मगोशी युतीबाबत फडणवीस आग्रही  Dainik Gomantak
गोवा निवडणूक

Goa Election: मगोशी युतीबाबत फडणवीस आग्रही

19 डिसेंबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी गोव्यात येत असून, पंतप्रधान हे शासकीय घोषणांबरोबर राजकीय घोषणा करत निवडणुकीचे रणशिंग फुकणार आहेत.

दैनिक गोमन्तक

पणजी: येत्या विधानसभा निवडणुकीसाठी (Goa Election 2022) भाजपने (BJP) जोरदार मोर्चेबांधणी सुरू केली आहे. राष्ट्रीय आणि प्रादेशिक पक्षाचे नेते आमदार आणि कार्यकर्त्यांना फोडून भाजपमध्ये प्रवेश देण्याला आता जोर आला आहे. 19 डिसेंबर (Goa Liberation Day) रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) गोव्यात येत असून ते गोव्यात येण्यापूर्वी भाजपने सर्व प्रकारची राजकीय तयारी सुरू केली आहे. पंतप्रधान हे शासकीय घोषणांबरोबर राजकीय घोषणा करत निवडणुकीचे रणशिंग फुकणार आहेत. दुसरीकडे, विरोधी पक्षांचे मात्र अजूनही उमेदवार ठरत नाहीत. काँग्रेस (Congress) आणि इतर प्रादेशिक पक्षांना उमेदवार मिळू नयेत यासाठी भाजप प्रयत्नशील असून या पक्षांच्या संभाव्य उमेदवारांना भाजपात घेण्यासाठी मोर्चेबांधणी सुरू झाली आहे. सध्या काँग्रेसबरोबर गोवा फॉरवर्ड (Goa Forward) आणि मगो पक्षाचे संभाव्य उमेदवार आणि नेते भाजपमध्ये सामावून घेण्यात येत असून यासाठीच मंत्रिमंडळात फेरबदलाची शक्यता आहे.

गोवा मुक्तिदिनाचा मुहूर्त

19 डिसेंबर हा गोवा मुक्तीचा दिवस आहे. यंदा हीरकमहोत्सवी गोवा मुक्तिदिन असल्याने या समारंभाला पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित राहणार आहेत. या दिवशी ते विविध शासकीय कार्यक्रमांना उपस्थित राहणार असून याच दिवशी ते गोवा विधानसभेच्या निवडणुकीचे रणशिंग फुंकतील आणि मोठ्या घोषणा करतील अशी अपेक्षा आहे.

मुख्यमंत्र्यांचा गौप्यस्फोट

आमदार जयेश साळगावकर यांच्या भाजप प्रवेशावेळी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी गौप्यस्फोट करत विविध पक्षातील आठ ते दहा राजकीय नेते काँग्रेस, भाजपच्या संपर्कात असल्याचे सांगत राज्याच्या राजकारणामध्ये गौप्यस्फोट केला. त्यामुळे ‘ते नेते' कोण अशी चर्चा सुरू आहे.

मगोशी युतीबाबत आग्रही

दाजी साळकर यांना भाजपात घेतल्यानंतर काल जयेश साळगावकर यांना प्रवेश देण्यात आला, तर येत्या चार दिवसात काँग्रेस, गोवा फॉरवर्ड आणि मगोचे नेते भाजपवासी होतील, अशी शक्यता आहे. यासाठी 6 डिसेंबर रोजी भाजपचे निवडणूक प्रभारी देवेंद्र फडणवीस, सी. टी. रवी गोव्यात येत आहेत. मगोशी युतीबाबत फडणवीस आग्रही आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT