द्यावी, असा सल्लाही त्यांनी यावेळी दिला. पक्षाच्या योजना, सरकारी योजनांची माहिती त्यांना देणे महत्वाचे असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

मतदान ओळखपत्राकडे आधारकार्ड (Adhar Card) जोडण्यासाठी जो कायदा संमत केला आहे, तो दूरगामी परिणामाचा अभ्यास करुनच केला आहे. त्यामुळे एकाच माणसाची दोन तीन मतदान केंद्रामध्ये मतदार म्हणून नोंदणी आहे त्यांच्यावर अंकुश बसेल, अशी नावे असलेलेच या कायद्याला विरोध करतात असेही त्यानी स्पष्ट केले.

या कार्यकर्ता मार्गदर्शन मेळाव्याला मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक, राज्यसभा खासदार विनय तेंडुलकर, पक्षाचे राज्य अध्यक्ष सदानंद शेट तानावडे, संघटनमंत्री सतीश धोंड, सरचिटणीस नरेंद्र सावईकर, दामोदर (दामू) नाईक) आदी मंडळी उपस्थित होती.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

फुल पैसा वसूल! रोहित शेट्टी आणतोय 'Golmaal 5', गोव्यात होणार शूटिंगची सुरुवात; अजय देवगणनं दिलीये हिंट

Delhi Airport Technical Glitch: 800 फ्लाईट्सना विलंब, अनेक रद्द; दिल्ली विमानतळावर तांत्रिक अडचणीचा हजारो प्रवाशांना फटका

"तुझी मासिक पाळी संपली की सांग...": महिला क्रिकेटपटूचा सिलेक्टरवर लैंगिक अत्याचाराचा आरोप, क्रीडा विश्वात खळबळ

समुद्रकिनारी रंगला भव्य विवाह! तेजश्री प्रधानने गोव्याच्या किनाऱ्यावर केलं 'Destination Wedding' शूट

Goa Today's News Live: काणकोण बसस्थानकाजवळील रस्त्याची दुर्दशा, चालक हैराण

SCROLL FOR NEXT