कुडतरीच्या विकासासाठीच भाजपला पाठिंबा : आलेक्स

पुन्हा मागच्यासारखी चूक करणार नाही, मतदारांशी चर्चा करुन रेजिनाल्ड यांचा निर्णय
Aleixo Reginaldo
Aleixo ReginaldoDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी : कुडतरी मतदारसंघातील विकासकामे मार्गी लागावीत, यासाठी सर्वाधिक जागा मिळालेल्या भाजपला बिनशर्त पाठिंबा देण्याचा निर्णय मतदारांशी चर्चा करूनच घेतला आहे. देवाचा आशीर्वाद, मतदारांचा माझ्यावरील विश्‍वास तसेच स्पष्ट हेतू या तीन मुद्यांवर ही निवडणूक जिंकण्यात यशस्वी झालो. भाजपला पाठिंबा देताना मी मंत्रिपदाची इच्छा बाळगलेली नाही, तर मतदारसंघाचा विकास हा एकच ध्यास व हेतू समोर ठेवला आहे, असे मत कुडतरीचे आमदार आलेक्स रेजिनाल्ड लॉरेन्स यांनी व्यक्त केले.

Aleixo Reginaldo
गोव्यात भाजपविरोधी जनमताचा फायदा घेण्यात काँग्रेसला अपयश का आलं?

कुडतरी मतदारसंघातून लोकांनी माझ्यावर विश्‍वास दाखवून चौथ्यांदा निवडून दिले. त्यामुळे त्यांचा हा विश्‍वास सार्थ ठरवण्यासाठी अपक्ष राहूनच काम करणार आहे. मी लोकांना जी आश्‍वासने दिली आहेत ती पूर्ण करण्याचा प्रयत्न करणार आहे. जेव्हा मी काँग्रेसमध्ये (Congress) होतो, तेव्हा विधानसभेत सरकारने घेतलेल्या निर्णयाविरुद्ध आवाज उठविला होता.

काँग्रेसमधून तृणमूल काँग्रेसमध्ये (TMC) प्रवेश करण्याचा निर्णय लोकांशी चर्चा करूनच घेतला होता. मात्र, कुडतरी मतदारसंघातील अनेकांना तो निर्णय रुचला नाही. त्यामुळे मी तेथून बाहेर पडलो. माझा हेतू पारदर्शक व स्पष्ट होता. तीनवेळा निवडणूक लढवताना लोकांनी जो विश्‍वास दाखवला, तो पुन्हा मिळवण्यासाठी मला खडतर प्रयत्न करण्याची वेळ आली. त्याला कारणे काहीही असोत; पण अखेर लोकांनी माझ्यावर विश्‍वास दाखवून विधानसभेत पाठवले. यावेळी हा चमत्कार होता.

Aleixo Reginaldo
गोव्यात प्रामाणिक राजकारणाची सुरुवात : अरविंद केजरीवाल

लोकांना जी आश्‍वासने दिली त्यासाठी मला एखाद्या कार्यकर्त्याप्रमाणे काम करायला लागले तरी ती करण्याची माझी तयारी आहे. माझ्या मतदारसंघातील लोकांचे माझ्यावर प्रेम आहे. मतमोजणीनंतर अनेकांनी माझ्यासाठी प्रार्थना केली होती, यावरून त्यांचे माझ्यावर असलेले प्रेम उघड होते. यावेळी माझी ही कठीण परीक्षा होती, त्यात मी पास झालो, असे आलेक्स (Reginald Lawrence) म्हणाले. आमदारकीची मुदत संपल्यावरच मी पक्षातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. पण लोकांनी खालच्या थरावर जाऊन टीका केली. लोकांनी माझ्यावर टीका करावी, मात्र निष्पाप लोकांवर करू नये. निवडणुकीनंतर मी त्यांना उत्तर देण्याची आवश्‍यकता वाटत नाही. नव्याने पर्व सुरू करण्याचे माझा हेतू आहे. गोव्यासाठी सर्वांनी एकत्रित येऊन चांगले करण्याची गरज होती. मात्र, त्यात हेच लोक मागे राहिले, असंही रेजिनाल्ड यांनी स्पष्ट केलं आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com