गोव्यात भाजपविरोधी जनमताचा फायदा घेण्यात काँग्रेसला अपयश का आलं?

भाजपविरोधी मतांचं विभाजन रोखण्यात काँग्रेसला अपयश, नेतृत्त्वावरही प्रश्नचिन्ह
Why Congress Lost in Goa| Goa election result 2022 |
Why Congress Lost in Goa| Goa election result 2022 | Dainik Gomantak
Published on
Updated on

पणजी : गोव्यात भाजपविरोधी असलेल्या जनमताचा फायदा उठवण्यात काँग्रेसला अपयश आल्याचं चित्र आहे. 40 आमदारांच्या विधानसभेत काँग्रेसला केवळ 11 जागांवर समाधान मानावं लागलं आहे. गोव्यात काँग्रेसने हार मानली असली तरीही 2017 च्या विधानसभा निवडणुकीच्या तुलनेत ज्याठिकाणी 17 जागा मिळाल्या होत्या, त्या घटून 11 वर आल्याने काँग्रेसची पिछेहाट झाली आहे. (Why Congress Lost in Goa News Updates)

भाजपविरोधी लाटेचा फायदा महत्त्वाच्या प्रतिस्पर्धी असलेल्या काँग्रेसला मिळणं अपेक्षित होतं. मात्र गोव्यात निवडणुकीच्या रिंगणात असलेल्या आप, तृणमूल काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि रिव्हॉल्युशनरी गोवन्समुळे काँग्रेसच्या (Congress) जिंकण्याच्या शक्यता बऱ्याच मतदारसंघात धुळीला मिळवल्याचं दिसून येत आहे. (Goa election result 2022 news updates)

गोवा विधानसभेचे निकाल जाहीर झाल्यानंतर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पी चिदंबरम यांनी भाजपविरोधी मतांचं विभाजन अनपेक्षितरित्या झाल्याचं वक्तव्य केलं आहे. काही मतदारसंघात तर काँग्रेस उमेदवारांचा निसटता पराभव झाला आहे. काँग्रेसकडून मतांचं विभाजन टाळता आलं असतं पण ते करण्यात अपयश आलं. जर मतदारांना मतांचं विभाजन न करता काँग्रेसलाच मत द्या असं सांगता आलं असतं तर आज कदाचित गोव्यातील चित्र वेगळं असतं असंही चिदंबरम म्हणाले आहेत.

Why Congress Lost in Goa| Goa election result 2022 |
भाजपचं गर्वहरण जनताच करणार : नाना पटोले

गोव्यात 66 टक्के मतदारांनी भाजपविरोधी (BJP) मतदान केलं आहे. मात्र मतांच्या विभाजनामुळे 2017 मध्ये असलेली काँग्रेसच्या मतांची टक्केवारी 28.5 वरुन 23.5 वर आली आहे. काँग्रेसचं प्राबल्य असलेल्या सासष्टी तालुक्यात तर काँग्रेसला केवळ तिन जागांवर समाधान मानावं लागलं आहे, ज्यात एक जागा गोवा फॉरवर्डने फातोर्ड्यात जिंकली आहे. दुसरीकडे वेळ्ळीमध्ये काँग्रेसच्या साविओ डिसिल्व्हांचा आपच्या क्रुझ सिव्हा यांनी केवळ 169 मतांनी पराभव केला आहे. आतापर्यंतचा इतिहास पाहता ज्याठिकाणी काँग्रेस केवळ एक किंवा दोन जागी प्रादेशिक पक्षांकडून हार पत्करत होती, यावेळी हे चित्र बदलल्याचं दिसून येत आहे.

काँग्रेसला मतदारांनी नाकारण्याचं आणखी एक कारण म्हणजे मागच्या निवडणुकीनंतर झालेलं पक्षांतर. आपण निवडून देऊनही उमेदवार पक्षांतर करेल या शक्यतेने मतदारांनी आधीच अन्य पक्षांच्या उमेदवारांना पसंती दिल्याचं दिसून येत आहे. यातच 2017 मध्ये 17 वर असलेलं काँग्रेसचं संख्याबळ 2022 मध्ये फक्त 2 जागांवर आलं आहे. काँग्रेसने पक्षांतर टाळण्यासाठी आपल्या उमेदवारांना शपथ देऊन त्यांच्याकडून प्रतिज्ञापत्रही लिहून घेतलं. मात्र मतदारांवर त्याचा काहीही परिणाम झाला नसल्याचं दिसून येत आहे. राजकीय विश्लेषकांच्या मते काँग्रेसने आपल्या विरोधकांना वेळीच शांत केलं असतं तर त्यांची मतांधिक्य कमी झालं नसतं, आणि काँग्रेसच्या जास्त जागा येऊ शकल्या असत्या. काँग्रेसने फक्त आप आणि तृणमूल काँग्रेसला मतदान न करण्याचं आवाहन केलं, मात्र अन्य विरोधकांना ओळखण्यात काँग्रेसची चूक झाली, असंही राजकीय विश्लेषकांचं म्हणणं आहे. काँग्रेसने यापेक्षा वेगळी रणनीती आखली असती तर त्यांना फायदा झाला असता का हे सांगता येत नसलं तरीही राज्यातील काँग्रेसची दिशा आणि केंद्रीय काँग्रेसची दिशा यातील तफावत काँग्रेसच्या पराभवाचं एक महत्त्वाचं कारण आहे, असंही तज्ज्ञांनी नमूद केलं आहे.

Why Congress Lost in Goa| Goa election result 2022 |
भाजप कार्यकर्त्यांकडून विरोधी प्रचार, तरीही जिंकलोच : बाबूश मोन्सेरात

सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे विधानसभा निवडणुकीत (Goa Election) गोव्यात काँग्रेसकडे प्रतिनिधीत्व करणारा एकही असा चेहरा नव्हता, जो लोकांच्या भाजपविरोधी मतांचा फायदा पक्षाला मिळवून देऊ शकेल. मायकल लोबोंनी भाजपविरोधी प्रचार केला असला तरीही कळंगुटवगळता मायकल लोबोंना राज्यात अन्य ठिकाणी विरोध असल्याचं चित्र होतं. तसंच काँग्रेसकडे मुख्यमंत्रीपदाचा चेहराही नसल्याने कुणाच्या नेतृत्त्वात निवडणूक लढवायची याचा संभ्रमही काँग्रेसमध्ये होता, ज्याचा मोठा फटका या निवडणुकीत काँग्रेसला बसल्याचं दिसत आहे. यासह काँग्रेसला काही मतदारसंघात अंतर्गत बंडाळीचाही फटका बसला आहे. यामुळे 10 आमदारांच्या जाण्याने झालेलं नुकसान भरुन काढण्यात काँग्रेसला अपयश आल्याचं चित्र आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com