Pramod Sawant Dainik Gomantak
गोवा निवडणूक

मुख्यमंत्री प्रमोद सावंत: ‘गोल्डन गोव्याचे’ स्वप्न साकार करू

केंद्र आणि राज्य सरकारच्या मदतीने केलेल्या विकासाच्या आधारे गोव्यात पुन्हा एकदा भाजपचेच सरकार सत्तेवर येईल: प्रमोद सावंत

दैनिक गोमन्तक

पणजी: केंद्र आणि राज्य सरकारच्या मदतीने केलेल्या विकासाच्या आधारे गोव्यात पुन्हा एकदा भाजपचेच सरकार सत्तेवर येईल आणि स्व. मनोहर पर्रीकर यांचे स्वप्न साकार करण्याला हातभार लागेल, असा विश्वास मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी मतदानाच्या पूर्वसंध्येला दै. ‘गोमन्तक’कडे व्यक्त केला. ‘गोल्डन गोव्याचे’ स्वप्न साकारायचे आमचे ध्येय असून ते साध्य करण्यासाठी या निवडणुकीत मतदारांचा कौल भाजपच्याच बाजूने असेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

गेल्या दहा वर्षांत स्व. मनोहर पर्रीकर यांच्या नेतृत्वाखाली आधुनिक गोवा उभारण्यात भाजपने प्रयत्नांची पराकाष्टा केली आणि त्यात यश आले. हे यशच आम्हाला आता ‘गोल्डन गोव्याकडे’ घेऊन जात आहे. केंद्राने केलेल्या भरीव आर्थिक मदतीच्या जोरावर सुफलाम सुफलाम गोवा उभारण्यात आम्ही काहीअंशी यशस्वी झालो आहोत. आता यापुढे जाऊनही आम्हाला गोव्याचा चौफेर विकास करायचा आहे.

साधनसुविधा उभारण्यासाठी केंद्र सरकारचे नेहमीच गोव्याला झुकते माप दिले आहे. या आधारावरच रस्ते बाधणी, बंदर विकास, मोपा विमानतळ, सुपर स्पेशॅलिटी हॉस्पिटल, पत्रादेवी ते काणकोणपर्यंत राष्ट्रीय महामार्गाचे चौपदरीकरण, अटल सेतू, झुआरी नदीवर रेस्टॉरंटसह उभारण्यात येत असलेला अत्याधुनिक पुल गोव्याच्या सौंदर्यात भर घालत आहे, असे म्हणाले.

कोविड काळात महसुलात घट झालेली असतानाही सरकारच्या कल्याणकारी योजना सुरू ठेवण्यातही आम्ही यशस्वी झालो. याशिवाय कोविड काळात आणि कोविड पश्चात नागरिकांना आरोग्याच्या सुविधा देण्यामध्येही सरकारने कोणतीही कसर ठेवली नाही. अशीच सेवा आमच्याकडून करून घेण्यासाठी राज्याची जनता आमच्या पाठिशी भक्कमपणे उभी राहील, असाही विश्वास त्यांनी केला.

विकासासाठी कटिबद्ध

सरकारने २०२२ साली २२ आश्वासने देत जनतेकडून २२ पेक्षा जास्त आमदार देण्याची आशा बाळगली आहे. राज्य आणि केंद्राच्या डबल इंजिनने केलेला विकास सर्वश्रृत आहे आणि हाच पुन्हा सत्तेत येण्यासाठी कारणीभूत ठरेल असा विश्‍वास सावंत यांना आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Viral Video: बाईक फुल स्पीडमध्ये, दोन्ही हात सोडले...तरुणीचा जीवघेणा स्टंट व्हायरल! पोलीस घेतायत शोध

Goa Crime: सांकवाळ येथे फ्लॅट फोडून साडेआठ लाखांचा ऐवज लंपास, अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल

Asia Cup Trophy Controversy: "आशिया कप ट्रॉफी दिली नाहीतर..." BCCI ॲक्शन मोडमध्ये! मोहसिन नक्वीला दिली 'वॉर्निंग'

Goa Weather Update: ऐन दिवाळीत शेतकऱ्यांवर पावसाचं संकट; 5 दिवसांसाठी यलो अलर्ट जारी

Goa Tourism: 'बीच' म्हणजे खेळाचे मैदान नाही, पर्यटकाने वाढवली पोलिसांची डोकेदुखी; किनाऱ्यावर चारचाकी चालवल्याने गुन्हा दाखल!

SCROLL FOR NEXT