Dicholi Election Dainik Gomantak
गोवा निवडणूक

डिचोलीला यावेळी मंत्रिपदाची सुवर्ण संधी

तब्बल 22 वर्षे वंचित: ‘लॉटरी’ कोणाला? जनतेला उत्सुकता

दैनिक गोमन्तक

डिचोली: या निवडणुकीत डिचोली मतदारसंघातून कोण निवडून येणार, त्यापेक्षा मंत्रिपदाची ‘लॉटरी’ कोणाला लागणार याची चर्चा सध्या रंगू लागली आहे. गेली बावीस वर्षे मंत्रिपदापासून वंचित असलेल्या डिचोली मतदारसंघाला यावेळी मंत्रिपदाचा सुवर्ण योग असून डिचोली मंत्रिपदाच्या नजीक असल्याचे संकेत मिळत आहेत.

योगायोगाने सारे काही जुळून आल्यास डिचोलीला यावेळी मंत्रिपद मिळण्याची आशा वाढली आहे.

डिचोलीवासीयांमध्येही मंत्रिपदाबाबत उत्सुकता लागून राहिली आहे. पांडुरंग राऊत यांच्यानंतर डिचोली मतदारसंघाला मंत्रिपद मिळालेलेनाही.

नाही म्हटले, तरी अडीच वर्षांपूर्वी तत्कालीन मुख्यमंत्री पर्रीकर यांच्या मंत्रिमंडळात राजेश पाटणेकर यांची मंत्रिपदी वर्णी लागण्याचे जवळपास निश्चित झाले होते. मात्र, शेवटच्या क्षणी पाटणेकरांचे ग्रह फिरले आणि त्यांचे मंत्री होण्याचे स्वप्न भंगले.

डिचोलीला मिळालेले आतापर्यंतचे मंत्री

1972 साली निवडून आल्यानंतर शशिकलाताई काकोडकर यांना राज्यातील पहिल्या महिला मुख्यमंत्री म्हणून मान जातो. डिचोलीतून निवडून आलेले स्व. हरिष झांट्ये, स्व. पांडुरंग भटाळे यांच्यासह पांडुरंग राऊत यांनी मंत्रिपद उपभोगलेले आहे, तर विद्यमान आमदार राजेश पाटणेकर हे सभापती आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa BJP Corruption: भाजपमधील 'बजबजपुरी' चव्हाट्यावर! सावियो रॉड्रिग्ज यांचा घरचा आहेर; तक्रार थेट मोदी-शहांच्या दरबारी!

Goa Club Fire: हडफडे क्लबची राख अन् सरकारी यंत्रणांचं पितळ उघडं! न्यायदंडाधिकारी चौकशीतून मोठा खुलासा; नियमांना तिलांजली

Goa Navi Mumbai Flight: नाताळची भेट! मोपा ते नवी मुंबई विमानसेवेचा दिमाखदार प्रारंभ; पर्यटनाला मिळणार मोठी उभारी; पाहा संपूर्ण वेळापत्रक!

Goa ZP Election: दक्षिण गोव्यात संधी होती, पण काँग्रेसनेच ती घालवली; पाटकरांविरोधातील तक्रार आता हाय कमांडच्या दरबारी!

Goa Politics: 'आप'चा माजी मुख्यमंत्री चेहरा आता काँग्रेसच्या वाटेवर? अमित पालेकरांच्या पक्षप्रवेशाची जोरदार चर्चा; लवकरच घोषणा!

SCROLL FOR NEXT