सर्वाधिक मतदान केंद्रे काणकोणात; जाणून घ्या मतदारसंघांनुसार केंद्रांची संख्या

गेल्यावर्षी राज्यात एकूण मतदान 1663 केंद्रे; यावर्षी 1722 केंद्रे
Voting Booth: Goa Election 2022
Voting Booth: Goa Election 2022Dainik Gomantak

Voting Booth: उद्या 14 फेब्रुवारीला गोव्यात विधानसभेचे मतदान पार पडणार आहे. सकाळी 7 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत गोव्यातील 40 मतदारसंघांतील 1722 मतदान केंद्रांवर मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. संध्याकाळी 5 ते 6 हा कालावधी कोरोना रुग्णांसाठी (Corona Patients) असणार आहे. गेल्यावर्षी राज्यात एकूण 1663 मतदान केंद्र होती; तर यावर्षी एकूण 1722 मतदान केंद्रे (Voting Booth) आहेत. गोव्यातील सर्वाधिक म्हणजे 59 मतदान केंद्रे काणकोण या मतदारसंघात आहेत; तर तुलनेत सर्वात कमी म्हणजे प्रत्येकी 30 केंद्रे पणजी, मुरगाव आणि दाबोळी या मतदारसंघात आहेत. (Total number of polling stations by constituency)

Voting Booth: Goa Election 2022
प्रमोद सावंतांनी राहुल गांधींच्या आश्वासनाची उडवली खिल्ली

मतदारसंघानुसार केंद्रांची संख्या:

  • मांद्रे : 48

  • पेडणे : 51

  • डिचोली : 43

  • थिवी : 40

  • म्हापसा : 42

  • शिवोली : 44

  • साळगाव : 40

  • कळंगुट : 35

  • पर्वरी : 39

  • हळदोणा : 41

  • पणजी :30

  • ताळगाव : 43

  • सांताक्रुज : 39

  • सांतआंद्रे : 37

  • कुंभारजुवे : 40

  • मये : 48

  • साखळी : 50

  • पर्ये : 56

  • वाळपई : 50

  • प्रियोळ : 44

  • फोंडा : 45

  • शिरोडा : 45

  • मडकई : 42

  • मुरगाव : 30

  • वास्को : 46

  • दाबोळी : 30

  • कुठ्ठाळी : 41

  • नुवे : 40

  • कुडतरी : 43

  • फार्तोर्डा : 42

  • मडगाव : 40

  • बाणावली : 40

  • नावेली : 39

  • कुंकळ्ळी : 45

  • वेळ्ळी : 45

  • केपे : 49

  • कुडचडे : 47

  • सावर्डे : 48

  • सांगे : 46

  • काणकोण : 59

अशा एकूण 1722 मतदान केंद्रांवर यावर्षी मतदान पार पडणार आहे. निवडणूक आयोगातर्फे (Election Commission) केंद्रांची पर्यावरणपूरक वस्तूंनी सजावट करण्यात आली आहे. त्याचबरोबर उद्या कोणताही चुकीचा प्रकार घडू नये यासाठी पोलिस प्रशासन तैनात असणार आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com