Congres Dainik Gomantak
गोवा निवडणूक

अखेर महाविकास आघाडीत बिघाडी; संजय राऊत

काँग्रेसचा गोवा विधानसभा निवडणूकीत 'हम एकला चलो रे' चा मार्ग

दैनिक गोमन्तक

गोवा राज्यातील होऊ घातलेल्या विधानसभा निवडणूक 2022 संदर्भात काँग्रेसने शिवसेना खासदार संजय राऊत यांना जोरधार धक्का दिला. महाराष्ट्रात सत्तेत असलेल्या महाविकास आघाडीत गोव्यात मात्र बिघाडी झाल्याचे दिसत आहे. गोव्यात (goa)महाविकास आघाडीच्या प्रयोगाची पुनरावृत्ती करण्यात काँग्रेसला अजिबात रस नसल्याचे स्पष्ट होते, कारण काँग्रेसने उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केली आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी (ncp)आणि शिवसेना हे तिनही पक्ष मिळून भाजपला धूळ चारू शकतात, असा दावा संजय राऊत सातत्याने करत असले तरी काँग्रेसने शिवसेनेला दुर केले आहे.

गोवा येथे काँग्रेस गेल्या विधानसभा निवडणुकीत सर्वात मोठा पक्ष म्हणून पुढे आला. मात्र भाजपने सरकार स्थापन केले आहे. यावेळी संजय राऊत (sanjay raut)सतत राहुल गांधी आणि प्रियांका गांधी यांची भेट घेत होते. आणि महाराष्ट्रातील महाविकास आघाडीचा प्रयोग विशेषत: गोवा आणि उत्तर प्रदेशात आजमावण्याच्या शक्यतांवर बोलत होते. तसेच काही दिवसांपूर्वी त्यांनी गोवा येथिल काँग्रेस नेतृत्वासोबत महत्त्वाची बैठकही घेतली होती. पण या सगळ्यावर तोडगा काढत काँग्रेसने 'हम एकला चलो रे' चा मार्ग पत्करला आणि आपल्या उमेदवारांची यादी जाहीर केली.

संजय राऊत एकटेच

आश्‍चर्याची बाब म्हणजे संजय राऊत हे एकटेच शिवसेनेच्या (shivsena)वतीने महाविकास आघाडी करण्याचा दावा करत नव्हते. तर राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या वतीनेही ते मोठमोठी आश्वासने देत होते. राष्ट्रवादी आणि काँग्रेसमध्ये मात्र याबाबत कोणीही बोलत नव्हते.कदाचित संजय राऊत थेट राहुल गांधी(rahul gandhi)आणि प्रियंका गांधी (priyanka gandhi)यांच्याशी बोलत असतील तर काहीतरी होईल. पण गोव्यात स्वबळावर सर्वात मोठा पक्ष असल्याचे काँग्रेसच्या गोवा युनिटला वाटले, मग शिवसेनेची गरजच काय? म्हणूण काँग्रेसने नाकारले.संजय राऊत यांनी काही दिवसांपूर्वी गोव्यात जाऊन गोवा प्रदेश काँग्रेसचे प्रभारी दिनेश गुंडू राव, गोव्याचे माजी मुख्यमंत्री आणि विद्यमान विरोधी पक्षनेते दिगंबर कामत ( digambar kamat)आणि काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर यांची भेट घेतल्याचे स्पष्ट झाले आहे. यांनी मात्र दुरूनच हात दाखवला.

काँग्रेसने गोवा फॉरवर्ड ब्लॉकसोबत युती

काँग्रेसने रविवारी आपल्या विधानसभा उमेदवारांच्या 7 नावांची यादी जाहीर केली. यापूर्वी काँग्रेसने आपल्या पहिल्या यादीत 8 जागांवर उमेदवारी जाहीर केली असून माजी मुख्यमंत्री प्रतापसिंह राणे यांना अपक्ष म्हणून उमेदवारी दिली आहे. काँग्रेसने आतापर्यंत 40 पैकी 16 जागांसाठी आपले उमेदवार जाहीर केले. याशिवाय काँग्रेसने गोवा फॉरवर्ड ब्लॉक सोबत युती केली असुन हम साथ साथ है चा नारा दिला आहे. त्यामुळे काँग्रेसला गोवा फॉरवर्ड ब्लॉकसाठीही 2 जागा सोडाव्या लागणार आहेत.

गोवा विधानसभा निवडणूक होणार रंजक

त्यामुळे सध्या गोवा विधानसभा निवडणुकीची परिस्थिती अशी आहे की, काँग्रेसने आतापर्यंत आपल्या उमेदवारांच्या दोन याद्या जाहीर केल्या आहेत. अशा प्रकारे आता गोव्यात काँग्रेससह फॉरवर्ड ब्लॉक पक्ष भाजपला कडवी टक्कर देणार आहे. शिवसेना-राष्ट्रवादी आघाडी, तृणमूल काँग्रेस, आम आदमी (aap)पक्ष स्वतंत्रपणे नशीब आजमावणार आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

BJP: इतिहासात पहिल्यांदाच भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची सूत्रे महिलेकडे जाणार? RSS चा ग्रीन सिग्नल; 'ही' तीन नावे चर्चेत

Goa News Live: ओपा जल शुद्धीकरण प्रकल्पाजवळ ट्रक दरीत कोसळला

Goa Athletics: गोव्यात रंगणार 'मनोहर पर्रीकर स्मृती ॲथलेटिक्स स्पर्धा'; तारखा, ठिकाण जाणून घ्या..

Pakistani Team: 'पाकिस्तान' टीम खेळणार भारतात! क्रीडा मंत्रालयाकडून ग्रीन सिग्नल; 2 करंडकांमध्ये घेणार भाग

Goa Rain Update: गोव्यात जिकडे तिकडे पाणीच पाणी! पावसाचा रौद्रावतार; आपत्कालीन यंत्रणा सतर्क

SCROLL FOR NEXT