Goa CM Pramod Sawant  Dainik Gomantak
गोवा निवडणूक

...म्हणून गोव्यात सत्तास्थापनेला विलंब, मुख्यमंत्र्यांनी सांगितलं कारण

मुख्यमंत्रीपदाच्या राजीनाम्यानंतर प्रमोद सावंतांकडे काळजीवाहू मुख्यमंत्र्याची जबाबदारी

दैनिक गोमन्तक

पणजी : गोव्यात भाजपने विजय मिळवल्यानंतर अपक्षांच्या मदतीने सत्तास्थापनेसाठी हालचाली सुरु झाल्या आहेत. मात्र निकाल जाहीर होऊन दोन दिवस झाले तरी भाजपकडून राज्यपालांकडे अद्यापही सत्तास्थापनेचा दावा करण्यात आलेला नाही. डॉ. प्रमोद सावंत यांनी आपल्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामाही राज्यपालांकडे सादर केला आहे. मात्र आता पहिल्यांदाच प्रमोद सावंतांनी राज्यातील सत्तास्थापनेच्या विलंबावर भाष्य केलं आहे. राज्यपालांना राजीनामा सादर केल्यानंतर त्यांनी विधानसभा बरखास्त सरकार करण्यासोबत गोव्याच्या जनतेच्या विकासासाठी नव्या सरकारला संधी देण्याची शिफारस केली आहे.

प्रमोद सावंतांनी (Pramod Sawant) मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिल्यामुळे नवीन सरकार स्थापन होईपर्यंत काळजीवाहू मुख्यमंत्री म्हणून त्यांच्याकडेच जबाबदारी देण्यात आली आहे. प्रमोद सावंतांनी प्रक्रियेचा एक भाग म्हणून राजीनामा दिला आहे. मात्र असं असलं तरीही अपक्षांसह मगोपचा (MGP) पाठिंबा असतानाही गोव्यात अजून सरकार स्थापन झालेलं नाही. त्यामुळे आता चर्चाही सुरु झाल्या होत्या. मुख्यमंत्रीपदाबाबतच्या पेचामुळे सत्तास्थापनेला ब्रेक लागल्याचंही बोललं जात होतं. तसंच काही आमदारांनी मगोपच्या पाठिंब्याला केलेल्या विरोधामुळे सरकार स्थापनेला विलंब लागत असल्याचीही चर्चा होती.

आता प्रमोद सावंतांनी सरकार स्थापनेला होत असलेल्या विलंबावर भाष्य केलं आहे. एकूण पाच विधानसभांपैकी भाजपला (BJP) चार राज्यांमध्ये यश मिळालं आहे. त्यामुळे चारही राज्यांमध्ये एकाच वेळी सत्तास्थापनेचा दावा केला जाणार असल्याचं प्रमोद सावंतांनी सांगितलं आहे. मात्र सत्तास्थापनेचा दावा कधी करायचा याचा निर्णय केंद्रीय निरीक्षकांकडून घेतला जाणार आहे. तेच विधानसभेतील नेत्याची निवड करतील आणि त्यानंतर सत्तास्थापनेचा दावा केला जाईल असं सावंतांनी स्पष्ट केलं आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Bicholim Accident: डिचोलीत भीषण अपघात! नेस्ले कंपनीच्या बसची झाडाला धडक; 7 जखमी, एकाची प्रकृती चिंताजनक

रात्रीच्या अंधारात आगीच्या ज्वाळा आणि किंकाळ्या... वृद्धाश्रमाला लागलेल्या आगीत 16 ज्येष्ठांचा होरपळून दुर्देवी मृत्यू; रुग्णालयात जखमींवर उपचार सुरु Watch Video

Arpora Nightclub Fire: पोलीस कोठडी संपली, आता न्यायालयीन कोठडी; म्हापसा कोर्टाचा लुथरा बंधूंना झटका, 9 जानेवारीपर्यंत राहावं लागणार गजाआड

4 षटक, 8 विकेट्स... बुमराह-शमीला जमलं नाही, ते 22 वर्षीय तरुणाने करून दाखवलं! विश्वविक्रम रचला Watch Video

'बहुमताचा कल पाहूनच निर्णय घेणार'; चिंबल उपोषणावर ZP गौरी कामत यांची सावध भूमिका!

SCROLL FOR NEXT