...त्यामुळे काँग्रेसमध्येच राहूनच सरकार स्थापित करणार!

विरोधी पक्षनेते दिगंबर कामत तसेच काँग्रेस प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसला बळकटी देणार असा संघटित निर्धार घोषित उमेदवारांनी केला.
Goa Elections 2022

Goa Elections 2022

Dainik Gomantak

Goa Elections: राज्याबाहेरील राजकीय पक्ष एजंटाचा वापर करून मोठी आमिषे दाखवून आमदारांना पक्षांतर करण्यास भाग पाडत आहे. जे स्वार्थासाठी काँग्रेसला सोडून गेले त्यांना पक्षाची व स्वतःची निष्ठा नाही. काँग्रेसचे एकनिष्ठ मतदार त्यांना योग्य धडा शिकवतील. पक्षाने आमच्यावर विश्‍वास दाखवून उमेदवारी दिली आहे; त्यामुळे काँग्रेसमध्येच राहून एकजुटीने सरकार स्थापन करण्याचा प्रयत्न करत आहोत. विरोधी पक्षनेते दिगंबर कामत तसेच काँग्रेस प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसला बळकटी देणार असा संघटित निर्धार घोषित उमेदवारांनी केला.

Goa Elections 2022

रेजिनाल्ड यांचा काँग्रेस आणि टीकाकारांवर जोरदार हल्लाबोल

पणजीतील काँग्रेस (Congress) भवनात घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेला काँग्रेसने जाहीर केलेल्या 8 उमेदवारांपैकी 6 उमेदवार उपस्थित होते. त्यामध्ये संकल्प आमोणकर, टोनी रॉड्रिग्ज, सुधीर कांदोळकर, युरी आलेमाव, राजेश वेरेकर तसेच आल्टॉन डिकॉस्ता यांचा समावेश होता. यावेळी या सर्वांनी एकजुटीने काँग्रेससोबत काम करण्याबरोबरच पक्षाला सत्तेवर आणू असा विश्‍वास व्यक्त केला. ज्यांना या पक्षाने आमदार, मुख्यमंत्री तसेच खासदार बनविले त्यांनी स्वार्थासाठी पक्षाला सोडचिठ्ठी देऊन पक्षांतर केल्याचा आरोप करण्यात आला. तृणमूल काँग्रेस पक्षाने (TMC) ‘आयपॅक’ या दलालला गोव्यात आणून फोडाफोडीचे राजकारण करण्यास लावले आहे. ते कोट्यवधी रुपयांची आमिषे दाखवत आहेत मात्र आम्ही त्याला बळी पडणार नाही तसेच पक्षही सोडून जाणार नाही असे या घोषित उमेदवारांनी सांगितले. यावेळी या राजकीय दलालांचा काँग्रेसतर्फे निषेध करण्यात आला.

Goa Elections 2022

कारापूर-सर्वण पंचायतीच्या उपसरपंचपदी योगेश पेडणेकर

काँग्रेसने नेहमीच राज्याची प्रतिमा राखवून ठेवली आहे. प्रत्येकवेळी लोकांनी उभारलेल्या लढ्यामध्ये साथ दिली आहे. भाजपची (BJP) अनेक घोटाळे काँग्रेसने चव्हाट्यावर आणल्याने तसेच सत्तेवर येण्याची संधी अंधूक असल्याने फोडाफोडी सुरू केली आहे. तृणमूल काँग्रेस राजकारण्यांना आमिषे दाखवत आहेत. मात्र या पक्षाला पैशाचा पुरवठा करण्यामागे कोळसा माफिया आहेत. त्यामुळे कोळसा प्रदूषण तसेच केंद्राचे लोकविरोधी तीन प्रकल्प याबाबत तृणमूल काँग्रेस काहीच वाच्यता करत नाही. काँग्रेस पक्ष एकजूट असून सर्व उमेदवार एकत्रितपणे काम करणार असल्याचे संकल्प आमोणकर म्हणाले.

पैशांचा अश्‍लिल नृत्य अशा शब्दात आरोप करताना उमेदवार युरी आलेमाव म्हणाले, गेल्या काही दिवसांपासून राज्यात ‘पैसा फेको तमाशा देखो’ ही पद्धत सुरू आहे. सत्तेसाठी स्वार्थी राजकारणी कोणत्याही थराला जाऊ शकतात हे त्यांनी दाखवून दिले आहे. ज्या मतदारांनी विश्‍वास ठेवला त्यांचाच विश्‍वासघात करण्यात आला आहे.

Goa Elections 2022

Goa Election: 'भाजपने दिलेले आश्वासन पूर्ण केले, उद्या रिपोर्ट कार्ड मांडणार'

पैशांचे आमिष!

राज्याबाहेरील दोन राजकीय पक्ष पैशांचे आमिष दाखवून राजकारण्यांचे विभाजन करण्याचे काम करत आहे. मात्र काँग्रेसचे उमेदवार या आमिषांना बळी पडणार नाही. पक्षाने आमच्यावर विश्‍वास दाखवून उमेदवारी दिली आहे, त्याला तडा जाऊ दिला जाणार आहे. मागील पोटनिवडणुकीत काँग्रेसच्या मतदारांनी विश्‍वास दाखवला होता तो कायम ठेवण्यासाठी काँग्रेसमधूनच लढणार असल्याचे सुधीर कांदोळकर यांनी स्पष्ट केले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com